कुठून पोचलो इथे...

Submitted by आनंदयात्री on 18 June, 2011 - 05:24

कुठून पोचलो इथे
कुठे इथून जायचे
तुला दुरावलो तरी
तुझ्याकडेच यायचे

जरा वसंत दे मला
जरा उसंत दे मला
राहिले फुलायचे
भरून श्वास घ्यायचे
तुला दुरावलो तरी...

धुक्यात पाहिले खुळे
उन्हात स्वप्न संपले
मनातल्या धुक्यामध्येच
अर्थ सापडायचे
तुला दुरावलो तरी...

- नचिकेत जोशी (१०/४/२०११)

गुलमोहर: 

मस्तच ..... आवडली.

--------------------------------------------------------------------------

फक्त त्या कडवं क्र. वाल्या आकड्यांना
दोन दोन दंडुके मारा हो ..... असे ----> || १ || || २ || ..... Proud
शेवटच्या शब्दाजवळ आल्याने अडखळायला होतंय.
उगाच रसभंग करतायत.

रोहित ..एक मावळा: हाहा हा....माझी पण first reaction tich hoti...
@ नचिकेत : Happy

सांडल्या व्यथा जरी
स्मित हास्य द्यायचे
जाणले तुझेच शब्द
शल्य देत राहीले

पावसात धुंद होता
बांध ते तुटायचे
कोवळ्या उन्हात नी
मेघ मुक्त व्हायचे

तुला दुरावलो तरी
तुझ्याकडेच यायचे ||

सर्वांचे आभार! Happy
रोमा, ऋतुवेद - खेचा लेको!! Proud
उल्हासकाका, okkk!! घेतो काढून.. Happy

मुक्ता, तुझ्याकडून दाद आली, कविता धन्य झाली माझी!! Happy

नचिकेत,
सुरेखच! Happy

<तुला दुरावलो तरी
तुझ्याकडेच यायचे >

कित्ती गोड आणि सुस्पष्ट!