मंडळी ..... आमचा परम ज्ञानवंत मित्र गुगल्या हा आजकाल भलताच कल्पक झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे ........ काही दिवसांपुर्वी त्याने ग्रेट गिटारिस्ट लेस पॉल याच्या जयंती निमित्त आम्हास ऑनलाईन गिटार वाजवायची संधी उपलब्ध करून दिली ...... ज्याचा करोडो लोकांनी लाभ घेऊन नवीन संगीतरचनांना जन्म दिला.......तसा तो जात्याच हुशार असल्या कारणाने त्याने त्या " अव्दितीय " रचना साठवून ठेवण्याची सोय दिली होती.......पुढच्या ग्रॅमी अवार्ड साठी आम्ही नक्कीच अर्ज करण्याचा विचार करतोय........ असो..... !
काल ३९ वर्षांनी दिसलेले खग्रास चंद्रग्रहण ...... मोठा योग होता.... तसे आता पुन्हा पुढील ४७ वर्षांनी दिसणार आहे.... ( असे आमच्या वाचनात आले आहे. चु. भू.दे.घे. )
ज्या मंडळी चे ते पाहावयाचे हुकले त्यांनी नाराज होऊन पुढच्या ४७ वर्षांपर्यंत वाट पाहात बसण्याची गरज नाही .... आमच्या परममित्राने त्यांना आज पुन्हा एक संधी द्यायचे ठरवले आहे......
सोपे आहे ... गुगल उघडा ... पुढचे तो आपोआप दाखवेल... पुन्हा पाहायचे रिफ्रेश करा..... हळूहळू हवी ती स्टेज पाहण्याकरिता खालच्या पॉइंटरचा वापर करा !
परम मित्र गुगल्यास आमच्या संगतीमुळे कल्पकतेचा लाभ झाला .... याचा आम्हास अतुलनीय आनंद आहे... !
धन्य्वाद ! << परम मित्र
धन्य्वाद !
गुगलच्या सदाबहार कल्पकतेला सलाम !
<< परम मित्र गुगल्यास आमच्या संगतीमुळे कल्पकतेचा लाभ झाला .... याचा आम्हास अतुलनीय आनंद आहे... ! >>
अगदी भाऊ
अगदी भाऊ
(No subject)
परवाची गिटार वाजवायची असेल
परवाची गिटार वाजवायची असेल किंवा गूगलचे जुने डूडल्स पाहायचे असतील तर भेट द्या
http://www.google.co.in/logos/
गिटारसाठी डायरेक्ट भेट द्या
http://www.google.co.in/logos/2011/lespaul.html
अब बजाते रहो.
—
--------------------
( सिद्धार्थ - माझ्या गजाल्या ) - यांचे कडून