मॉडर्न वटपौर्णिमा.........२०११

Submitted by अनामिका पन्वेल्कर on 15 June, 2011 - 07:14

सकाळीच उठुन दिर आणी नवरा ह्यान्चे डबे केले........हो! ऊपवास माझा होता ना! त्याना डबे दिले अन अन्घोळ करुन पुजेची तयारी सुरु केली.................अहो कसली पुजा म्हणून काय विचारताय??????
आज वटपौर्णिमा आहे ना?? विसरलात? छान!

पण आम्हाला विसरुन कसे चालेल? या चालीरिती विसरून कसे चालेल? आणि आम्ही लाख विसरू पण हा सो कॉल्ड सॉफिस्टिकेटेड समाज त्या विसरू देइल का? शेवटी २१ व्या शतकातील असली.....नवर्‍याच्या खान्द्याला खान्दा देउन परिवाराचा आर्थिक भार ऊचलणारी असली.........आणि जीन्स-टी शर्ट मध्ये बिन्दिक्कत वावरणारी असली...तरी स्त्री ही स्त्रीच असते असा युक्तिवाद करणार्‍या मन्डळीनमध्येही स्त्रियाच पहिला नम्बर पटकावतील. आणि मुळात हे सगळे उपास तापास स्त्री च्याच पाचवीला का पुजलेत याच स्पष्टीकरण हा समाज देउ शकत नाहीये. कधी ऐकलय का कुणी की अमूक अमूक ठिकाणी क्ष नावाच्या पुरुषाने आपल्याला सात जन्म हीच पत्नी मिळावी म्हणून देवाला नवस केला. अहो सात जन्माची तर बातच सोडा पण याजन्मीही कोणी बदलून देइल ही बायको तर बरे असेच वाटेल त्याना......दारुची बाटली असो की बायको .......व्हरायटी मॅटर्स! अपवाद वगळता आज कुठल्याही पत्नीला विचारल की, '' काय ग बाई? का करतेस हा उप्वास आणि पूजा?'' तर ती हेच म्हणेल '' पद्धतच आहे ना तशी आमच्या घरी.'' मग ही पद्धत निर्माण केली कोणी??
कोणीतरी सत्यवान नावाचा पुरुष मेला तेव्हा त्याच्या बायकोने म्हणे यमाला अडवून आपल्या नवर्‍याचे प्राण परत मिळवले....ठीक्के....समजल....... मग? म्हणून पुढे काय सगळ्या बायकानी सात जन्म अगदी शेम टू शेम नवरा मिळावा म्हणून त्या वडाला चक्क साकड घालायच? गोची होइल की राव त्या वडाची!! तेव्हा सत्यवानाला लाइफलाईन दिल्यामुळे आता पस्तावत असेल बिच्चारा!!! आता मला सान्गा...सात जन्म एकच नवरा मिळवून देण वडाच्या हातात असत तर प्रत्येक मुलीनेही प्रेझेन्ट जन्मीच चान्गला नवरा मिळावा म्हणून साकड नसत का घातल त्याला???
याऊलट आजची तरूणी मात्र वडावर जाईल आणी मनातूनच वडाला दम भरेल....'' हे बघ पुढच्या एक जरी जन्मात हा नवरा रिपीट केलास ना तर करकच्चून बान्धून ठेवेन हं तुला!'' कारण शेवटी इकडेही ड्रेस मटिरीयल असो कीवा नवरा.....व्हरायटी मॅटर्स ना! :p

गुलमोहर: 

अजुन एक आपल्याकडील समजुतीप्रमाणे अनेक जन्मांनंतर मनुष्यप्राण्याचा जन्म प्राप्त होतो. तसेच पुढचा जन्म कोणत्या प्राण्याचा मिळणार हे आपल्या या जन्मातल्या कर्मावर अवलंबुन असत. तर या सगळ्यात प्रत्येकाला मिळणारा पुढचा जन्म वेगवेगळ्या प्राण्याचा असणार. आणि एखाद्या नवर्‍याला / बायकोला मोक्ष मिळाला तर? या पार्श्वभुमीवर अशा प्रकारच्या व्रतांना कितपत अर्थ आहे?

वत्सले, समजा कुणालाच मोक्ष नाही मिळाला आणि नवर्‍याला मांजराचा जन्म आणि बायकोला हत्तीचा जन्म मिळाला तर काय???? ते लग्न करणार??? Uhoh

हा तर आपलं पातिव्रत्य सिध्द करण्याचा अजुन एक मार्ग होता. नवरा कसाही असू दे - दारू पिऊन मारझोड करणारा, बाहेरख्याली, रोगीष्ट नाहीतर आणखी काही. पण एक कुंकवाचा धनी असणं त्यावेळी स्त्रीकरता फारच महत्त्वाचं होतं. मग त्याची, कुटुंबाची आणि समाजाची मर्जी सांभाळण्याकरता हे सगळं बायका निमुटपणे करत असत. बिचार्‍या!

अजुनही स्वतःला न पटणार्‍या अनेक गोष्टी (यात ही असली व्रतंही येतात) चांगल्या शिकल्यासवरलेल्या स्त्रिया याचकारणाकरता करतात तेव्हा त्यांची कीव करावी की राग करावा तेच कळत नाही. बरेचदा जाऊ दे, वाद नको म्हणून करत असतील बिचार्‍या.

लाजो, तेच म्हणायचय मला!
खरय मामी!
बाकी मी पण आजुबाजुच्या नातेवाईक स्त्रीयांना याविषयी फारसं आग्रही पाहिलं नाही. माझ्या साबा तर एकदम 'कुल' आहेत याबाबतीत!

हो ना वत्सला. ह्या असल्या चालीरीती कुणी आनि कधी सुरु केल्या? त्या वेळची परीस्थिती, समाज कसा होता? आणि अत्ताची परिस्थिती... म्हंटलं तर खुप फरक आहे पण म्हंटल तर नाही... ती जोखडं अजुन कित्येक स्त्रिया वाहातातच आहेत Sad मामी तु म्हणत्येय्स तसही असेल बर्‍याच घरी... जाऊ दे, वाद नको म्हणून करत असतील बिचार्‍या....<<<

मी माझ्या अहोंना...सकाळीच सांगितले....आज जर का तु नीट वागला नाहीस ना...तर बघच्..मी वडाची पुजा करीन आणि उपास पण करीन बर का...तो म्हणाला..नको नको...मी खरच खुप चांगला वागीन्...पण प्लीज असे काही करु नकोस....:-)

स्वप्ना, तू गृहित धरतेयस की discarnate state मधे सगळी माणसं एका ठराविक कालावधीसाठीच रहातात.
उदा.
२००१ साली 'क्ष' गेला आणि २००२ साली 'य' तर तुझ्यापोस्टवरून
जर क्षनं २००३ साली जन्म घेतला तर यनं २००४ साली जन्म घ्यावा असा नियम आहे, असं वाटतय

प्रत्यक्षात
२००१ साली क्ष गेला पण त्याचा पुन्हा जन्म २०१० पर्यंत झालाच नाही
आणि य मात्र २००५ साली जाऊन २००६ साली पुन्हा जन्म घेता झाला
असंहे असू शकतं ना! Wink

(आता ह्या बाफचा पुनर्जन्म बाफ होणार का :P)

ह्या सर्व प्रकारात त्या बिचार्‍या यमाला वेठीला धरताय रे सगळे लोक....

म्हणजे मरणार्‍याला न्यायचा.... सावित्रीशी "मांडवली" करायची....... पुन्हा त्या चित्रगुप्ताच्या "गुड बुक्समधे" रहायचं...... एवढे रेडे आणि यमदूत मॅनेज करायचे...... वर घरी आल्यावर बायकोचा उच्छाद तो वेगळाच...... पोरंबाळं असतील त्याला तर मग बघायलाच नको.....

त्यात यमाची बायको पण मॉडर्न झाली असेल तर ती पण पुजेला जाणार, अहो आजचं घराचं जरा तुम्ही आवरा, पोराला शाळेत न्या... भाजी पोळी करून डबा घेऊन जा...... किती करायचं त्या यमाने.....

मग टारगेट कंप्लीट करायला सत्यवान धरला की आली सावित्री गळे काढत...... हाय रे यमा.... Wink

मला चिंता वाटते ती त्या यमाच्या बायकोची...... ती काय करत असेल..... का तिने पण यमाला ठाकून ठोकून वापरणेबल बनवलय Uhoh

ती वडाची पूजा करत असेल की रेड्याची??? Proud

चतूर विदुषींनी यावर प्रकाश टाकावा.

मला चिंता वाटते ती त्या यमाच्या बायकोची...... ती काय करत असेल..... का तिने पण यमाला ठाकून ठोकून वापरणेबल बनवलय >>> Lol

आम्ही बायकां युगानुयुगे वट्पौर्णिमा करत आलो ,आता तमाम पुरुषांनी ''पिंपळअमावस्या'' करायला काय हरकत आहे ? Happy

मला चिंता वाटते ती त्या यमाच्या बायकोची...... ती काय करत असेल..... का तिने पण यमाला ठाकून ठोकून वापरणेबल बनवलय >>>>> भुंग्या, यातल्या 'पण' या शब्दाबद्दल तुझा णिषेद! Proud

भुंग्या, यातल्या 'पण' या शब्दाबद्दल तुझा णिषेद!
>>>>>>

मामी....... निषेध रद्द कर........ हत्तीवरून बिस्किटं वाटेन........ सुरुवात तुझ्या घरापासूनच..... गॉड प्रॉमिश...... Proud

आता तमाम पुरुषांनी ''पिंपळअमावस्या'' करायला काय हरकत आहे ? <<< तसं केल्यास तुम्ही केलेल्या वटपौर्णिमेचं पुण्य Negate होणार नाही का? Proud

Rofl

Pages