मॉडर्न वटपौर्णिमा.........२०११

Submitted by अनामिका पन्वेल्कर on 15 June, 2011 - 07:14

सकाळीच उठुन दिर आणी नवरा ह्यान्चे डबे केले........हो! ऊपवास माझा होता ना! त्याना डबे दिले अन अन्घोळ करुन पुजेची तयारी सुरु केली.................अहो कसली पुजा म्हणून काय विचारताय??????
आज वटपौर्णिमा आहे ना?? विसरलात? छान!

पण आम्हाला विसरुन कसे चालेल? या चालीरिती विसरून कसे चालेल? आणि आम्ही लाख विसरू पण हा सो कॉल्ड सॉफिस्टिकेटेड समाज त्या विसरू देइल का? शेवटी २१ व्या शतकातील असली.....नवर्‍याच्या खान्द्याला खान्दा देउन परिवाराचा आर्थिक भार ऊचलणारी असली.........आणि जीन्स-टी शर्ट मध्ये बिन्दिक्कत वावरणारी असली...तरी स्त्री ही स्त्रीच असते असा युक्तिवाद करणार्‍या मन्डळीनमध्येही स्त्रियाच पहिला नम्बर पटकावतील. आणि मुळात हे सगळे उपास तापास स्त्री च्याच पाचवीला का पुजलेत याच स्पष्टीकरण हा समाज देउ शकत नाहीये. कधी ऐकलय का कुणी की अमूक अमूक ठिकाणी क्ष नावाच्या पुरुषाने आपल्याला सात जन्म हीच पत्नी मिळावी म्हणून देवाला नवस केला. अहो सात जन्माची तर बातच सोडा पण याजन्मीही कोणी बदलून देइल ही बायको तर बरे असेच वाटेल त्याना......दारुची बाटली असो की बायको .......व्हरायटी मॅटर्स! अपवाद वगळता आज कुठल्याही पत्नीला विचारल की, '' काय ग बाई? का करतेस हा उप्वास आणि पूजा?'' तर ती हेच म्हणेल '' पद्धतच आहे ना तशी आमच्या घरी.'' मग ही पद्धत निर्माण केली कोणी??
कोणीतरी सत्यवान नावाचा पुरुष मेला तेव्हा त्याच्या बायकोने म्हणे यमाला अडवून आपल्या नवर्‍याचे प्राण परत मिळवले....ठीक्के....समजल....... मग? म्हणून पुढे काय सगळ्या बायकानी सात जन्म अगदी शेम टू शेम नवरा मिळावा म्हणून त्या वडाला चक्क साकड घालायच? गोची होइल की राव त्या वडाची!! तेव्हा सत्यवानाला लाइफलाईन दिल्यामुळे आता पस्तावत असेल बिच्चारा!!! आता मला सान्गा...सात जन्म एकच नवरा मिळवून देण वडाच्या हातात असत तर प्रत्येक मुलीनेही प्रेझेन्ट जन्मीच चान्गला नवरा मिळावा म्हणून साकड नसत का घातल त्याला???
याऊलट आजची तरूणी मात्र वडावर जाईल आणी मनातूनच वडाला दम भरेल....'' हे बघ पुढच्या एक जरी जन्मात हा नवरा रिपीट केलास ना तर करकच्चून बान्धून ठेवेन हं तुला!'' कारण शेवटी इकडेही ड्रेस मटिरीयल असो कीवा नवरा.....व्हरायटी मॅटर्स ना! :p

गुलमोहर: 

:):) छान .
'' हे बघ पुढच्या एक जरी जन्मात हा नवरा रिपीट केलास ना तर करकच्चून बान्धून ठेवेन हं तुला!'' ..:)
बायका वडा भोवती फिरत काय मागतात काय माहीत . पण जरा कान देवुन ऐकले तर आवाज येत होता ' वडा पाव वडा पाव ' Happy

दिवे घ्या

आता मला सान्गा...सात जन्म एकच नवरा मिळवून देण वडाच्या हातात असत तर प्रत्येक मुलीनेही प्रेझेन्ट जन्मीच चान्गला नवरा मिळावा म्हणून साकड नसत का घातल त्याला???
>>> पक्क्या मॉडर्न आहात बाई....

कधी ऐकलय का कुणी की अमूक अमूक ठिकाणी क्ष नावाच्या पुरुषाने आपल्याला सात जन्म हीच पत्नी मिळावी म्हणून देवाला नवस केला. अहो सात जन्माची तर बातच सोडा पण याजन्मीही कोणी बदलून देइल ही बायको तर बरे असेच वाटेल त्याना......>>> बरं..!

कुठल्याही पत्नीला विचारल की, '' काय ग बाई? का करतेस हा उप्वास आणि पूजा?'' तर ती हेच म्हणेल '' पद्धतच आहे ना तशी आमच्या घरी.'' >>>> बरं..! म्हणजे हे उपवासही मनातुन नसतात तर, फक्त पध्द्त म्हणुन.

इक्वली तुमचं आमचं सेम असतं. प्रेमच नसतं म्हणुन असं असतं.. Biggrin

आमची मॉडर्न वटपौर्णिमा:-
सकाळी उठेपर्यंत नवर्‍याने रोजच्याप्रमाणे चहा केला होता. चहा पित आणि पेपर वाचत जरा टंगळमंगळ केली. नंतर बाल्कनीतल्या झाडांना पाणी घातलं. दोघानी रोजचा प्राणायाम-व्यायाम वगैरे केला. मी आंघोळ वगैरे आटपून तयार होइपर्यंत स्व.च्या काकुंनी स्वयंपाक-ब्रेफा केला. रोजचाच, न्युट्रिशिअस. नवर्‍याला जबरदस्तीनी न्युट्रिशिअस ब्रेफा खायला लावला. डबा भरुन त्याला वाटेला लावला.
मग नाक मुरडत का होइना पण मीही तोच न्युट्रिशिअस ब्रेफा खाल्ला आणि डबा भरला.
दुपारी फोन करुन नवर्‍याला रुटिन मेडिकल चेकप करण्याची आठवण दिली अन त्यानेही मला दिली. त्याप्रमाणे या विकेंडला डॉक्टरची वेळ घेतलीय.
अशी वटपौर्णिमा जी-जो करेल त्यालाही तो वड नक्कीच पावेल Happy

नोप्स. शेवटी नोन डेव्हील इज बेटर हेच खरं.
>>> बाबु, पूर्ण अनुमोदन. लग्नात मिळालेलं रॉ प्रॉडक्ट ठाकून ठोकून कस्टमाईज केलंय. ते सोडून नवं रिस्क कोण घेणार? Wink

बायका सारख्या म्हणतात ना.... वडा मला पाव, वडा मला पाव

म्हणून नव-यांना बाहेर वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात Wink

<<<पण आम्हाला विसरुन कसे चालेल? या चालीरिती विसरून कसे चालेल? आणि आम्ही लाख विसरू पण हा सो कॉल्ड सॉफिस्टिकेटेड समाज त्या विसरू देइल का?>>> मला तरी वाटतं आपण ठाम राहिलो तर समाज फारसा भानगडीत नाही पडत. आणि आजच्या मुली तसं करुनही दाखवताहेत की. पटला नाही लेख. आणि खूप ठिकाणी अक्षरं एकत्र जोडली गेली आहेत ती पहाल का पुन्हा, वाचताना त्रास नाही होणार बदल केलात तर.

आमची गेली तीन वर्ष चालू असलेली वटपौर्णिमा येणेप्रमाणे :- (

आज पौर्णीमेचा दिवस असल्याने नवर्‍याला ऑफिसमधे जावे लागणार होते. म्हणून सकाळी उठून थालिपीठ लावलं त्यानंतर आरामात रमत गमत स्वैपाक केला. (पुरण पोळी, बटाट्याची भाजी, बीन्सची भाजी, भात वरण, मसाले भात, चटणी, गाजराची कोशिंबीर, मिरभी भजी, नाचणीचे पापड आणि कुरडया) दुपारी बसून मस्तपैकी जेवलो. आमच्या घरी रोज कामाला येणार्‍या रोहिणीला जेवण दिले (वास्तविक तिला घ॑रीच जेवायला बोलावले होते पण तिच्या घरी पाहुणे आल्याने ती आली नाही)

नंतर नवरा बाळाला संभाळत घरी बसला. मी बाहेर शॉपिंगला निघून गेले. दुपारचाच उरलेला स्वैपाक गरम करून जेवलो. बास.. अजून काही नाही.

लग्नात मिळालेलं रॉ प्रॉडक्ट ठाकून ठोकून कस्टमाईज केलंय. ते सोडून नवं रिस्क कोण घेणार? Rofl

एक कुतुहलः किती % बायका अजूनही वटपौर्णिमा साजरी करतात? मी सासरी माहेरी (सख्ख्या नात्यात) पाहिलं नाहिये कुणाला मागच्या जनरेशन मधेही - म्हणून हा प्रश्न

वटपौर्णिमा....
माझ्या साबा एक ग्रेट. त्यांच्याच भाषेत सांगते, "... तुला करायचं तर कर. माझा विश्वास नाही. आणि काय गं... चॉइस नको पुढल्या जन्मी तुला?...."
तिथेच नाट लागली.
उपास्-बिपास केला नाही पण उपासाचं तरर्‍हेतर्‍हेचं बनवून दोघींनीही खाल्लं.
मंगळागौरीची गंमत वेगळी. पुन्हा त्यांच्याच भाषेत, "... करायची का तुला? अगं त्या निमित्ताने माहेरची माणसं वगैरे मुद्दाम बोलावली जातात. मजा येईल. आईला वाण द्यायचं असतं वगैरे... उपास्-बिपास नको. मीच पुजा सांगते. गंमत वाटत असेल तर कर... करूया का?"
त्यामुळे मंगळागौर केली... फक्तं पहिल्याच वर्षी.
नानबाशी सहमत. हल्ली कौतुक म्हणूनच ह्या गोष्टी आवर्जून केल्या जातात. त्यात एक "रीत" संभाळणं ह्या पलिकडे काही नाही. माझ्या ऐकण्यात, मैत्रिणी, चुलत्-मावस्-मामे वगैरे बहिणींच्यात असल्या गोष्टींच्याबाबतीत आग्रहं दिसला नाही.

अनामिका, जोडाक्षरांकडे किंचित अधिक लक्षं देणार का?
उदा. अन्घोळ, बिन्दिक्कत, मन्डळीनमध्येही इ.

हल्ली देशात उपास करण्याच फॅड आलय म्हणे?? इसका व्रत है, उसका व्रत है असं अगदी स्टेटस सिंबल असल्यासारख सांगतात .. मार्गशिर्ष, करवा चौथ इ इ चे उपास म्हणजे अजकाल फॅशन झालिये आणि बायका वेड्यासारख्या पैसा उधळतात.. मग त्या व्रताचे पारणे फेडायला नव्या साड्या/ड्रेस घालुन रस्त्यावर मिरवणुका काय काढतात आणि हॉल वगैरे बुक करुन मेजवान्या काय करतात... यात दिखावा जास्त आणि देवभावना कमी ...हे आपलं मला जाणवलेलं ... खखोतेदेजा Proud

बाकी मामी आणि बाबुला अनुमोदन Lol

>>> लग्नात मिळालेलं रॉ प्रॉडक्ट ठाकून ठोकून कस्टमाईज के>>><<
Lol
त्या कस्टमाईज वरच इतका त्रास घेतल्यावर पुढे कशाला फुकट सोडणार असेच ना.. Proud

वटपौर्णिमा....
ह्या वनोत्सवा कडे वेगळ्या नजरेने पाहायला पाहिजे ...
झाडांनाही पुजण्याची सुसंस्करीत संस्कॄती ....

मी जिथे रहाते त्या भागात पुर्वी आमराई होती आणि आता सिमेंट्चे जंगल वाढतेय, त्या वर उपाय म्हणुन स्थानीक लोकांनी वटपौर्णिमा अशी साजरी करायची ठरवली आणि गेली ३ वर्ष वनोत्सव स्वरुपात साजरी होतेय.

- पाच नवीन वडाची झाडे लावणे व त्यांचीच पुजा करणे.

- नव्या झाडाच्या बाजुला कुंपण होईल अशा पद्धतीने दोरा गुंडाळणे (त्यामुळे झाडाला रुजे पर्यंत संरक्षण मिळते)

- वाणाचे सामान एकत्र जमा करणे नंतर ते वेगवेगळे करुन जवळच्या अनाथ / वृद्ध आश्रमात नेऊन देणे.

- दक्षिणा देण्गी स्वरुपात अनाथ / वृद्ध आश्रमात देणे.

- सकाळी, संध्याकाळी चालायला जाणार्‍या लोकांनी फक्त झाडांकडे लक्ष ठेवणे, पाणी घालण्याचे काम निसर्गच करतो Happy
-------

पण एकेकाचे विचार वाचुन मजा मात्र आली.

>>> लग्नात मिळालेलं रॉ प्रॉडक्ट ठाकून ठोकून कस्टमाईज केलेय >>><< Happy Happy Happy

संस्कॄती - कश्या स्वरुपात पुढे न्यायची हे ज्याचे त्याचे विचार, पण आपल्या घरातुनच आपण सुरवात करु शकतो नाही का? Happy

सुरश ग्रेट Happy हे प्रतिसाद म्हणुन नाही वेगळा लेख म्हणुन लिही प्लिज.
प्रतिसादात हरवुन जाईल.

लग्नात मिळालेलं रॉ प्रॉडक्ट ठाकून ठोकून कस्टमाईज केलंय. ते सोडून नवं रिस्क कोण घेणार?
>>>>>>
अरारा मामे,.......
अगं कस्टमाइज्ड झालं प्रॉडक्ट म्हणून काय सात जन्म तेच Uhoh
जरा त्या डब्याचा आय मिन नवर्‍याचा पण विचार कर.... त्याला नको का थोडा चॉईस Proud Wink

लग्नात मिळालेलं रॉ प्रॉडक्ट ठाकून ठोकून कस्टमाईज केलंय. ते सोडून नवं रिस्क कोण घेणार?

बायकाच असा कॉस्ट इफेक्टिव्ह विचार करू शकताच. नवरे साहसी असतात ..

(लेखापेक्षा) प्रतिक्रिया वाचनीय. लेख विनोदी असावा अशी (शेवटी शेवटी) शंका वाटली. मागच्या (दर) वर्षी पण असलाच लेख वाचला होता बहुतेक!!
... आणि समाजाचा excuse देउ नये... peer pressure ला बळी पडणं कधी सोडणार? अजुन शाळेत आहात का?

दाद.. अनुमोदन.. Happy दोन दिवस जरा मज्जा.

सुरश, सही उपक्रम.. मस्तच!

लाजो, अग सण होते ते आपल्या माणसांना भेटण्यासाठी, स्त्रियांना ब्रेक हवा म्हणून.. आज काल वेगळ्याप्रकारे साजरे होतात एवढच. पूर्वी वेगवेगळी डोहाळजेवणे व्हायची हल्ली दोन्ही घरच मिळून असं एकच होतं, मंगळागौर पण तशीच पहिल्यावर्षीच उद्यापन, वशेळ्या मिळायची मारामार.. मग दोन चार वशेळ्या एकत्र येऊन, हॉल घेऊन करतात. मुम्बैत कुठे आली आहेत मोठी घरं आता? आणि साड्यांच पण तसच.. अश्या प्रसंगीच वापरल्या जातात हापिसात वै. एरव्ही जरी काठाच्या साड्या घेणेही नाही नि वापरणेही नाही.

भोळ्या देवभावना माझ्यासारख्या बर्‍याच जणींकडे नसतील.. पण उत्सवप्रियता असतेच बहुदा.. नाही का?

जाजु, तु म्हणतेस ते बरोबर आहे.

पण मी यंदाच्या देशवारीत बघितलं ते मला जरा खटकलं. आपल्या मराठी लोकात नाही पण गुजराथी, पंजाबी, मारवाडी समाजात हे व्रत प्रकरण फारच दिसलं... आणि कामवाल्या बायका पण याच्यात.. रस्त्यावरच्या मिरवणुका, मोठ मोठे पेंडॉल्स घालुन सभा, भजनं वगैरे... उत्सवप्रियता पेक्षा दिखावा जास्त वाटला मला.. असो..

इथे परदेशात देखिल आम्ही सण साजरे करतोच की. गणपती, नवरात्र, दिवाळीलाच तर साड्यांना हवा लागते.. दागिने घालायलाही तेव्हाच चान्स मिळतो ... आणि आम्हालाही ते आवडतं Happy

मला ह्या वटपौर्णिमेबाबत कधीपासून एक शंका आहे. कुठे विचारू हा विचार करतच होते तेव्हा हा लेख दिसला. आपण तूर्तास फक्त पुढचा एकच जन्म विचारात घेऊ. पुढल्या जन्मी हाच पती पाहिजे म्हणजे पतीने पुरुष म्हणूनच पुढला जन्म घ्यायला पाहिजे आणि पत्नीने बाई म्हणून. बरं आपल्या समाजात, नवरा हा बायकोपेक्षा (अकलेने नस्ला तरी!) वयाने मोठा पाहिजे ही रीत आहे. म्हणजे पुढल्या जन्मी तो बायकोच्या आधी जन्माला यायला हवा. त्यासाठी त्याने ह्या जन्मात बायकोच्या आधी वरची वाट धरायला हवी. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ह्या जन्मी ही पूजा करून बायका आपला नवरा आपल्याआधी मरावा अशीच प्रार्थना करतात काय? Uhoh

Pages