ऋतू येत होते ऋतू जात होते

Submitted by ar_diamonds on 22 July, 2008 - 07:08

(मी गझल कार्यशाळेला नव्हतो. तरी एक प्रयत्न....अभ्यास म्हणून....)

ऋतू येत होते ऋतू जात होते
तुझे गीत माझ्या श्वासात होते

न्याहाळीत होते जरी मीच मजला
प्रतिबिंब तुझे आरशात होते

धुंद चांदव्यात फुलला देह सारा
मुक्त भावनांची बरसात होते

रंगले कितीही ऋतू रंगात मी रे
शामली तुझी शाम रंगात न्हाते

ओठांवरी ओस थरथरारे
स्मरणी सख्या रे मनी चिंब होते

दाटूनी येता सयींचा उमाळा
उरी प्राणशक्ती कंठात येते.

गुलमोहर: 

राजीव,
तुम्हाला दाद ने सांगितले आहेच. मी परत सांगतो.. तुम्ही जरा घाई करत आहात.. दाद ने दिलेल्या दुव्यावरून गझलेची बाराखडी परत वाचा...

ह्या गझलेचे वृत्त आहे लगागा लगागा लगागा लगागा

तुमच्या पहिल्याच शेरामध्ये वृत्तभंग झाला आहे...

तुझे गीत माझ्या श्वासात होते
लगागा लगागा गागा लगागा म्हणजे एक लघु कमी आहे..

तुझे गीत माझ्याच श्वासात होते असे करुन ही कसर भरून काढता येईल पण मग तो 'च' भरीचा तर वाटत नाहीये ना ह्या दृष्टीने विचार करावा लागेल... गजल लिहिताना हि सगळी तारेवरची कसरत करावी लागते... ती सहज जमली तर ठीक नाहीतर मजा येत नाही.. मीही शिकतोच आहे तुम्ही पण नक्की शिकालच...

असाच विचार बाकीच्या शेरांबद्दल करून पहा...
५ व्या शेरात यमक चुकले आहे..
आणि प्रत्येक शेरात वृत्तभंग झाला आहे...

अजून कसून अभ्यास करायला हवा

शुभेच्छा

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

      milya,
      many many thanks.
      infact I wanted these type of real opinions ,so that I can correct myself . I am waiting for Daad's opinion.
      I visited gazal karyashala & posted instant thoughts arrived in my mind. I have not taken any efforts , then I will not come to know my mistakes,which inturn gives me chance to improve.

      I am basically Gujrati person writes in hindi,english,marathi & gujrati - without availability of any guidance which I wanted the most.

      Thnx again.

      एआर्_डायमंड्स,
      कृपया गजल कार्यशाळा वाचा. वैभवने इतकं सुंदरपणे विशद केलं आहे की, बोलून सोय नाही.
      मिल्याने वरती सांगितलं आहेच.
      तुमचा प्रयत्नं स्तुत्य आहे.
      पुढील लेखनास शुभेच्छा.

      दाद,

      मी आत्ताच गजल कार्यशाळेस भेट देतो.
      असेच तुम्हां सर्वांचे मार्गदर्शन असावे.

      धन्यवाद

      गझल कार्यशाळा वाचून झाली की वृत्त मात्रा लघू गुरू विषयी थोडीफार माहिती http://www.marathigazal.com/node/542 इथे आहे. ती ही वाचा.

      पु.ले.शु.
      नचिकेत

      नचिकेत व्वा फार छान माहिती दिली आहेस वृत्तांविषयी

        ================
        ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
        रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

          -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!