ओळखा पाहू???

Submitted by धनुकली on 25 June, 2011 - 08:35

ओळखा पाहू हे कुठलं फळ?? DSCN1694.JPG

गुलमोहर: 

खजुर

खजूर आहे हा!

हिरवा, लाल (वरचे प्रचि), पिवळा आणि शेवटी आपल्याला सगळ्यांना माहित असलेला चॉकलेटी रंग असा त्याचा प्रवास..

बरोबर का?

मागे बाजारात फिरताना एका टोपलीतलं असंच फळ दाखवून आईने तिच्या लहानपणी त्याला 'खिरमी मेवा' म्हणायचे असं सांगितलं होतं.

ओले खजुर Happy बर्याच लोकांनी अचुक ओळखले आहेत Happy मी पहील्यांदाच पाहिलं आहे हे प्रकरण.. पण बर्याच लोकांना माहीत आहे म्हणायचं

तमार म्हणजे खजूरच (फारसी शब्द आहे तो)
तमार ए हिंद म्हणजेच टॅमरिंड म्हणजेच चिंच.

पण गल्फ मधे मिळतो तसा अर्धवट पिकलेला खजूर आपल्याकडे मिळत नाही. तो चवीला अप्रतिम लागतो, पण टिकाऊ नसतो.

तो खायची युक्ती म्हणजे एक खजूर दोन्ही हाताच्या तळव्यात धरून रवी घुसळल्यासारखे बराच वेळ करायचे. मग खायचा. गोड लागतो आणि घसा कमी धरतो.