त्याला एकटक पाहत बराच वेळ बसलो होतो मी -
तो स्वतःच पाऊलभर चिखलात बुडालेला.
खाली जुन्या उन्हाने घायाळ झालेल्या जमिनीवर
नुकत्याच आलेल्या फुंकरपावसाचा ओलावा..
स्वतःशीच पुटपुटत त्याने खाली बसून
थोपटलं मातीवर - आणि बाजूला केलं तिला.
खाली होते तिच्या आत रूतलेले तण, कुजलेली मुळं, हट्टी दगड.
ते सगळं काढायला जरा जडच गेलं त्याला,
पण त्याने काढले - निर्विकारपणे ओढून ओढून!
सनातन आदिम श्रद्धेने आकाशाकडे पाहिलं मग!
आणि धोतराच्या सोग्यात बांधून आणलेले मूठभर कोवळे दाणे पेरत बसला..
मग अपार जिव्हाळ्याने बराच वेळ माती पुन्हा सारखी केली
आणि घाम पुसत शांतपणे खाली बसला.
सगळं झाल्यावर माझ्याकडे लक्ष गेलं त्याचं.
हसला, म्हणाला - खणावं लागतं अधूनमधून -
मोकळं करायला, मोकळं व्हायला,
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...
तिथून निघताना मी भलत्याच विचारात!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2011/06/blog-post_18.html)
पुन्हा सर्वांचेच आभार...
पुन्हा सर्वांचेच आभार...
ललित, ह्मम्म्म....
दाद, हा शब्द तुमच्या कवितेत अजून खुलून दिसेल ही खात्री वाटते मला... तसं होणं "हा माझा सन्मान", एवढंच म्हणू शकतो..
मानसी, जी.ए.????? बाबो!!
स्वाती ताई, सविस्तर बोलूच.. पण ही प्रतिक्रीया खूप मोलाची आहे माझ्यासाठी!
ऋतुवेद, नि:शब्द केलंस बघ! निदान शेवटचं वाक्य तरी माझ्यासाठी ठेवायचं होतंस... असो.. still i will say it, लोभ आहेच, असाच असू द्यावा...
एकदम मस्त..... कविता आवडली
एकदम मस्त..... कविता आवडली
सुंदर अप्रतिम
सुंदर अप्रतिम
विनिता, नाचरा thanks!
विनिता, नाचरा thanks!
टू गुड्डू
टू गुड्डू
अतिशय सुंदर. खूप आवडली कविता.
अतिशय सुंदर. खूप आवडली कविता.
छान...!
छान...!
सुंदरच...
सुंदरच...
सही.. फुंकर पाउस.. सलणारं
सही.. फुंकर पाउस..
सलणारं काढायला, फुलणारं भरायला
सही..सही..सही
gr8888...... last
gr8888......
last stanza....just awesome...
मनाला
मनाला भीडली........................फारच सुरेख
आयुष्य घ्यावं एकदा खणायला!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! ->>
भारी राव एकदम भारी
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!
सलणारं काढायला, फुलणारं
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...
>>> अ हा हा!!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला >>>>>
....छान ..... पटण्यासारखा विचार
आयुष्य घ्यावं एकदा खणायला!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला>>>भिडल मनाला.
खूप खूप आवडली.
फुंकरपावसाचा ओलावा.....
फुंकरपावसाचा ओलावा..... व्वाह...
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! - >>> ज ब री....
सही लिहिलय..... झकास
एकदम थेट..........
आवडली...
सुरेख आणि आशयपूर्ण.
सुरेख आणि आशयपूर्ण.
थँक्स लोक्स! बागेश्री,
थँक्स लोक्स!
बागेश्री, पद्मजा,
मस्त...
मस्त...
Pages