बी एम एम २०११ शिकागो : नावनोंदणी Registration

Submitted by webmaster on 28 July, 2011 - 14:14

बी एम एम २०११ शिकागो : नावनोंदणी Registration

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पण सोय आवडली. आपले card आपल्याच घरी (ईमेल मधुन PDF पाठवलेली) छापून घेऊन जायचं. फक्त तिकडे जाऊन एकदा दाखवलं की झालं. त्यामुळे २५/३० लोकांचे Registration पण २/४ मिनीटात होत होतं.
(फिलीला याच बाबतीत खूप घोळ झालेला. मला दुसर्‍या दिवशी गर्दी नसताना सुध्दा तीन काऊंटर फिरायला लागले होते. Confirmation number शोधा. मग तो चुकीचा असेल वगैरे बरेच वाद. आदल्या दिवशी माझ्या मेव्हण्याला १ तास लागला, मंदार जोगळेकरांना शोधून तिकीट ताब्यात घ्यायला.. )

नावनोंदणीच्या बूथवरचे सगळे मराठीत बोलत होते हे पाहून सुरुवात छान झाली. त्यात एका स्वयंसेविकेने तर "तुम्ही अमुक तमुक म्हणजे, अमुक तमुकचे नातेवाईक का? मी त्यांची...." अशी सुरवात केल्यामुळे अजूनच मजा आली.

मी या अगोदर उपस्थित असणार्‍या सगळ्या अधिवेशनात (यात आमच्या बोस्टनचे १९९७ चे अधिवेशनही आले) नावनोंदणी करणारे मराठीत बोलणे सुरु करत नाही अशी माझी नेहमीची तक्रार असे. एका अधिवेशनात माझ्या नेहमीच्या संपर्कात असणारे मित्र स्वयंसेवक होते त्यांनीही "When did you guys arrive?" असे म्हटल्यावर "तुमच्या जन्माच्या अगोदर" असे उद्गार माझ्या तोंडातून निघून गेले होते. आणि आता तरी मराठीत बोला अशी प्रेमळ धमकी त्याना दिली होती. या एका छोट्या (पण माझ्या दृष्टीने महत्वाच्या) गोष्टीकडे लक्ष दिल्याबद्दल्ल शिकागोमधल्या स्वयंसेवकांचे आभार. ज्याला मराठीत बोलता येत नाही किंवा इच्छा नाही त्यांनी नोंदणीचे स्वयंसेवक होऊ नये असे माझे प्रामाणिक मत आहे. आपण कौतुकाने कधी लहान मुलांना नोंदणीसाठी उभे करतो पण त्या सगळ्यांनाच मराठी बोलता येते असे नाही. त्यांचा उत्साह इतर अनेक कार्यक्रमांसाठी (उदा पाहुण्यांसाठी रंगंमंचावर पुष्पगुच्छ आणणे) वापरात येईल.

नोंदणीचे पत्र इमेलने पाठवले होते आणि त्याला घड्या घातल्या की तुमचे प्रवेशपत्र तयार. घरीच ते छापता आले. त्यामुळे अधिवेशनाच्या जागेत कुणाला रांगेत उभे रहावे लागले नाहि. अगदी सुट्सुटीत नाव नोंदणी.

जेवण अधिवेशनाच्या किमतीतच उपलब्ध केले होते. त्यामुळे जेवणासाठी (कुपन तपासण्यासाठी) मोठ्या रांगा नव्हत्या. त्यामुळेही नोंदणीचे काम सोपे झाले होते.

हे छानच केले मग यावेळी मंडळाने, फिलीच्या अनुभवावरून बदल करून बरीच सुधारणा केलेली दिसतेय यावेळी.

माझ्या कंपनीने नावनोंदणी बरोबर मिळणार्‍या पिशवितून देण्यासाठी "बेलाचे पान" सीडीच्या १२०० प्रती दिल्या होत्या. त्या कमी पडल्या. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी कृपया कळवावे. या सीडीची पुस्तिका अधिवेशनाला उपस्थित असलेल्या सर्वांना ई मेलने पाठवा अशी विनंती केली होती पण त्याचे काय झाले ते कळले नाही त्यामुळे माझ्याजवळ ज्या ई मेल होत्या त्यांना फक्त ती पाठवली आहे. इतरांनी त्यांचा ई मेल कळवला तर पाठवता येईल.