डिजिटल शब्दांच्या शोधात...

Submitted by निमिष_सोनार on 5 August, 2011 - 23:38

या लेखात मला कॉम्प्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल सर्वसमावेशक चर्चा (थोडक्यात खर्‍या अर्थाने काथ्याकूट) करायची आहे आणि त्याद्वारे सर्वांचाच फायदा होईल असा मला विश्वास आहे.

तसे या विषयावर लिहिण्याचे कधीपासूनच मनात होते पण वेळही मिळत नव्हता.
पण आता लिहिण्यामागचे तत्कालीक कारण असे की अगदी कालपर्यंत गुगल डिक्शनरी उपलब्ध होती आणि जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमधील शब्दांचे अर्थ त्यात शोधण्याचा पर्याय उपलब्ध होता.
इंग्रजी ते मराठी साठी सुद्धा आणि तेही अगदी चांगल्या पद्धतीने.
मोबाईल मधल्या इंटर्नेटवरून सुद्धा शब्द शोधणे त्यामुळे सोपे होते कारण गुगलवर युनिकोड मराठी चा वापर असल्याने मोबाईलमध्ये वेबपेजवर मराठी शब्द जसाच्या तसा दिसतो. फॉण्ट डाउनलोड करावा लागत नाही.
युनिकोड पद्धतीने मराठी लिहायला खुप सोपे जाते (मायबोली वर सुद्धा आपण त्याच पद्धतीने लिहितो)
[जेव्हा आपल्याला मराठी शब्दाचा पर्यायी इंग्रजी शब्द शोधायचा असतो तेव्हा पटकन लिहिण्यासाठी खालील लिंक वर जावू शकता- http://www.gamabhana.com/gamabhana_ex/
मी तर म्हणेन की प्रत्येकाने आपापले मराठी फोण्ट विकसीत करून गोंधळ निर्माण करण्यापेक्षा मराठी साठी फक्त एक आणि एकच फॉण्ट म्हणजे युनिकोड म्हणजे फोनेटीक पद्धतीचा सर्वमान्य करावा.]
तर मी सांगत होतो गुगल डिक्शनरी बद्दल!
ती लिंक होती - http://www.google.com/dictionary
पण काल पासून खालीलप्रमाणे संदेश येतो आहे -
Google Dictionary is no longer available.
You can use Google web search to find definitions or Google Translate for your translation needs.
जर आपण Google Translate वर गेलो तर त्यात भारतातल्या सगळ्या भाषा आहेत, शब्द आणि वाक्ये पण भाषांतरीत करता येतात पण त्यात मराठी मात्र वगळण्यात आली आहे. असे का?
कुणाला कारण माहिती असल्यास येथे सांगू शकता.
तसेच, ऑनलाईन पण युनिकोड पद्धतीचे मराठी असलेली इंग्रजी ते मराठी किंवा मराठी ते इंग्रजी डिक्शनरी आहे का?
असल्यास येथे सांगावे.

तसेच, ऑनलाईन मोफत इंग्रजी ते मराठी डीक्शनरी साठी खांडबहाले (http://www.khandbahale.com/englishmarathi.php) हा पर्याय आहे पण, त्यातला मराठी शब्द मोबाईल मधे वेबपेज ओपन केल्यावर दिसत नाही कारण त्यांचा स्वतःचा फॉन्ट आहे. मात्र कॉम्प्युटर वर दिसतो.

खांडबहालेंची मोबाईलसाठी ऑफलाईन डिक्शनरी मिळते. तीनशे रुपये देवून कोड विकत घेवून ती अ‍ॅक्टीव्ह करता येते.
पण, जर ती काही कारणास्तव मोबाईल फॉरमॅट करावा लागला तर पुन्हा इन्स्टॉल करण्यासाठी परत दोनशे रुपये देवून कोड विकत घ्यावा लागतो.
(http://www.4shared.com/file/Uyy_CLBm/Dictionary_English_Marathi_for.html)

मात्र, मोबाईलसाठी इंग्रजी ते इंग्रजी पूर्णपणे मोफत डिक्शनरी हवी असल्यास खाली आहेत. डाउनलोड करून लाभ घ्यावा:
http://www.4shared.com/file/AXTVdL9g/Dictionary41.html
http://www.4shared.com/file/uRybMdIV/Webster_Complete_Dictionary.html
http://www.4shared.com/file/JWAJpMez/Dictionary9-en-en_for_mobile.html

तसेच, आपल्या कॉम्प्युटरसाठी संपूर्णपणे मोफत डिक्शनरी हवी असल्या खाली मिळतीलः
मोफत ऑक्सफर्डः
http://www.4shared.com/file/Ok38_-kL/POD_for_windows.html
मोफत वेबस्टरः
http://www.4shared.com/file/8MUmy4E7/WEBSTER_for_windows.html
मोफत मराठी ते इंग्रजी:
http://www.4shared.com/file/2M6AmCs4/Marathi_English_Basic_Dictiona.html

मोल्सवर्थ या लेखकाची पीडीएफ स्वरूपातली डिक्शनरी लि़क खाली देत आहे:
लिंक खाली देत आहे:
http://www.archive.org/details/acompendiummole00molegoog

आणखी काही इंग्रजी ते इंग्रजी पीडीएफ-
http://www.4shared.com/document/b6_Yky43/Thesaurus_Oxford.html
http://www.4shared.com/document/EJ9QgB2M/Thesaurus_Roget.html

वाचकांना विनंती आहे की कुणाला कॉम्प्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल आणखी काही माहिती असल्यास येथे सांगावी म्हणजे सगळ्याना त्याचा लाभ होईल.
जास्त करून मोबाईलसाठी इंग्रजी ते मराठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बद्दल माहिती असल्यास सांगावे कारण मोबाईल सतत आपल्या जवळ असतो आणि पटकन शब्दाचा अर्थ शोधता येतो.

गुलमोहर: 

गुगल बेस्ट आहे हो ..
गुगल होम पेज वर जायचे... सर्च बार मध्ये "Define:शब्द" (without quotes ) लिहून सर्च करायचे.
उदाहरण: define:computer असे सर्च केल्या नंतर पहिले उत्तर हे येते.

com·put·er/kəmˈpyo͞otər/Noun
1. An electronic device for storing and processing data, typically in binary form, according to instructions given to it in a variable program.
2. A person who makes calculations, esp. with a calculating machine.

इंग्रजी ते इंग्रजी डिक्शनरी बद्दल मी बोलत नाही आहे.
त्या ढीगभर आहेत.
ऑफलाईन (मोबाईल आणि कॉम्प्युटरसाठी) तसेच ऑनलाईन सुद्धा आहेत.
संपूर्णपणे मोफत आहेत.
त्यांच्या लिंक्स मी वर लेखात दिल्याच आहेत.
मला वेगळे म्हणायचे आहे.
माझा लेख परत एकदा वाचा.
मला गुगलच्या ऑनलाईन इंग्रजी ते मराठी डिक्शनरी तून भारतीय भाषा का वगळण्यात आली आहे त्याबद्दल चिंता आहे.
मला वाटते आहे की कुणीतरी मराठी व्यक्तीनेच गुगलला सांगितले असावे की फ्री ऑनलाईन इंग्रजी मराठी ऑप्शन काढून टाका म्हणून!!!
मला त्यातून असे म्हणायचे आहे की:
बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांकडून विकत मिळणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन इंग्रजी ते मराठी मोबाईल साठी तसेच कॉम्प्युटरसाठी शब्दकोश आहेत. पण ते उगाच स्वतःचा फॉण्ट विकसीत करत बसून त्याला मर्यादा आणतात. आणोत बापुडे!
पण, गुगल मध्ये पूर्वी युनिकोड पद्धतीने गुगल डिक्शनरी या ऑप्शन द्वारे इंग्रजी मराठी ऑनलाईन डिक्शनरी उपलब्ध होती. अचानक काही दिवसांपूर्वी ते ऑप्शन बंद झाले.
त्या ऐवजी आणखी चांगले म्हणजे ट्रान्स्लेट आणी ट्रान्सलिटरेट हे ऑप्शन गुगलने सुरु केले आहे.
म्हणजे इंग्रजी शब्दाचे तसेच पूर्ण वाक्याचे भाषांतर जगातील इतर अनेक भाषांमध्ये तेथे होते.
हे स्वागतार्ह आहे. पण, ट्रान्स्लेट आणी ट्रान्सलिटरेट मधून मराठी भाषा वगळली गेली आहे.
ती का म्हणून?
गुगलने ट्रान्स्लेट आणी ट्रान्सलिटरेट सुरू करण्या आधी मराठीतील तज्ञांना विचारले असेलच ना?
मग, मराठी ऑप्शन बंद का झाले?
तज्ञांना आनंद झाला असला पाहिजे होता.
जगभरातल्या तमाम मराठी लोकांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब होती हो!
पण, आपापल्या विकसित केलेल्या फोण्ट च्याच फक्त ऑनलाईन डिक्शनरी लोकांनी वापराव्या व विकत घ्याव्या, आणि युनिकोड पद्धत जी जगातील सोपी पद्धत आहे त्याचा फायदा सर्व मराठी बांधवांना व्हावा असे त्यांना वाटत नसेल
असे मला वाटले म्हणू मी वरील विधान केले आहे.
म्हण्जे, आपणच आपली प्रगती रोखतो आहोत.
पाय खाली खेचत आहोत.
या अर्थाने मी तसे म्हटले आहे.
खाली दिलेल्या लिंक वर जा.
http://translate.google.com/#
इंग्रजी ते हिंदी सिलेक्ट करा आनि बघा काय आधुनिक टेक्नॉलॉजी चा चमत्कार आहे ते!
फक्त शब्दच नाही तर इंग्रजीची वाक्यची वाक्य, परिच्छेद हिंदीत (गुजराती, मल्यालम, कन्नड, तमील, आणि जगभरातील इतर भाषेत) भाषांतरीत करता येतात.
फक्त तेथे मराठी ऑप्शन नाही आहे. ते का?
पूर्वी गुगल डिक्शनरी होती तेव्हा त्यात इंग्रजी ते मराठी शब्द शोधता येत होता.
मग, आता मराठी का वगळण्यात आली?

धन्यवाद. ही लिंक दिल्याबद्दल.
मी ही त्या याचिकेत लगेचच जावून साईन करून टाकली!

व्वा, मला वाटले सही केली असेल! पण मला माहीत नव्हते आजकाल मराठीत सही ला साइन म्हणतात! असले मराठी कशाला हवे गूगलवर?!

गूगल, विकिपीडिया सारखे तुम्हा हुष्षार भारतीयांना काही करता येत नाही का? सतत आपले आयत्या बिळावर नागोबा!

मग, आता मराठी का वगळण्यात आली?

तुम्हाला काय वाटले गूगल म्हणजे जगाच्या कल्याणासाठी काढले आहे? अहो तो धंदा आहे! पैसे! किती पैसे मिळतील मराठी भाषा गूगलवर आणण्यात? बरे, कुणि मराठी प्रेमी लोकांनी काही त्यांना काही ठोस कल्पना दिल्या आहेत का, की कोण करेल, किती खर्च येईल, त्यातून त्यांना काय फायदा होईल?

नुसते भीक मागा तुम्ही!!