आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला... - मैत्र जिवांचे सामाजिक संस्था.

Submitted by ह.बा. on 11 July, 2011 - 02:40

**************************************************************************************************
**************************************************************************************************

दि. १० जुलै २०१० रोजी संपन्न झालेला मैत्र जिवांचे या संस्थेच्या उद्घाटनाचा अविस्मरणीय सोहळा संस्थेचे सचिव विशाल कुलकर्णी आपल्यापर्यंत पोहचवतीलच. मी येथे फक्त मदत करणार्‍या मायबोलीकर व इतरांचे आभार मानतो आहे.

उद्घाटनाविषयी माहिती मिळताच एका मायबोलिकराने संपर्क करून आर्थिक मदतीची तयारी दाखविली. तो मायबोलीकर आमचा पहिला दाता... आश्रमातल्या मुलांना मी आधी भेटून आलो होतो. त्यांच्याकडे बरीच खेळाणी होती बाकी वस्तूही होत्या पण सायकल नव्हती म्हणून आम्ही या मायबोलीकराला आम्हाला पैसे देण्याऐवजी या मुलांसाठी सायकल देण्याची विनंती केली. त्यानी ती मान्य केली. २८०० रुपयांची सायकल त्यानी स्वतः खरेदी करून चनस उर्फ अर्चना मजले (कार्यकारी मंडाळाच्या सदस्या) यांच्याकडे दिली.

पहिली सवारी.... (भेट देण्यापुर्वी)
cycle.jpg

भेट मिळताच कार्यक्रम सुरू आहे हे विसरून पडलेल्या उड्या...
c2_0.jpg

हा दंगा बघताच. आपण वादाचे पिल्लू घेऊन आळो की काय असे वाटले पण मुले समजुतदार आहेत. आणि चनसच्या आईनी दुसरी सायकल घेऊन देणार असल्याचे सांगितल्याने काळजी कमी झाली.

मुलांच्या आनंदाचे कारण बनलेल्या त्या मायबोलिकराचे मनापासून आभार. (तू संस्थेचा पहिला दाता आहेस. नाव सांगायची परवानगी द्यावी ही विनंती मित्रा)

आर्या यांच्यावर इतर वस्तू व खाद्यपदार्थ खरेदीची जबाबदारी होती त्याना मदतीची गरज आहे हे कळताच सुशांत मगर गाडी घेऊन मदतीला आले. ते उद्घाटनाला येणार असे त्यानी आधिच सांगितले होते पण काही कारणांनी ते येऊ शकले नाहीत. वेळोवेळी फोन करून कार्यक्रमाला सदिच्छा व मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार!

उद्घाटनानंतर सगळ्या मुलांना घेऊन सगळ्यांनीच पानशेतला जायचे ठरले होते आणि एवढी मुले आणि आम्ही सगळे म्हणजे गाडीचा प्रश्न होताच. भुंगा, डॉक्टर आणि विट्यावरून आलेले मार्गदर्शक श्री दत्ता गायकवाड यांच्या गाड्या होत्या पण लोक जास्त असल्याने अडचण येत होती. माझी दुचाकी प्रगो आणि सौ. प्रगो ला दिल्याने थोडी संख्या घटली पण तरीही दाटिवाटीच होत होती. ही अडचण समजताच श्री उमेश कोठीकर यांनी आपली गाडी आणि ड्रायव्हर मुलांच्या दिमतीला पाठवून दिले. संस्थेचा बराचसा खर्च वाचला आणि मुलांना आरामात प्रवास करता आला. त्यांचे विषेश आभार!

श्री. भुषण कटककर स्वतः येऊ शकले नाहीत पण त्यानी आर्थिक हातभार लाऊन या सोहळ्याला मदत दिली त्याबद्दल त्यांचे आभार!

चनसचे आई-बाबा आणि भाऊ या कार्यक्रमासाठी पुर्णवेळ उपस्थित राहिले. जाणकार, अनुभवी लोक सोबत असल्याने आम्हाला फार मोठा आधार मिळाला त्यांचे आभार!

डॉक्टरांच्या सौ. आणि त्यांची मुलगी दोघिंचे कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल आभार!

आर्याचा मुलगाही या मुलांसोबत राहून त्याना मदत करत होता. त्यांच्याशी खेळत होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्याचेही आभार!

दत्तात्रय गायकवाड (प्रशासकीय अधिकारी, बीएड कॉलेज विटा, सांगली) कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे व सोबत आलेल्या त्यांच्या विध्यार्थ्यांचे आभार!

प्रसाद गोडबोलेंच्या सौ. कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचेही आभार!

आमच्या सौ., मुलगा व बाबांचेही कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार!

फोन करून, एसेमेस करून सदिच्छा देणार्‍या सर्व मायबोलिकरांचेही आभार!
बाकी आम्ही सगळे...
भुंगा, डॉक्टर, प्रसाद (मुंबईहून) विजयराव (नाशिकहून) विशाल, आर्या, चनस आणि मी (पुणे) उपस्थित होतोच. आभार नाही पण धन्यवाद! विशालरावांची भलतीच धावपळ झाली त्यांना एक एक्स्ट्रा धन्यवाद!

आणि, हा सोहळा खर्‍या अर्थाने संस्मरणीय केल्याबद्दल स्पर्श बालग्राम परिवाराचे मनापासून आभार!!!

असाच लोभ असुद्यावा!!!!

- हबा
अध्यक्ष
मैत्र जिवांचे सामाजिक संस्था
*****************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह.बा. कार्यक्रमाची घोषणा मी कशी काय मिसली कोणास ठाउक?
विशाल च्या वृत्तांताची वाट पाहात आहे.
संस्थेला अनेक अनेक शुभेच्छा!
फोटो दिसत नाहीत. संपर्कातुन पाठवाल काय?
प्रत्यक्ष भेटीच्या अपेक्षेत,
मुग्धा.

आभारी आहे!

मीपण विशालच्या लेखाची वाट पाहतोय.

ज्याना मदत करण्याची/ सहभागी होण्याची इच्छा आहे त्यानी कार्यकारी मंडळातील कोणत्याही एका सदस्याशी संपर्क साधावा. कोणाचाच क्रमांक नसेल तर ९९२३६९५१८६ आहेच.

लवकरच वृत्तांत टाकतोय. मजकुर सगळा लिहून तयार आहे. फक्त डॉक्टर आणि भुंगा यांच्या कॅमेर्‍यातील फोटो येणे बाकी असल्याने थोडा थांबलोय. क्षमस्व.....
हब्या सगळ्यांचे आभार मानलेस पण गेले पाच महिने संस्थेच्या नोंदणीकरणासाठी एक हाती मेहनत घेणार्‍या एका व्यक्तीचे आभार मानायला विसरलास. चल, ते काम मी पुर्ण करून टाकतो.

शुभकार्याची, समाजकार्याची सुरुवात नेहमी स्वतःपासुन करायची हे तत्व पाळून आपल्या आज्जीची मालखेड येथील जागा संस्थेसाठी स्थायी पत्ता म्हनून मिळवून देण्यापासून ते सर्वांची कागदपत्रे गोळा करणे , किती तरी वेळा सातार्‍याला 'धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात चकरा मारून' संस्थेच्या नोंदणीकरणासाठी धडपड करणे. त्यानंतर उद्घाटनासाठी 'स्पर्श'ची निवड केल्यावर स्पर्शच्या महेशभैय्यांना भेटून त्यांची परवानगी काढणे ही सर्व कामे एकहाती करणार्‍या श्री. हबा यांचे मनःपूर्वक आभार! Happy

चाफ्या, मी तूला फोन करतो. तू नक्कीच मदत करु शकशील. धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार !!

<<शुभकार्याची, समाजकार्याची सुरुवात नेहमी स्वतःपासुन करायची हे तत्व पाळून आपल्या आज्जीची मालखेड येथील जागा संस्थेसाठी स्थायी पत्ता म्हनून मिळवून देण्यापासून ते सर्वांची कागदपत्रे गोळा करणे , किती तरी वेळा सातार्‍याला 'धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात चकरा मारून' संस्थेच्या नोंदणीकरणासाठी धडपड करणे. त्यानंतर उद्घाटनासाठी 'स्पर्श'ची निवड केल्यावर स्पर्शच्या महेशभैय्यांना भेटून त्यांची परवानगी काढणे ही सर्व कामे एकहाती करणार्‍या श्री. हबा यांचे मनःपूर्वक आभार<<<

अगदी अगदी!! हबाच्या नेतृत्वाला, धडपडीला आम्हा सदस्यांचा मनःपुर्वक सलाम!