तू, मी आणि पाऊस

Submitted by चाऊ on 17 July, 2011 - 01:48

आतासा नुकताच मृग लागला
मजा येऊ लागलीय भिजायला
इतक्यात नकोस जाऊस
तू, मी आणि पाऊस

तुझ्या विना शर धारांचे
विंधती सर्वांगाला
ये जवळ, अंत नको पाहूस,
तू, मी आणि पाऊस

गारा वारा, अंग शिरशीरे
शिंकून झालीस बेजार, तरी
माझ्या सवे भिजायची हौस
तू, मी आणि पाऊस

तुझ्या सोबतीची उब
हाती वाफ़ाळता चहा, त्यात
स्वाद आल्याचा दिलखुश
तू, मी आणि पाऊस

शब्दखुणा: