.

Submitted by .. on 2 August, 2011 - 10:10

. इथला मजकूर काढून टाकला आहे. क्षमस्व. .. .. .. ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इथल्या नियमांप्रमाणे ती जून २०११ मध्ये ६ पूर्ण नसल्याने सीनीयर केजी मध्ये आहे. ती सप्टेंबर एंड ला ६ पूर्ण होईल. मग सिनीयर केजी पूर्ण करावे लागेल का आधी तिथे यावर्षी ?

इथे cut-off date नोव्हेंबर आहे. म्हणजे नोव्हेंबरच्या अमुक तारखेला जर मुल ६ पूर्ण असेल तर ते १ लीत जाऊ शकतं. मागच्या वर्षीपर्यंत आमच्या school district ला डिसेंबर २ होती ही तारिख. ह्या वर्षीपासून नोव्हेंबर केलीये असं ऐकलंय. तरी तू विचार school district ला ई-मेल करून.
मोठी मुलगी तर तुम्ही जिथे राहाल तिथल्याच शाळेत जाईल, पण धाकटीची शाळा पण जवळच पाहिलीस तर तुला सोपं पडेल. आणि तिला खरं तर इथे आल्या-आल्या शाळेत घालायची पण गरज नाही. इथे जरा रुळलात की मग हळू-हळू माहिती काढून ठरवू शकाल तिची शाळा. ३ पूर्ण झाल्यावर प्रिस्कूलला घालणे इथे कॉमन आहे, ती तर लहानच आहे Happy

मुलींच्या वजनाप्रमाणे आणि वयाप्रमाणे कारसिट्/बुस्टरसीट्स लागतील का ते पण पहावे लागेल Happy त्यासाठी संपूर्ण माहिती इथे वाचा - http://www.chp.ca.gov/community/safeseat.html Happy

आमच्या इथे शाळेची cut-off date ऑगस्ट ३० आहे. आणि माझी मुलगी पण २०११ सप्टेंबरला ६ पुर्ण नसल्याने १ ली त गेली नाही.

शाळेची cut-off date प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. त्यामुळे तू शाळेत ई-मेल करुन नक्की विचारुन घे.

कॅलिफोर्नियात मधे अर्नॉल्ड ने काहीतरी बिल पास केले होते त्यानुसार बहुधा मागच्या वर्षीपासून ही डेट पुढची तीन वर्षे दर वर्षी एक महिन्याने अलिकडे जाणार. पूर्वी १ डिसे. होती.

ही कुपर्टिनो स्कूल डि. ची लिन्क. जरा वेगळी दिसते आता वेबसाईट, बहुधा नुकतीच नवीन केलेली दिसते
http://www.edline.net/pages/Cupertino_Union_SD

आणि या लिन्कवर या डि. मधल्या शाळा
http://www.edline.net/pages/Cupertino_Union_SD/Our_Schools/Elementary_Sc...

मिनोती, खूप चांगली माहीती देतेयस. खूप धन्यवाद. जे वाटेल ते बिन्धास्त सांग. जुन्या वस्तू घेण्याबाबत बरोबर आहे. इथल्या नव्या कोर्‍या वस्तू ठेवून्/विकून तिकडे जुन्या घेणे अवघड वाटू शकते, पण आता जायचे ठरवलेय त्यामुळे ते करावेच लागेल.

मृण्मयी, प्रॅडी, ड्रायविंग लायसन्स चे लक्षात ठेवेन. थँक्स.

राखी, माहीतीबद्दल धन्यवाद. मला वाटतंय आधी तिला सिनीयर केजी पूर्ण करायला पाहीजे. जरी सहा पूर्ण होऊन पहीलीत जाऊ शकत असेल तरी तसे न करता सिनियर केजी मध्येच घालू शकणार नाही का ?

शाळांना करायच्या इमेल चा ड्राफ्ट तयार केलाय मी, पण नक्की तो कोणत्या शाळांना पाठवावा हे कळत नाहीये. स्कूल डिस्ट्रीक्ट ला इमेल करणे म्हणजे काय ते बघते आता.

फारएण्ड, लिंकबद्दल थँक्स. हे नीट वाचून बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. यातली एक लिंक तू आधी मेलमध्ये दिली होतीस, पण तेव्हा आमचा विचार संपला नसल्याने (:फिदी:) नीट बघितली नव्हती.

सगळ्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या माहीतीचा नक्कीच खूप उपयोग होतोय नव्या गोष्टी कळायला. सर्वांचे मनःपूर्वक आभार. Happy

>> चिमण्या, स्टेप अप का लागेल तिथले इथे वापरायला ? स्टेप डाऊन हवा
असाम्या, इनपुट व्होल्टेज ११० आहे ते २२०-२४० करायचं म्हणजे स्टेप-अपच हवा. स्टेप-डाउन कसा चालेल? यूएस मधली वस्तू भारतात वापरायची असेल तर स्टेप-डाउन पाहीजे. मी हे धंदे केलेले आहेत, ट्रस्ट मी! Happy

सगळ्यांनी दिलेल्या माहीतीचा खूप उपयोग झाला.
नंतर डिटेल मधे आमचे अनुभव लिहीनच पुढे कोणाला उपयोगी पडले तर..
पण सध्या मिनोतीचे आभार मानायला लिहीतेय. तिने सांगितलेल्या किंग फुटॉन दुकानात चांगली हवी तशी गादी रिझनेबल किंमतीत मिळाली. Happy

Pages