निशाणी

Submitted by ar_diamonds on 21 July, 2008 - 05:16

येऊ नकोस पुन्हा तू नेहमीच्या त्या ठीकाणी
मिटवून आलो आहे मी जुनी सर्व निशाणी,

ह्रदयाने रक्त ओकले निशाणी मिटवतांना
दु:ख तितुके नाही मज तुला विसरतांना,

केला काय गुन्हा मी तुज जीव लावतांना
भेटली ना एकवार तू दूरदूर जातांना,

ते स्वप्नं बांधतांना स्वर जेंव्हा आले जुळूनी
का छेडले बेसूर, मन वीणेच्या तारांनी.

गुलमोहर: 

नमस्कार राजीव. दादने तुम्हाला 'गझल कशास म्हणतात ?' याविषयी मार्गदर्शन केले आहे. त्याकडे तुम्ही लक्ष दिले असेलच. शिवाय मायबोलीवर एक उत्कृष्ठ गझल कार्यशाळा झाली होती. तिचा दुवा - http://www.maayboli.com/hitguj/messages/75/123104.html
इथे Archive through Feb25, 2007 पासून वाचनास सुरुवात करावी.
शुभेच्छा.

    ***
    माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
    एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि

    slarti

    धन्यवाद

    एक विचारू ?
    इथे माती कोण आणि कुम्म्भार कोण ?
    सहज गंमत हं.....