किल्ले तिकोना

Submitted by संदीप पांगारे on 18 June, 2011 - 06:34

बरयाच दिवसापासून मायबोलीवरील साहित्य वाचत होतो , विशेष म्हणजे आपले प्राचीन पूर्वज आणि शिवकालीन इतिहास.
माबो करांनी किल्ल्यावर केलेलं गिर्यारोहन आणि त्याचे वर्णन हा तर मायबोलीवरील एक आगळा ठेवा.
त्या पासून प्रेरणा घेऊन एख्यादा किल्लावर जावे असे वाटत होते, तसे पुण्याजवळ किल्ले बरेच आहेत. शेवटी पवना धरणाशेजारील तिकोना ठरवला. पण उन भरपूर होते, पावसाची वाट पहावी लागणार होती.
पण मन काही ऐकेना, शेवटी ठरवले, निघायचे , भर उन्हात.
२९ मे २०११ , रविवार.
मी आणि आमचं मंडळ ( म्हणजे बायको ) दोघेच निघालो.

जाताना चांदणी चौक -पौड रोड मार्गे न जाता, हिंजेवाडी तून मान गावातून घोटावडे गावाकडे निघालो. तिथून पुडे पिरंगुट -पौड मार्गे कोळवण -आणि शेवटी तिकोना असा प्लान.
घोटावडे गावाच्या अलीकडे एक उजव्या बाजूला एक रस्ता जातो. तिथे बोर्डवर लिहिले होते कोळवण कडे.......एका आजोबाना विचारून खात्री करून घेतली.
म्हणजे घोटावडे गावातून थेट कोळवण shortcut .. लय भारी.
या रस्त्याला वाहने जास्त नाही, त्यामुळे वाह्तुकची कोंडी नाही आणि वेळही वाचला.
शेवटी तिकोन्याच्या पायथ्याशी पोचलो.
IMG0434A.jpg

फाट्यावर एका छोट्या हॉटेलमध्ये चहा पिला, किल्लाविषयी माहीत करून घेतली आणि पायथ्या कडे निघालो.
IMG0450A.jpg

बरयाच दिवसांनी गिर्यारोहन करीत असल्याने दमाची परीक्षा लागत होती.

IMG0446A.jpg

शेवटी चापट मार मारुती पर्यंत पोहचलो.-

IMG0435A.jpg

आणि तिथून बालेकिल्ला.-
बालेकिल्ल्याच्या दारा जवळ आमचे मंडळ

IMG0436A.jpg

गडावर देवीचे मंदिर आहे , मंदिराचा जीर्नोंधार नुकताच करण्यात आला आहे.

Image016.jpg

पूर्ण गड एक तसा मध्ये पाहून होतो.
वरून किल्ले तुंग , लोहगड यांचे दर्शन होते.

किला उतरताना एका दगडाकडे लक्ष गेले. माल उगाचच तो गौतम बुद्धा सारखा वाटला

IMG0448A.jpg

मायबोलीवर लिहियाचा पहिलाच प्रयत्न.(चुक भूल द्यावी घावी.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान प्रयत्न संदिप ..
फोटो मोबाईल कॅमेराचे आहेत का?
खर म्हणजे पावसाळ्यात तिकोना लय भारी दिसतो..:)

तुझा तो दगडाचा फोटो मस्त आहे रे गड्या........ गौतम बुध्द का माहित नाही पण माणसाच्या चेहर्‍याचा भास नक्की होतोय, उत्तम निरिक्षण...

शुभेच्छा...!!!