कढी

Submitted by मी_आर्या on 12 July, 2011 - 04:53

या कवितेची प्रेरणा कोण हे सांगण्याची गरज आहे? Happy

कुठे रवीने घोटलेला
आंबटढाण ताकासारखा असलेला तु
नि कुठे खमंग भजीच्या पीठासारखी मी
कसे कुठुन कोण जाणे,
तुझ्यात विरघळत गेले...

कढीपत्ता नि मिरचीची फोडणी
असो की लसुण जीर्‍याची
तु तुझा स्वभाव सोडणार नाहीसच
पण तरी..
एक लक्षात आलं असेलच तुझ्या
माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!

जाऊदे, शिळ्या कढीला किती ऊत आणायचा...!

Pages