आपल्या सुखास बांधूयात घर(तरही)

Submitted by कमलेश पाटील on 9 July, 2011 - 00:10

पांघरे उनातही मला पदर
खोल खोल आतवर तुझि नजर.

मी तुझ्यात राहता सुखावले;
मम कशास लागते अता शहर

मम सुखाचा पाश घालता तुझा
कोवळ्या मनास या नवा बहर.

मोकळाच हा इथे झुले झुला;
आठवे तुझी मना ढाळी कहर.

दु:ख दाटले सभोवती किती
आपल्या सुखास बांधूयात घर

गुलमोहर: 

आपल्या सुखास बांधुयात घर>>

शेवटचा शेर छान! काही र्‍हस्व दीर्घ बदलावे लागेल बहुधा. Happy

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

वृत्त तपासून पहा .

मतला व

दु:ख दाटले सभोवती किती
आपल्या सुखास बांधूयात घर......हे शेर आवडले. Happy