तस्वीर्-ए-दुबई

Submitted by दिनेश. on 21 July, 2011 - 13:47

तसे दुबईला माझे वारंवार जाणे होते, पण बहुतेकवेळा मी ट्रांझिटमधे असल्याने एअरपोर्टच्या बाहेर जाणे
होत नाही. यावेळेस मात्र मोठा हॉल्ट होता. तब्बल अकरा तासांचा, त्यामूळे व्हीसा वगैरे घेऊन, बाहेर
जायचे ठरवले.

मागच्या वेळी गेलो होतो तो डिसेंबर २००८ ला. त्यावेळी हवामानाचा त्रास झाला नव्हता. पण यावेळी
भर उन्हाळ्यात गेलो होतो. शिवाय दिवसही चुकीचा निवडला गेला. माझी उतरायची वेळ, पहाटे साडेचार.
(या कारणांसाठीच दुबईतल्या मित्रांना त्रास दिला नाही.)

साडेचारला उतरलो तरी बाहेर पडेस्तो ६ वाजले. दुबईमधे १० वर्षांपूर्वी मी महिनाभर राहिलो होतो, त्यामूळे
परिसर ओळखीचा होता. पायीच भटकलो, पण मग उन्हाचा त्रास व्हायला लागला (तपमान ४२ अंश से.)
आता त्या तपमानाची सवय राहिली नाही.
शुक्रवार म्हणजे दुबईवासीयांचा खास झोपायचा दिवस. त्यामूळे रस्ते सुनसान. मला काही खास वस्तू
घ्यायच्या होत्या, म्हणून दुकाने उघडेपर्यंत वाट बघावी लागली. तसे दुबईतले बहुतेक मॉल्स बघितले
आहेत, पण हा माझा खास जिव्हाळ्याचा. तिथेच वेळ काढला. तिथेही सर्व सामसूमच होती.
मागच्यावेळी मेट्रोचे काम चालू होते, तसे ते अजूनही चालू आहे, पण काहि लाइन्स सुरु झाल्या आहेत.
शुक्रवार असल्याने मेट्रो दुपारनंतरच सुरु होणार होती, त्यामूळे ती सवारी राहिलीच.

तर तिथली काही प्रकाशचित्रे.. दोन भागात.

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरंच लखलखीत ..

>> सोलर एनर्जीचा फायदा !

गो डीजे! खरी कॅलिफोर्नियाकरीण शोभतेस .. Happy

छान फोटोज Happy

लालू, मामी Lol

दुबई म्हनजे नेहमी झगमगाट चकमकाट असेच फोटो दिसतात....

दिनेशदा, ते पहिले फोटो कुठल्या मॉलचे आहेत... एकदम रस्टिक डिझाईन आहे... आवडले Happy

दुबई चा शेख झायेद रोड, मॉल्स, ओव्हरऑल अर्किटेक्चर बघून यु एस मधले मॉल फार दरिद्री वाटायला लागतात..
बरेचसे ब्रँड्स इथे पाहिलेलेच असतात पण प्रेझेंटेशन, एंट्रन्स असा कि राज महालात जातोय ( इबेन बतुता मधे साध्या गॅप चा एंट्रन्स पर्शिअन महाला सारखा.)
सर्वात सुंदर म्हणाजे त्यांच्या साध्या काळ्या बुरख्याच्या ड्रेसची बुटिक्स..ते डिझाइन केलेया डिझायनर्स ची क्रिएटिव्हिटी.. काळ्यावर स्वॉरोस्कीचं एक से एक नाजुक काम, उंची लेस लावलेले हिजाब.. काळा बुरखा ड्रेस सुध्दा इतके सुंदर असु असतात हे पल्यांदाच जाणवलं, रेड कार्पेट वर सुध्दा शोभतील :).
तिथल्या मुलींची सिगनेचर स्टाइल म्हणजे 'गिफ्टेड' नॅचरली ग्लोइंग स्किन, धारदार नाक, स्मोकी आय मेक अप, उंची (काहीसे स्पायसी) परफ्युम्स आणि अतिशय रिच दिसणारे बुरखा ड्रेसेस :).

सर्वात सुंदर म्हणाजे त्यांच्या साध्या काळ्या बुरख्याच्या ड्रेसची बुटिक्स..ते डिझाइन केलेया डिझायनर्स ची क्रिएटिव्हिटी.. काळ्यावर स्वॉरोस्कीचं एक से एक नाजुक काम, उंची लेस लावलेले हिजाब.. काळा बुरखा ड्रेस सुध्दा इतके सुंदर असु असतात हे पल्यांदाच जाणवलं, रेड कार्पेट वर सुध्दा शोभतील

>>>> अगदी अगदी. मी एक साध्यातला पण सुरेख नक्षीकाम केलेला बुरखा (गळ्यापासून खाली, पायघोळ. ते वरचं टोपरं नव्हतं घेतलं अर्थात!) दुबईला विकत घेतला होता. म्हटलं किमान घरातल्या घरात नाहीतर झोपताना वापरीन. दोन्-चारदा घातलाही. पण फारच भगभगीत काळा रंग. आणि शिवाय सिंथेटीक. मग मागेच पडला. Happy

झकास..

छानेत फोटो Happy

शुक्रवार म्हणजे त्यांच्या साप्ताहीक सुट्टीचा वार ना? मग त्यादिवशी इतकी सामसूम?? आश्चर्यच आहे.

शुक्रवार म्हणजे त्यांच्या साप्ताहीक सुट्टीचा वार ना? मग त्यादिवशी इतकी सामसूम?? आश्चर्यच आहे.>> दुपारी दोन पर्यंत असते सामसुम. नंतर वरील ठिकाणी प्रचंड गर्दी होते.

डिजे, काळ्याच ड्रेसवर काळ्याच रंगाने केलेले नाजूक भरतकाम, अफलातून असते.
तो मॉल बुर्जअमान.
पण मला यापेक्षा मस्कतमधल्या इमारती आवडतात. तिथले मॉल्सच नव्हेत तर बँका सुद्धा उत्तम सजवलेल्या होत्या. आता एक फेरी मारायला पाहिजे तिथे.

दिनेशदा,

तुमचा पहीला लेख आता पाहीला, फोटो सुन्द् र आले आहेत.
ओमान अतीशय सुन्दर आहेच. प्रत्येक फ्रेममध्ये. विशेष मस्कत निझवा रस्त्यावर लागणारे छोटे डोगंर. एकाच डोगंरात किती रंग छटा दिसतात.
मस्कत शहरात दिसणारी हिरवळ व स्वछता. अतीशय सुदंर शहर. मस्कतच्या आठवणी ५ वर्षांनीही मनात तशाच आहेत.

स्वच्छ सुंदर रस्ते.... मला त्या देखण्या कमानी आणि ती बोट आवडली. रस्टिक अँड रिच लूक.

मार्केटर बरोबर च्या मीटींग साठी गेल्या वर्षी दुबईला जाणे झाले होते. चांगला , दूरदृष्टीचा राज्यकर्ता असला की कसा विकास होतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दुबई !!

विवेक,
तो रस्ता, रुश्ताक चे गरम पाण्याचे झरे, नाखल ची नदी, मझारे मधली नदी, कंताब बीच, सलालाह, धोफार, कुरुमच्या समुद्रात दिसणारा तो पिवळा खडक, सूर मधली कासवे, कुरियतमधली आंब्याची झाडे, वादी कबीर च्या पुढचा प्रचंड उताराचा रस्ता सगळेच फार सुंदर आहे.
अकु,
यापेक्षा मस्कतमधल्या कमानी अतिभव्य आणि कलात्मक आहेत. ओमान, दुबईपेक्षा जरा मागे पडलेय, पण जास्त सुंदर आहे.
सुनिल, बरंच बघायचे आहे अजून (जगातले संखेने जेमतेम दहा टक्के देश बघून झाले !!)
श्री.. दुबईकडे फारसे तेल नाही, पण दूरदृष्टी नक्कीच आहे.

Pages