अमृतकलश

Submitted by अलका_काटदरे on 23 July, 2008 - 11:16

हा अमृताचा कलश भरभरुन वाहे
जीवनाचे सन्चित मागे वळून पाहे..

ना खेद ना खन्त अन्तर्मनी राहे
जे जे प्राप्त, त्याला मी ऋणी आहे..

नाही जे गवसले, गन्गेला मिळाले
सुखशान्ती विश्वास, पसरित नेले

अन्तरी ताकद, भविष्याचे वेध सारे
मन माझे सुखावून भरारी मारे..
हा अमृताचा कलश भरभरून वाहे !

गुलमोहर: 

कविता छान आहे. पण गजल विभागात का बरं?