होतकरू झाड

Submitted by अभय आर्वीकर on 18 July, 2011 - 01:11

होतकरू झाडमला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

                                                 गंगाधर मुटे
-----------------------------------------------------
(नव्या यमांची नवीन भाषा    या गझलेतील शेर)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जमली !

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा >> प्रचि आणि कविता दोन्ही मस्तच Happy

बापरे खल्लास. खरच ह्या खडकावरही ते झाड कस मस्त फोफावलय. सलाम त्या झाडाला आणि गंगाधरजी तुम्हालाही. मला वाटत ते आईनाच झाड आहे.

<<< मला वाटत ते आईनाच झाड आहे. >>>

आमच्याकडे येनाच लाकूड म्हणून ओळखले जाते, ते हे येनाच झाड तर नाहीना?
तसे असेल तर हा विषय पुन्हा पुढे नेता येईल.

कांडोळ किंवा ऐन ह्या दोन पैकी एक आहे.

मुटेजी हे झाड रोज पाहण्यात आहे का तुमच्या ? त्यावर फळे वगैरे कशी येतात ते माहीत आहे का ?

मस्त Happy

मस्त

मस्त

<<< हे प्रचि तुम्ही स्वतःने काढले आहे का? >>>

मनिमाऊ,
होय. मीच हे चित्र काढले आहे. छत्तीसगढ मध्ये डोंगरगढ नावाचे गाव आहे. ते ठीकाण "माँ बम्लेश्वरी" म्हणून प्रसिद्ध आहे. तिथला आहे हा फोटो.

त्या झाडाची "चिकाटी" पाहून मी एवढा गूंग झालो की ते झाड कशाचे आहे. त्याची "जात" कोणती याकडे लक्ष गेलेच नाही. त्यामुळे ते झाड कशाचे हे मला माहीत नाही.

ते झाड येनाचे असेल किंवा नसेल हेही माहीत नाही.

(मात्र अत्यंत टणक आणि कणकरता हा येणाच्या लाकडाचा गूणधर्म आहे, एवढे मला माहीत आहे.)