कढी

Submitted by मी_आर्या on 12 July, 2011 - 04:53

या कवितेची प्रेरणा कोण हे सांगण्याची गरज आहे? Happy

कुठे रवीने घोटलेला
आंबटढाण ताकासारखा असलेला तु
नि कुठे खमंग भजीच्या पीठासारखी मी
कसे कुठुन कोण जाणे,
तुझ्यात विरघळत गेले...

कढीपत्ता नि मिरचीची फोडणी
असो की लसुण जीर्‍याची
तु तुझा स्वभाव सोडणार नाहीसच
पण तरी..
एक लक्षात आलं असेलच तुझ्या
माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!

जाऊदे, शिळ्या कढीला किती ऊत आणायचा...!

माझी शैली वापरून जेवणाचं ताट वाढायला घेतलेल्या तुम्हा सार्‍या कलाकारांना (आर्या, वर्षा, भुंगा) ह्यांना माझा __/\__ Happy

अवघड आहे हे!!
दंडवत __/\__
Rofl

बागे, तू मायबोलीची "Celebrity" झालीयेस आता!
तुला पण दंडवत __/\__
Happy

हे हे हे Biggrin
अन हे तर लई म्हणजे लईच भारी >>>माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!

जाऊदे, शिळ्या कढीला किती ऊत आणायचा...!<<< मस्त गं Happy

अगं आर्या..... काय भारी एकसे एक लिहितेस... पण सदैव स्त्री-मुक्तीच्या पावित्र्यात असतेस बयो, असे का?
तरीही साष्टांग ____/\___ तुला... Happy

Pages