आवडलेली गाणी

Submitted by माणूस on 23 July, 2008 - 00:22

आवडलेल्या मराठी/अ-मराठी गाण्यांची माहीती ईथे देवु शकता.
.
post youtube.com, metacafe.com, musicindiaonline.com links,
.
****** NO MP3 PLEASE *****

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसा,

ती वर दिलेली हिन्दी कराओके ची साइट मस्त आहे रे.... गाणी म्हणण्याची हौस भागवून घेतली... मजा वाटली.... Happy

Song.......: Yahi Meri Zindagi
Language...: Hindi
Artist.....: Aditi Singh Sharma
Album......: Dev D
Year.......: 2008
Link.......: http://listen.grooveshark.com/#/song/Yahi_Meri_Zindagi/22167262
.
.
Song.......: Soniyo
Language...: Hindi
Artist.....: Sonu Nigam
Album......: Raaz - The Mystery Continues
Year.......: 2008
Link.......: http://listen.grooveshark.com/#/song/Soniyo/22167118

Song.......: Chimb Pavasan Ran Zal
Language...: Marathi
Artist.....: Lata Mangeshkar, Suresh Wadkar
Album......: Sarja
Year.......: 1987
Link.......: http://www.youtube.com/watch?v=XCxBUvR1EsI
.
.
Song.......: Bang Bang (My Baby Shot Me Down)
Language...: English
Artist.....: Nancy Sinatra
Album......: How Does That Grab You?
Year.......: 1966
Link.......: http://www.youtube.com/watch?v=T5Xl0Qry-hA

https://www.youtube.com/watch?v=ndoxnS7lLDc
हौले हौले हवा डोले, कलियोंके घुंघट खोले
आजा मेरे मनके राजा, पीहु पीहु पपीहा बोले

खास बंगाली संगीत आहे. फार गोड विरहगीत. गीता दत्त/ निखिल घोष

>>>>Bang Bang (My Baby Shot Me Down)>>>> होय आवडते हे गाणे. नॅन्सी सिनात्राचे तिच्या व डीलांबरोबरचे म्हणजे फ्रँ क सिनात्रा यांच्या बरोबर चे लव्ह ड्युएट - https://www.youtube.com/watch?v=0f48fpoSEPU
हे सुद्धा आवडते.

राजसा जवळी जरा बसा

https://youtu.be/UcYZ9-Anft0

बहुतेक ना. धो. महानोरांनी लिहीली आहे ही लावणी. मी फक्त ऑडीओ फाईल ऐकलीय. लता मंगेशकरांचा आवाज अप्रतिम लागलाय.
नुसतं ऐकून वाटतं की बैठकीची लावणी असावी.

१९६८ मधे आलेल्या “Romeo and Juliet”चे टायटल सॉंग “A Time for Us”

https://youtu.be/4FHpmn-KYec

पण ओरिजिनलपेक्षा मला Andy Williams चे कवर व्हर्शन जास्त आवडते.

https://youtu.be/fnA6PIsYNaY

त्याचंच Dr. Zhivago मधल्या “Lara’s Theme” वर आधारीत “ Somewhere my Love”

https://youtu.be/YrRMQsnSvAE

चित्रपटामधे फक्त इंस्ट्रुमेंटल आहे पण हे जे काय गाणं आहे ते चित्रपटातही सुंदर वाटलं असतं.

एक थी दायन मधलं यारम्
याचं चित्रीकरण फार सुंदर वाटले.
प्रकाशयोजना, पार्टी चा माहोल , इम्रान, हुमा,कलकी आणि छोटा भावेश...सर्वांचा उत्तम सहज अभिनय...आणि या सगळ्याशी मिळते जुळते संगीत...

ल्या ल्या ल्या ल्या ..... रात हशी चांद हशी... ल्या ल्या ल्या ल्या
अमुमामींचे नवे गाणे - https://youtu.be/nUx1Z4yi0Sc
चाहत्यांनी गाण्याच्या फेसबुक आणि युट्युब लिंक्सखालच्या कमेंट्स चा आस्वाद घेतला असेलच Proud

दिल है मेरा दिवाना हे गाणं ऐकलं.
अभिजीतच्या आवाजात असतं तर जास्त छान वाटलं असतं. (राजू बन गया जंटलमन)

हरी स्तोत्र

अन्नमाचार्य आदि काही संतांनी कृष्णाचे इतके गोड लडीवाळ वर्णन केलेले आहे कन्नड वगैरे भाषांतून की ती गोडी चाखण्याकरता परत एकदा काय अनेकदा कानडी कुटुंबात जन्मास यावे लागणार Happy
ज्ञानेश्वरी, मोगरा फुलला, घनु वाजे रुणुझुणा आदि अनंत गाणी आत्ता या जन्मात ऐकता येतात हेही नसे थोडके.

‘रसिया’ आवडलं. आर्या वेगवेगळे प्रयोग करते आहे हे चांगलं. कारण तिचा आवाज स्टिरीओटाईप होऊ शकतो.

‘कारे से ही आवडलं.

दोन्ही गाण्यांचे लिरीक्स मात्र ठीकठाक होते. अजून चांगले गाणे लिहीता आले असते.

दस्तक चं नाव इतक्यातच दुसर्‍या कुठल्या तरी धाग्यावर वाचलं होतं.
बिल्कुल माहिती नव्हता हा सिनेमा. माई री मुळं माहिती झाला. पण यातली सगळीच गाणी सुंदर आहेत.

काल बैय्या ना धरो ओ बलमा हे गाणं युट्यूबने दाखवलं....
ते ही दस्तक मधेच आहे. मदन मोहन संगीतकार असल्याने असेल.

हम है मता -ए -कूंचा बाजार कि तरह हे सुद्धा सुंदर.
पण ही चाल खूप ओळखीची वाटतेय. बहुतेक दुसरं गाणं या चालीवरचं जास्त ऐकलेलं आहे.

रफीचं एक गाणं आहे,
खूप वेगळी चाल आहे. लोकप्रिय नाही पण छान बांधलेय. वाद्यं फारच कमी आहेत, मूड बघून.

आपले मायबोलीकर दीपक पवार. ते कथा लिहितात आणि कविता ही. सध्या मायबोलीला विसरलेले दिसतात. त्यांची ही एक कविता.
सपनानं तुझ्या मन रातभर व्यापलं
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं
कंकण आवाज
पैजणाचं नाद
रातभर घुमे
सखे तुझी साद
असं कसं राती मला आगळच वाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

नभातला चांद सखे तुझ्यावानी वाटला
तुझा श्वास गंध साऱ्या रानीवनी दाटला
दाटला सुगंध
वाऱ्यातून येई
गंधाळून मन
सखे माझं जाई
गंध तुझ्या पिरतिचं रातभर दाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

सरुनिया रात मग उजाडता दिस
फुलापरी मन माझं उमलतं कसं
विखरून मनभर
सपनाचं ठसं
पिरतनं तुझ्या मन
भारलय जसं
असं कसं मन आता वागतय आगळं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

दीपक पवार.
इथे संगीत बद्ध केली आहे,
https://youtu.be/wFyTCuCXdPs?si=u2k7pzivz-u5yW9i

Pages