तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता? नित्य उपासनेत कोणाची पूजा करावी?

Submitted by जागोमोहनप्यारे on 30 July, 2011 - 01:55

तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता? नित्य उपासनेत कोणाची पूजा करावी?

राम

कृष्ण

कुलदेव, कुलदेवता

गणपती

दत्तगुरु

साईबाबा, स्वामी समर्थ इ.

बापू वगैरे आजकालचे गुरु

विठोबा

मारुती

शनी

इतर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अध्यात्मिक दु:खे असतील तर कुलदेवता, दत्तगुरु यांची उपासना करावी असे सनातनवाले म्हणतात.

हिन्दू असाल/स्वतःला समजत असाल

हिन्दू असाल/स्वतःला समजत असाल (अर्थातच म्हणा) तर पन्चायतनात विष्णु, गणेश, शन्कर, देवी व सूर्य यान्ची नित्य उपासना हवी. जोडीला कुलस्वामी कुलस्वामिनीचे स्वरण हवे. या व्यतिरिक्त आराध्य दैवत म्हणुन, हनुमान, दत्तात्रेय, नवग्रह, ग्रामदैवत, स्थानदैवत, घराण्यातुन परम्परागत चालत आलेले टाक/मूर्ति वा तत्सम दैवतान्ची उपासना जी ठरवली असेल तर ती करावी. सणासुदीचे दिवशी (व जमल्यास एरवीही) पन्चायतनस्थित देवता/आराध्यदेवता/मुख्यदेवता यान्चेबरोबर वास्तूचा, गाईचा तसेच पितरान्चा नैवेद्य काढायला विसरू नये.
मूळात सकाळी उठल्या उठल्या स्वतःच्या हातान्चे दर्शन घेऊन त्यावर स्थित परमेश्वराचे ध्यान करावे (कराग्रे वसते.......या श्लोकाने). जमिनीवर पाय टेकवण्याआधी धरणीमातेची क्षमायाचना करावी (समुद्र वसने देवी...... या श्लोकाने). स्नान करताना गंगाभागिरथी इत्यादिक पन्चनद्यान्चे/तीर्थान्चे स्मरण करावे. जेवताना चित्रावती वगैरे घालून मूळ शक्तीस्त्रोतान्चे स्मरण करावे. वगैरे उठल्यापासून झोपेपर्यन्तच्या अनेक उपासनाकृती सान्गता येतील.
थोडक्यात, जागृतावस्थेत करत असलेल्या प्रत्येक कर्माचे वेळी, हे कर्म करताना, "तो"/"ती" कोणतीतरी शक्ती मला पहाते आहे, साक्षीभूत आहे हे विसरू नये. व मी जे व जसे कर्म करीन त्या प्रत्येक कर्माचे फल मला, योग्य त्या इश्वरी पद्धतीने देण्यास ती शक्ति कटिबद्ध आहे हे ही विसरू नये.

याव्यतिरिक्त कुणा महाराज/साधुसन्तान्चे शिष्यत्व (प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या) स्विकारले असल्यास त्यान्ची आराधना करावी.

ज्योतिषशास्त्रदृष्टा जन्मकालिन चंद्र नक्षत्रानुसार आराध्य दैवत / किन्वा त्या त्या दैवताकडचा ओढा समजुन येतो. कुन्डलीतील बाकी ग्रह देखिल तपासावे लागतात.

अन हे काहीच न करता, स्वकर्मावर/स्वकर्तुत्वावर विश्वास असून देवादिक शक्ति मानतच नसाल तर सरळ उठून कामाला चालू पडावे. Proud

Panchdev_m.jpg

panch.JPG

अजून गटारी संपलेली नाही, म्हनून असेल कदाचित.. एकदा श्रावण सुरु झाला की मग देवाधर्माच्या धाग्यांवर पाऊस पडेल.

हे काय स्वतःच पोष्टी टाकत आहे..... वाळीत टाकले का तुम्हाला........>>
हे असले टुकार धागे काढल्यावर आणखी काय होणार..
Biggrin

प्रत्येकाची आवड वेगळी असनार. पण मुळात लिंबु भाउ म्हणतात तसे देवतेची आवड ही कुंडलीत लिहिलेली असते. याशिवाय प्रत्येकाची मनोकामना वेगळी असनार. त्यासाठी वेगळा देव लागणार प्रत्येकाला.

लिंबूटिंबू, तुम्ही लिहीलेली माहिती चांगली आहे.
एक गोष्ट या संदर्भात लिहील्याशिवाय रहावत नाही.
एकदा नारदमुनी, नेहेमी प्रमाणे, केवळ जगाचे कल्याण, भक्तांना मार्गदर्शन, ज्ञान व्हावे या एकाच हेतूने भगवान श्री विष्णूंना विचारते झाले, 'भगवान, मी तर तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त. माझ्यानंतर तुमचा सर्वात प्रिय भक्त कोण?'
भगवान हसून उत्तरले, 'बा नारदा, तू चुकतो आहेस. मा़झा सर्वश्रेष्ठ भक्त तर पृथ्वीतलावरील एक शेतकरी आहे, त्यानंतरहि अनेक आहेत, त्यानंतरहि अनेक, नि मग तू!!
हे ऐकून नारदमुनी आश्चर्यचकित झाले. रागावणारच होते, पण क्रोधाचे पूर्ण दमन केले असल्याने त्यांना राग आला नाही. ते म्हणाले भगवान, आत्ताच्या आत्ता पृथ्वीवर जाऊन या भक्ताचे दर्शन घेऊ, तो तुमचा सवश्रेष्ठ भक्त कसा झाला ते बघू, म्हणजे इतरांना त्याचा मार्ग अनुसरायला मदत होईल.

म्हणून ते दोघे भल्या पहाटे पृथ्वीतलावर आले. तो भक्त नुकताच उठत होता. तो उठला नि लगेच शेतावर जाऊन कामाला लागला! दिवसभर सतत काम करत राहिला. पूजा, नमस्कार, मंत्र, जप काही नाही!!!!

हे पाहून नारदमुनी म्हणाले, भगवान, थट्टा करता का? हा कसा आपला भक्त होईल? हा तर ब्राह्मण नाही, देवाचे काही करत नाही, नुसता शेती नि पोट भरण्यासाठी कामे करत असतो.

भगवान म्हणाले आपण एक परीक्षा घेऊ. मग त्यांनी त्या भक्ताला व नारदमुनींना सांगितले. डोक्यावर पाण्याने काठोकाठ भरलेले भांडे घेऊन १०० पावले चालत जा. एक अट आहे, पाण्याचा एक थेंबहि सांडता कामा नये!!

दोघेहि निघाले. भक्त आपल्या नेहेमीचे चालीने चालू लागला. जरा जलदच, कारण काम सोडून हे करायला त्याला वेळ कुठला? नारदमुनी मात्र देवाचे नाव घेण्याचे साफ विसरून त्या भांड्यातील पाण्याची काळजी करत अत्यंत हळू हळू चालत होते. शेवटी भक्ताच्या डोक्यावरील भांड्यातील एकहि थेंब न सांडता तो १०० पावले चालून गेला. नारदमुनी मात्र दहाबारा पावले गेले अन् तेव्हढ्यात त्यांच्या डोक्यावरील थोडे पाणी सांडले!!

तेंव्हा भगवंतांनी स्पष्टीकरण दिले - वत्सा नारदा, तो गरीब बिचारा शेतकरी, त्याला दिवसभर काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही. पण त्याच्या मनात माझ्यावर नितांत श्रद्धा आहे, त्याला काळजी करायला, इकडे तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण मनात मात्र त्याची माझ्यावर अपार श्रद्धा आहे. त्याच्यासारखे अनेक लोक या कलीयुगात आहेत. ते पण पूजा, नमस्कार, व्रते काहीहि करत नाहीत, जगण्यासाठी धडपड करण्यातच त्यांचा वेळ्जातो, पण त्यांची श्रद्धा मला पोचते. त्यांची काळजी मी घेतो.
तुझी परिस्थिती वेगळी, तुझी साधने वेगळी. पण त्यापासून जराहि बदल झाला तरी तू मला विसरलास!!!

यातून काय शिकलास?

आकाशात पतितं तोयं... यासारखे श्लोक म्हणतात की कुठल्याही देवाला नमस्कार केलात की तो 'केशवा'लाच पोचतो, नरसिंहावताराची गोष्ट सांगते की देव सगळीकडे असतो. ... मग हा धागा काढण्याचे प्रयोजन काय???
मग मुस्लिम-ख्रिश्चन धर्म बरे... एकच अल्ला एकच गॉड!

दुर्दैवाने या कलीयुगात श्रद्धा हा प्रकार दुर्मिळ झाला आहे. कितीहि जपजाप्य, पूजाअर्चा, विधी करूनहि मनापासून श्रद्धा उत्पन्न होणे कठीण. केवळ प्रयत्न म्हणून पूजा, जप काहीतरी करायचे.
स्वतःबद्दल बोलायचे तर, सध्या अजिबात कामधंदा नसताना, नि आयते गिळायला मिळत असताना, नि सर्व शारीरिक सुखे असताना, मी देवाच्या नादी लागतो. पण मनापासून श्रद्धा उत्पन्न होणे कठीण.

मग काय करावे?

कामक्रोधादि दुर्गुण यांचे नियंत्रण करायला शिकावे. त्यासाठी देवाचे नाव घ्या अगर नका घेऊ. इतर काहीतरी करा, पण दुर्गुणांच्या आहारी जाउ नका.

मुळात कामक्रोधादि दुर्गुण यांच्यावर अधिकार प्राप्त केला म्हणजे हळू हळू लक्षात येते, की अरे, क्रोध करण्यात काहीच अर्थ नाही, टीका करण्यात, भांडण्यात काहीच अर्थ नाही! खूप पैसे, खूप सत्ता याची गरज नाही. केवळ उदरनिर्वाह व लोककल्याणासाठी पैसा व सत्ता असली की पुरे. मनावर सद्गुणांचे राज्य आल्यावर मनःशांति मिळते.

तुम्हाला मनःशांति मिळाली की, मग कुठलेहि ज्ञानार्जन करणे, मायबोलीवर लिहीणे, क्रिकेट, बेसबॉल, फूटबॉल बघणे, ब्रिज खेळणे, गाणी ऐकणे, यातले काहीहि केले तरी चालेल. आनंदच मिळतो.

लोकांनी तुम्हाला 'तुसि ग्रेट हो' असे नाही म्हंटले, तुमची स्तुति केली नाही, तुम्हाला मान दिला नाही, तरी काही फरक पडत नाही!! तुम्हाला कुणिहि कितीहि शिव्या दिल्या, टिंगल, चेष्टा केली तरी तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टी करण्यात काहीच अडथळा येत नाही!

केवळ देवावर प्रेम म्हणून फार तर त्याचे नाव घ्या, पूजा करा. पण नाही जमले तरी मनात त्याचे स्मरण ठेवल्यास त्याला ते पोचते. आणि ते मनातले स्मरण आपोआपच होते, तुमच्या नकळत!!

मनापासून देवाचे नाव एकदाच घ्या हे जरी पटनारे असेल, तरी प्रत्यक्ष जीवनात कुणाची तरी उपासना करायलाच हवी.. त्यातले कन्फुजन होऊ नये म्हणून हा धागा उघडला.. सन्मार्गाने वागणे हे तर आवश्यकच आहे. देवपूजा हा सन्मार्गाला पर्याय नाही. अर्थात , काही लोक कसेही वागतात आणि अशी कोणतीतरी उपासना, पुजा करुन समाधान करुन घेतात हेही खरेच आहे.

बाकी, लिंबुभाउअनीदेखील आपले काम मुकाट्याने करणार्‍याना त्यांचा मार्ग शेवटच्या ओळीत दिलेला आहेच.

छान

प्रभाते मनी राम चिंतित जावा,
पूढे वैखरी राम आधी वदावा,
सदाचार हा थोर सांडू नये तो,
जनि तोचितो मानवी धन्य होतो..

.श्रीरामसमर्थ!!
ॐ श्री गुरूदत्तात्रय्श्रीपाद्श्रीवल्लभायनमः

श्रीसदगुरूंची नित्य उपासना सकाळ संध्याकाळ करावी..

मीं उपासतापास धार्मिक कारणांसाठी कधीही केले नाहीत, करत नाही ; याचा मला वृथा अभिमानही नाही कीं अकारण टोंचणीही नाही. कुलदैवतावर माझी अमाप श्रद्धा आहे पण इतर देवतांचं पण मला वावडं नाही. मी जेंव्हा देवापुढे हात जोडून उभा असतो [ केंव्हाही, पण फार वेळ, फार वेळां नाही] तेंव्हा प्रांजळपणे माझे दोष, कमकुवतपणा मी कबूल करत असतो, एखाद्या खास मित्राकडे करतो तसंच. देव त्याची टर उडवत नाही किंवा मला धारेवरही धरत नाही हा मला ठाम विश्वास वाटतो. माझ्याकडून कधीही कोणाचं जाणूनबुजून वाईट होणार नाही याची दक्षता मी घेतो [ ह्यात संस्कारांचा भाग अधिक] व तोच माझ्या आणि देवाच्या मैत्रीचा भक्कम पाया असावा, ही माझी खरीखुरी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला जराही तडा जाईल असं मी कांहीही करत नाही.
संत, महात्मे यांविषयीं प्रचंड आदर असूनही मी व देव यांच्यामधलं माझं हें 'डायरेक्ट' नातं जपायलाच मी सर्वाधिक महत्व देतो.

माझ्या देवार्ह्यात शन्कराचि पिन्दि नाही आहे. तरी ती घेताना काही विशिश्ठ सन्केत आहेत का? म्हन्जे कोणत्या धातुची वगैरे ? आणी केवढी असावी ?

पितळेची पिंडी आणि शाळीग्रामाची गोटी अशी मूर्ती मिळते... पूर्ण धातुचीही असेल. लिंबूना विचारा.