रावेरी - सीतामंदीर

Submitted by अभय आर्वीकर on 3 July, 2011 - 00:03

रावेरी - सीतामंदीर

रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे.
प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते.

लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते.

अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने या मंदीराच्या जिर्णोध्दाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मंदीराचे काम पूर्ण केले.

या मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांनी सिंहाचा वाटा उचलला, प्रथम त्यांनी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला. पण मंदीराची जिर्णावस्था पाहता तो अपुरा पडल्याने स्वतः वैयक्तिक १० लाख रुपये दिले.

मंदीराचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे.

दि. १५ नोव्हेंबर २०१० रोजी मा. शरद जोशीं यांनी रावेरी येथील सीतामंदीरास भेट देवून पाहणी केली.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख, आदी उपस्थित होते.

या विषयावर यथावकाश संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
sharad Joshi
* * * *

गुलमोहर: 

मुटे, सीतेच्या मुर्तीचा फोटो पुढच्यावेळी अवश्य टाका. सीतेचे देऊळ कुणालातर बांधावेसे वाटले, हिच आनंदाची बाब आहे.

nice

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दिनेशदा,
मंदीराच्या गाभार्‍याचे चित्र टाकले आहे. Happy

मुटेजी, तुम्ही फोटो दिले म्हणून मला कळालं तरी की सीतेचं मंदीर आहे हे. खूप खूप धन्यवाद.

राम-नवमी सारखी सीता-नवमी पण असते; वैशाख शु. नवमी ही सीता-नवमी, पण...........

सीता-नवमी बद्दल मला काहीच माहिती नव्हती.
रावेरीला सीता - नवमी साजरी केली जाते की नाही, या विषयी माहीती घ्यावी लागेल.

आपण सीता-नवमी बद्दल विस्तृत लिहाना. Happy

धन्यवाद!!!

सीतेच मंदीर आहे हे पहिल्यांदाच समजलं.

चांगलं काम केलं शेतकरी संघटनेने , पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा !>>>>> अनुमोदन!

अरे व्वा ! सीतानवमीच्या सुदिनी हा धागा वर काढल्याबद्द्ल धन्यवाद !

मी हा धागाही पाहिला नव्हता आणि सीता मातेचे मंदिर आहे हेही ठाऊक नव्हते.

सीता नवमीबद्दल जेव्हढे माहित आहे ते लिहिते.

ज्यावेळी महाविष्णू सगुण साकार रुपात अवतार घेतो त्या प्रत्येक वेळी त्याची अर्धांगिनी लक्ष्मी ही सुद्धा त्याच्या पाठोपाठ अवतार घेते.

रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी या दिवशी असते तर सीता नवमी यानंतर बरोबर एक महिन्यानंतर वैशाख शुद्ध नवमीस येते.

तसेच
कृष्णजन्म - श्रावण वद्य अष्टमीस व राधाष्टमी यानंतर बरोबर एक महिन्याने भाद्रपद वद्य अष्टमीस, तेव्हा राधेचा जन्मदिन असतो.

सीतानवमीच्या दिवशी राममंदिरात जाऊन सीतेची ओटी भरली जाते. तसेच या दिवशी सीतेबद्दलचा खालील श्लोक १०८ वेळा जपतात.

रामकार्य अधिष्ठात्री सीता फलदायिनी I
नित्य शुद्धा शुद्ध इच्छा इच्छाकृतिवर्धिनी I I

सरल अर्थः- श्रीराम कार्याचे अधिष्ठान असलेली सीता ही फलदायिनी- कर्माचे फळ देणारी शक्ती आहे. ती नित्यत्वाने म्हणजे कायम शुद्ध अर्थात पवित्र अशी इच्छा असून अशा शुद्ध इच्छेचे रुपांतर आकृतीत म्हणजेच कर्मफलात करून ते शुद्ध कर्मफल वाढवत नेणारी अशी ही सीता अहे.

भावार्थः- मानवी मनात सीता ही मनातील पवित्र अशा इच्छेच्या रुपात रहात असते व त्या इच्छेचे ती वर्धन करत असते. अर्थात शुद्ध मनात येणारी प्रत्येक कल्पना ही पवित्र कर्माच्या रुपेच फलित होत असते.

धन्यवाद.