मनाचं मंथन

Submitted by स्वप्ना_तुषार on 1 July, 2011 - 00:54

आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं
असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ...
का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं ..
बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली.
खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता.
ब-याच दिवसांच्या आत दाटलेल्या वेदनेला मोकळी वाट मिळाली ..हो डोळ्यांनीच ती करून दिली. अस्ं होतं खरं बरेचदा; आपल्या आत खूप काही ठसठसत असतं, टोचत असतं, बोचत असतं , कधी कधी उमलूनही येत असतं पण ते व्यक्त करण्याला एक तर वेळ नसतो किंवा आळस असतो. मग एखादी बंडखोर भावना बंड करून उठते आणि तिच्यापुढे आपलं काहिच चालत नाहि. सतत दुर्ल्क्षित राहिलेल्या एखाद्या समाजासारखं तिचं होतं. मनाला तर कायमचीच या अश्या गोष्टींकडे दुर्ल़क्ष करण्याची आपणच लावलेली सवय एक दिवस महागात पडते आणि भावना कागदावर उतरावाव्या तरी लागतात नाहितर आपणच मूक श्रोता होऊन त्या ऐकाव्या तरी लागतात. अश्या भावना कविच्या मनात उसळल्या की तो त्यांना कवितेचं रूप देतो, लेखक एखादा सुंदर लेख घडवतो तर चित्रकार त्याच्या कॆन्व्हास वर मन:स्पर्शी चित्र रेखाटतो. भावना त्याच; पण अभिव्यक्ती वेगळी!! अशीच एखादी कोंडलेली भावना जग हालवायलाही पुरेशी ठरते.
मनाचं मंथन वाटतं तितकं सोपं नसतं
कितीतरी जहाल उपसावं लागतं
कितीतरी सुखद नाकारावं लागतं
काहिहि कितीही कसंही असो आहे तसं कपाळावर कोरावं लागतं
खरंच फ़मुशिंदेंनी केलेलं मनाच्या मंथनाचं वर्णन किती सार्थक आहे नाही!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

य्ये बात.............! हिच ती स्वप्ना, मस्त, खुप मनापासुन केलेले लिखाण........
<खरंच फ़मुशिंदेंनी केलेलं मनाच्या मंथनाचं वर्णन किती सार्थक आहे नाही!<> हे काय?
:गोंधळात पडलेली बाहुली:

अगं शेवटी लिहिलेल्या चार ओळी कवी फ मु शिंदेंच्या आहेत.
मुग्धानन्द तुझ्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले Happy
धन्स डुआय Happy