मध गोठला आहे

Submitted by गजानन on 27 June, 2011 - 12:46

माझ्याकडे दीड-दोनकिलो नैसर्गिक मध प्लास्टीकच्या बाटलीत गोठला आहे. बाटली प्लास्टीकची असल्याने जास्त गरम पाण्यात ठेवल्यावर प्लास्टिक वितळेल / त्याचा वास मधाला लागेल असे वाटतेय. बाटली फोडण्याशिवाय दुसरी सोपी युक्ती आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरम पाण्यात म्हणजे प्लॅस्टिक वितळेल एवढ्या तपमानात नाही. साधारण कोमट पाण्यात ठेवला तरी तो वितळेल. बाटली उन्हातही ठेवता येईल.

दिनेश, प्लास्टीकच्या अंदाजाने त्याला झेपेल अशा गरम पाण्यात ठेऊन बघितले होते. पण काही फरक पडला नाही. घरात ऊन यायचे तेव्हा ते पण करून बघितले. आता पावसाळ्यात ऊनच येत नाही.

रैना, माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाही. Happy

गोठला असेल तर उन्हाने वितळा पाहिजे. शुध्द मध महिनोंमहिने बाहेर राहिला तर झाकण नीट बंद असला तरी सुकत नाही. - किंवा क्रिस्ट्लाईझ होत नाही.

मलाही तो गोठलेला वाटत नसून त्याचं crystallization झालं असावं असं वाटतंय .. आर्च म्हणते तसं हवाबंद डब्यात असेल तर मध जशाच्या तसा रहायला हवा ना? (की नाही?) जर त्यात crystallization झालं असेल तर त्यात काहितरी पडल असेल, कसले तरी हात लागले असतील ज्यामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे तसं झालं असेल किंवा मग त्यात मधाऐवजी साखरेचा पाक असू शकेल ज्यमुळे असं झालं?

सशल, आर्च मध शुद्धच आहे.

माझ्यासमोरच झाडावरून पोळे काढले होते. पण मध्ये तीनचार दिवस बाहेर होतो तेव्हा मुंग्या लागतील असा विचार करून तो फ्रिजमध्ये ठेवण्याचा शहाणपणा माझ्याकडून झाला आहे.

कुकर झाला की लगेच त्यातली भांडी काढून घेऊन रोज १०-१५ मिनिटं ठेवुन पहा (कुकरचं झाकण लावून पण बिना विस्तवाचा). गोठला असेल तर कदाचित वितळेल. crystallize झाला असेल तर मला नाही वाटत तो पुन्हा नॉर्मल होईलसं Sad

कुकरचा उपाय करून बघतो. स्फटिकीकरण झालेला मध गरम पाण्यात ठेवल्यावर पूर्ववत होतो हा अनुभव आहे.

शुद्ध मधाचे स्फटिकीकरण होत नाही, हे माहीत नव्हतं. स्फटिकीकरणाची प्रक्रिया नैसर्गिकच नाही का?

>>> स्फटिकीकरणाची प्रक्रिया नैसर्गिकच नाही का?

माझं ज्ञान नक्कीच शास्त्रीय नाही आणि evidence-based तर त्याहून नाही .. मी सगळं अंदाजावरच बोलतेय .. पण जर everything else constant असेल तर मध जशाचा तसा रहायला हवा ना .. जर crystallize झालाय तर काहितरी नक्कीच बदललंय (जसं की हवा, बाटलीला (आतून) काहितरी लागलं, बाटली हवाबंद नव्हती etc. ..

फ्रीज मधे ठेवल्यामुळे गोठला असेल तर अवघड आहे. मित्राच्या हातून एकदा ही चूक झाली होती. बर्‍याच प्रयत्नांती शेवटी तो मध फेकून द्यावा लागला मला. काही उपाय सापडला तर मला पण सांग.

जीडी.. मध आहे असे सांगून बाटली बायोच्या हातात दे.. ती काही तरी उपाय करेल Happy

मी कुकरचाच उपाय सुचवायला आहे होते.

मी भारतातून (रामदेव बाबा) पतंजलीच्या मधाच्या अर्धा किलोच्या २ बरण्या आणल्या होत्या. चार महिन्यातच पुर्ण गोठल्यासारखा झाला .
पण माझ्या मते मध गोठला नसून त्याची साखर झाली आहे. थोडा बोटावर घेऊन बघितला तर साखरच दिसत आहे.
आता उरलेल्या पाउण किलो मधाचं काय करू ?

त्या आधी पण इथे लोकल दुकानातून घेतलेल्या ओर्गानिक मधाची पण अशीच साखर झाली होती, ती सुद्धा भर उन्हाळ्यात!
माझ्या माहितीप्रमाणे शुद्ध मध कधी गोठत नाही किंवा साखरेत पण रुपांतरीत होत नाही.

Nahi, suddha madhache sakharet rupantar hote kahi kalantrane. Satmahachya pratyek madhachya batilibarobar ek mahiti patrak yete. Tyat hi mahiti asate.
Madhacha themb watit pani gheun tyat takayacha pasarla nahi tar suddha madh aahe ase samjayache.