Submitted by ar_diamonds on 19 July, 2008 - 06:48
पहिलाच पाऊस, पहिला सुगंध
पहिल्या-वहिल्या नात्यातील रुणानुबंध,
काऊचिऊच्या घासाची पहिलीच वाटी
पहिलीच शाळा पहिलीच पाटी,
पहिलीच मॅत्रिण, पहिलेच कोलेज
जिवाभावाच्या प्रेमाचे पहिलेच नोलेज,
पहिलीच नोकरी, पहिलाच पगार
पहिलं लग्न, पहिला संसार,
पहिला विरह, पहिली दिवाळी,
प्रेमात रंगलेली पहिलीच होळी,
रुणानुबंधाचा पहिलाच काळ
पहिलीच ममता, पहिलेच बाळ,
पहिल्या बाळाचे पहिलेच पाऊल
नव्या जिवनाची नवी चाहुल,
पुन्हा, काऊचिऊच्या घासाची पहिलीच वाटी
पहिलीच शाळा पहिलीच पाटी.
गुलमोहर:
शेअर करा
ar_diamonds, ही
ar_diamonds, ही गजल आहे का? आणि असल्यास का?
daad तुमची
daad
तुमची खरंच दाद द्यावी लागेल.
ही गझलंच आहे. तुम्हा-आम्हां सर्वांच जीवनचक्र.... एक वास्तव्...सत्य....
धन्यवाद
डायमंड....
डायमंड.... चांगल जमलय!
पण हे थोडफार त्या गारवातल्या कवितेसारख वाटतय का हो? (एक भा. प्र.)
ar_diamonds, गजल
ar_diamonds, गजल ह्या काव्यप्रकाराबद्दल मी खूप काही सांगू शकणार नाही, पण जे काही वाचलय त्यानुसार गजलेला एक स्वतंत्र व्याकरण आहे. मुळात एखादी कविता "गजल" म्हणून ओळखली जाण्यासाठी तिला एका वेगळ्या मुशीतून बाहेर पडावं लागतं.
अक्षरवृत्त, मात्रावृत्त संभाळून, यमक, अंत्ययमक हे सगळं जुळायला हवं. इथे २० गूण आणि २७ गूण चालणार नाहीत. सगळे छत्तीस जमायला हवेत.
गजलेची बाराखडी (मा. सुरेश भट) इथे वाचायला मिळेल. http://www.marathigazal.com/
तिथेच गजलेची एक कार्यशाळाही वाचायला मिळेल.
इथे मायबोलीवरही एक कार्यशाळा घेतली होती... त्या लिन्कचं उत्खनन करायला आत्ता वेळ नाही. पण ती ही जरूर देईन (कुणाकडे असल्यास जरूर द्या रे). शिकण्याचा एक अप्रतिम अनुभव!
आपल्या लेखनाला माझ्या मनापासून शुभेच्छा.
ar_diamonds दाद
ar_diamonds दाद यांचे म्हणणे बरोबर आहे, त्यांनी दिलेल्या लिंक वर जाऊन माहीती वाचा.
daad , आपण जी
daad ,
आपण जी मोलाची माहिती दिलीत त्या बद्दल मी मनापासून आभारी आहे.
ख्ररं म्हणजे मी या बाबतीत तितका सखोल माहीतगार नाही.
मला तुमचा अभिप्राय मनापासून आवडला.
माझी आपली एक साधी व्याव्खा आहे.....
उत्कट भावनांचा सुंदर आणि उस्फुर्त शब्दाविश्कार म्हणजे कविता
तिला लय आणि साज चढला कि तीचे होते गीत
हे गीत जेंव्हा ह्रदयाच्या तारांना छेडते तेंव्हा होते ती गझल.
धन्यवाद.
फारच
फारच सोप्पी व्याख्या आहे ही.
(तुमची आणि मला माहीत असलेली गजल वेगळी दिसतेय, तर. )
गजल ह्या काव्यप्रकाराची आधीच व्याख्या झालीये. मराठीत नाही, उर्दूत. तिथेही नग्मे आहेत... पण त्यांना गजल म्हणत नाहीत.
असो... तुमच्या ह्या गजलेला काही वेगळा काव्यप्रकार म्हणता आला तर बरं होईल.