थोडासा पश्चीम ऑस्ट्रेलिया : फ्रिमँटल आणि पर्थ

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 June, 2011 - 01:12

अवघ्या एक आठवड्याचा मुक्काम, त्यातही अतिशय व्यस्त आणि हेक्टीक वेळापत्रक. त्यामुळे चार दिवस कसे गेले ते कळालेच नाही. शेवटच्या दिवशी मात्र माझा ऑस्ट्रेलियन सहकारी किथ डायर याने मला पर्थ आणि फ्रिमँटलचा बराचसा भाग त्याच्या गाडीतून फिरवून दाखवला. धन्यवाद किथ !

प्रचि १ :
फ्रिमँटलकडे जाताना...

प्रचि २

प्रचि ३
फ्रिमँटल : हार्बर कम यॉटींग क्लब

प्रचि ३ - अ Wink

प्रचि ४

प्रचि ५
द फिशरमॅन

प्रचि ६
फ्रिमँटलची खाऊ गल्ली

प्रचि ७
थोडासा खाऊ पण...
हवे असल्यास इथल्या फिशमार्केट मधुन आपल्याला हवे ते विकत घेवून आपण तिथल्या कुकला ते बनवायला देवु शकतो.

प्रचि ८
ताजे (जिवंत) खाद्य पण उपलब्ध असते..

प्रचि ९
हा सागरी किनारा....

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
काश, मेरा भी एक ऐसा घरोंदा होता.......

प्रचि १३
पर्थ

प्रचि १४
पर्थ सीबीडी

प्रचि १५
संथ वाहते.... स्वॅनमाई !

प्रचि १६
संध्याकाळी साडे पाच - सहाच्या दरम्यान किंग्स पार्कच्या टेकडीवरून टिपलेला पर्थ सी.बी.डी. आणि स्वॅन नदीचा देखावा

प्रचि १७
पंढरी

प्रचि १८
मनसोक्त उंडगून झाल्यावर फ्रिमँटलच्या सुप्रसिद्ध " 'गिनो'ज कॅफे" मधली मस्त आणि कडक कॉफी प्यायला थांबलेलं आमचं त्रिकुट...
# विंन्स्टन कोह (डावीकडचा) आणि किथ डायर (उजवीकडचा)
विंन्स्टन (जो चायनीज आहे) सिंगापूरहून आला होता, तर किथ (ऑस्ट्रेलियन) मेलबर्नचा. ही सफर किथच्या सौजन्याने होती. त्याच्या गाडीने त्याच्याच खर्चाने Wink धन्स अ लॉट किथ !

प्रचि १९
आणि अर्थातच अस्मादिक...

प्रचि २०
शेवटचा आणि सगळ्यात त्रासदायक फोटो !
माझ्या हॉटेलमधील फ्रीजचा. एवढं काही समोर दिसतय पण उपभोगता येत नाही अशी वाईट अवस्था होती. माझ्या बॉसने काय हवे ते कर खर्च अ‍ॅप्रुव्ह करायची जबाबदारी माझी असे सांगितले होते. पण आमच्या डॉक्टरांनी परवानगी दिलेली नसल्याने सगळाच तोंड दाबुन बुक्क्यांचा मार होता.

विशाल...

गुलमोहर: 

आडो, आयुष्यात प्रथमच निकॉन ऑपरेट करत होतो (निकॉन - डी ५००० : १८-५५) त्यामुळे अंदाज येत नव्हता.
बघू सवडीने फोटोशॉपमध्ये थोड्या प्रक्रिया करून बघेन.
चातक Proud
धन्यवाद Happy

विकुम्हाराज मस्त प्रचि Happy
तुझा फोटु आधी बालगंधर्वच्या कॅफेटेरीयात काढलाय अस वाटल ब्याक्ग्राऊंड बघून Proud
मग कॉफीचा मग बघून लक्षात आल Lol

ओह्ह, शेवटून दुसरा फोटो बघितल्यावर कॅमेरा निकॉन आहे हे कळलंच. फोटोशॉप किंवा पिकासामध्ये थोडं प्रोसेसिंग करून ठीक करता येतील(च).

पिकासामध्ये थोडं प्रोसेसिंग करून ठीक करता येतील(च). >>> विश्ल्या पिकासामध्येच कर शॉर्टकट आहे. जागच्याजागीच होतील. सर्वच प्रचि एडीट करण्याची गरज नाहीय ८, झिंगे, ९, १४, १६ क्रमांकाचे प्रचि जरा 'उजळ' आले आहेत.

छान आहेत फोटो. पण रंग जरा वेगळे वाटताहेत. पुढच्या वेळेस जास्त फिरायला मिळो, या शुभेच्छा !

मेजवानी मिळेल या आशेने आलो होतो,विशाल कुलकर्णी.पण तुम्ही नुसताच ट्रेलर दाखवला. Happy

असो. फोटो आवडले. अब इसकू झब्बू देना बोले तो,मै ४ साल पसले सिडनी गया था वो चिपकाना पडेंगा.

विश्ल्या,
ऑस्ट्रेलियाला गेला होतास त्याचं प्रूफ म्हणून तुझा फोटो टाकलायस का? Proud Light 1
बाकी सगळे फोटो खूप खूप आवडले... Happy मस्त काढले आहेस.

सह्ही फोटो रे विकुदा Happy

पण आमच पूर्व ऑस्ट्रेलिया जास्त छान आहे बर का, पुढच्या वेळेस इथे ये आणि सिडनी, कॅनबरा, ब्रिस्बेन, गोल्ड कोस्ट फिरं Happy

वत्सले, मेलबर्न पण छानच आहे हां Happy

विशाल, ३-अ : टिल्टेड हॉरिझॉन ठीक करावे..उत्तम आहे तो फोटो!
बाकी पण मस्त फोटो....कधी गेला होतास इकडे ?

पक्स..ते आणखी कसं करायचं? Wink
@फारएंड : नाही रे, त्या दिवशी नेमकं मेंटेनन्ससाठी बंद होतं त्यामुळे आत नाही जाता आलं.
@दक्षा : दक्षे, कुणाकडूनतरी हा प्रश्न येणार (प्रुफबद्दल) हे माहीतच होतं. कातिल घरकाही निकला Wink
रच्याक पंढरी म्हणजे ते पर्थच्या वाका स्टेडियमचं प्रवेशद्वार आहे. आम्हा क्रिकेटभक्तांसाठी (विशेषतः डेनीस लिलीच्या भक्तांसाठी) ती पंढरीच आहे. Happy
बाकी सर्व मंडळींचेही मनःपूर्वक आभार !

पर्थ च्या मॅचमधे कॉमेंटरी ऐकताना फ्रीमँटल डॉक्टर ही टर्म कधीकधी ऐकलेली आहे, त्याचा संबंध या फ्रीमँटलशी होता असे विकीपेडिया वरून समजले होते. त्या टाउनचीही चांगली ओळख झाली या फोटोंमुळे.

नकाशात तेथे एका चिंचोळ्या भागात ते पोर्ट दिसते. तेथीलच आहेत का हे फोटो? बाकी भारत सोडून इतर देशांच्या किनार्‍याला हिंदी महासागरच असणे हे ही एक वेगळेपण Happy

जेडी Proud

Pages