गो-शिकागो कार्ड घ्यावे का?

Submitted by स्वरुप on 22 July, 2008 - 23:07

मी आणि माझा एक भारतीय सहकारी या वीकेंडला शिकागोला जायचा प्लॅन करतोय...
मला खालील बाबतीत कुणी मार्गदर्शन करू शकेल का?
१. आमच्याकडे आयडीपी नाहिये... त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टला पर्याय नाहिये... ग्रेहाउंड बसचा कुणाला काही अनुभव?.... आम्ही डेटन ते शिकागो असा प्रवास करणार आहोत.
२. गो-शिकागो कार्ड घेण फायद्याच आहे का?
३. शिकागोमध्ये फिरण्यासाठी टॅक्सी हायर करावी का? कि ट्रेनचे नेटवर्क चांगले आहे.
४. हॉटेलसंदर्भात कोणी काही माहीती देउ शकेल का?
५. मह्त्वाची आकर्षणे बघण्यासाठी शहराच्या कोणत्या भागात रहाणे जास्त सोइचे आहे?

मी मायाजालातुन माहीती जमवण्याचा प्रयन्त करतच आहे.... पण मायबोलीकरांचा सल्ला कधीही मोलाचाच!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ट्रेनने फिरलो होतो शिकागो मध्ये.. काही अडचण आली नाही. जरासे चालावे लागते एव्हढेच.
जरा लांबचे हॉटेल घेतले होते (कुठल्या तरी west side विमानतळानजीक)..तिथुन स्टेशन जवळच (विमान्तळावरच) होते. हॉटेलची रात्री १२ पर्यत मोफत गाडीची सोय होती विमानतळासाठी...तीच वापरली होती...
आता मला नक्की सगळे आठवत नाही..हॉटेल wisconsinला जायच्या highway जवळ होते..मी कार तिथे लाऊन ट्रेनने फिरलो...तिथे बोटिवरूनही फिरलो... तिथे २ उंच इमारती आहे ना? एकावरच गेलो होतो.. indian marketही फिरलो होतो (ट्रेन स्टेशन पासून ते बरेच दूर आहे.. येताना बस ने आलो ट्रेन स्टेशन वर.. ) कुठलातर्री डे पास काढला होता.. त्यने ट्रेन आणी बस दोन्हीने फिरता यायचे.. हे सगळे १ दिवसात केले...

१. आमच्याकडे आयडीपी नाहिये... त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टला पर्याय नाहिये... ग्रेहाउंड बसचा कुणाला काही अनुभव?.... आम्ही डेटन ते शिकागो असा प्रवास करणार आहोत. >>>> हो मी प्रवास केलाय बस नी विषेश काही प्रॉब्लेम नसतो.. आजूबाजूची माणसं जराशी भितिदायक असतात पण लक्ष देऊ नये.. तुमच्या इथे मेगाबस असेल तर बघा... तिची serivce चांगली आहे... किंवा ट्रेन हा पर्याय असेल तुमच्या इथे तरी बघा.. वेगळा अनुभव आहे.. पण ती ट्रेन फार हळू चालते... शिकागो ची मेट्रो आणि बर उत्तम आहे.. downtown मधे गाडीची गरज नाही...
२. गो-शिकागो कार्ड घेण फायद्याच आहे का? >>>> माझ्यामते नाही... तुम्ही ठरवून घ्या नेट वरून काय काय बघायचं ते.. आणि त्याप्रमाणे प्लॅन करा.. शिकादो रिवर मधली architechtural tour खूप मस्त असते.. लेक आणि ती अश्या दोन्ही टुर अवश्य करा...
३. शिकागोमध्ये फिरण्यासाठी टॅक्सी हायर करावी का? कि ट्रेनचे नेटवर्क चांगले आहे. >>>>> अजिबात गरज नाही .. Train is best option... 2 दिव्साचा पास ७ $ ला मिळतो.. तो घेतला की झालं...
४. हॉटेलसंदर्भात कोणी काही माहीती देउ शकेल का? >>>> ओ'हेर एअरपोर्ट जवळ मिळतात चांगली हॉटेल... hotwire वर चांगली deals मिळू शकतिल...
५. मह्त्वाची आकर्षणे बघण्यासाठी शहराच्या कोणत्या भागात रहाणे जास्त सोइचे आहे? >>>>> मह्त्वाची आकर्षणे downtown मधे आहेत.. पण तिथे हॉटेल्स महाग असतिल.. सो ट्रेन जवळ असणार्या हॉटेल मधे रहा कुठेही...
अजून काही माहिती हवी असेल तर जरूर विचारा.. Happy

एडीएम,
खुपच उपयुक्त माहिती!
काही कारणानं मागच्या वीकेंड्चा आमचा शिकागो प्लॅन रद्द झाला.... पुढ्च्या प्लॅनिंगसाठी तुमच्या माहितीचा खुप उपयोग होइल.