पप्पा माझे..

Submitted by जुई on 29 June, 2011 - 04:06

पप्पा माझे..
ऑफिस वरून येताना रोज खाऊ आणायचे..
रात्रि जेवण झाल की रोज फिरायला न्यायचे..
बोटाला धरून फिरताना स्पेलिंग पाठ व्हायचे..
छोट्याशा M80 वर आम्हाला घेउन फिरायचे,
एकटे मात्र व्यायाम होइल म्हणत चालत जायचे...

१०वि नंतर त्यांनी interior ला नाही जाऊ दिले..
graduation नंतर तुला हवं तर कर म्हणाले..
आता माला त्यामागची त्यांची दूरदृष्टी दिसते..
शिक्षणावाचून आड़ू नए ही काळजी असते..

आजही पप्पा तसेच आहेत..
boxer जुनी झालीए आता, kick मारून पाय दुखतो..
पण नविन गाड़ी आधी त्याना किमतीचा आकडा दिसतो..

कार घेऊ म्हणाले तर गरज नाही म्हणतात..
"लग्न पार पाडायचं आधी" डोळे त्यांचे बोलतात..

किती कराल पप्पा? तुम्ही दमत कसे हो नाही?
डोळे हसतात फक्त उत्तर काही मिळत नाही..

त्यांच्या वागन्या- बोलान्यातुन मला एकच दिसतं...
प्रत्येक बाबांच जगच तेवढं असतं...
त्यांची लेकरं हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.