Submitted by ar_diamonds on 16 July, 2008 - 09:09
वेचीत पाकळ्यांना ह़ळुवार सांज झालि,
शोधित त्या फुलांनां विरहात रात्र गेलि.
स्वप्नात जे दिसावे, ह्र्दयात ते विसावे
हळुवार जागतांना, जागेपणी नसावे,
बेहोश त्या क्षणांची नयनात रात्र ओली.... शोधित त्या फुलांनां......
त्या धुंद चांदराती, बरसात चांद्ण्यांची
प्रेमात साक्ष होती, मधुगंध त्या फुलांची,
हा खेळ सावल्यांचा सोडुन का गं गेली.... शोधित त्या फुलांनां......
नाते तुझे नि माझे, ही बंध रेशमांची,
अवचित बंध तुटले, ही रात्र वादळाची,
मनपाकळ्या विलगल्या, करपून वेल गेली....शोधित त्या फुलांनां......
गुलमोहर:
शेअर करा