एका लग्नाची (लग्न ठरण्याची) गोष्ट

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

(इथे दिलेले संवाद आणि पात्र, जरी विसंवादी आणि वात्र असले तरी आमच्या समजूती प्रमाणे पूर्णत: काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही चालू अथवा बंद आय डी अथवा बा.फ शी काडीचाही संबंध नाही. आणि जर तसला संबध कुणाला चुकून आढळलाच तर तो योगा योग किंवा दुर्दैवयोग समजावा)
.
आमच्या कथेत कुण्या एका मायबोलीकर तरुणाला कुणी एक मायबोलीकर तरुणी सांगून आलेली आहे. आणि त्या तरुणीच्याच घरी 'बघून घेण्याचा' कार्यक्रम चालू आहे
.
तरुण : नमस्कार
तरुणी : नमस्कार. तुम्ही काय करता ?
तरुण : वात्रटीका करतो, वाद विवाद आणि चर्चा करतो, भेंड्या लावतो
तरुणी : (थांबवत) म्हणजे पोटापाण्यासाठी काय करता ?
तरुण : पोटा पाण्या साठी कँटीन मध्ये जातो. नायतर भटा कडे जाऊन उसळ हाणतो
तरुणी : अगदीच बुवा तुम्ही 'हे'
तरुण : काय झाल ?
तरुणी : अहो नोकरी कुठे करता ? ते विचारतेय मी
तरुण : अस होय मी 'भविष्य निर्वाह निधी' मध्ये असतो. पण काम करतोच अस नाही (ही ... ही)
तरुणी : पूरे. तुम्हाला जेवण करता येत ? करता येत म्हणजे बनवता येत का विचारतेय. नायतर पून्हा पी जे माराल.
तरुण : जेवण ? नाय बूवा.
तरुणी : मग इतकी वर्ष मा.बो वर काय करताय हो? तूम्हाला स्वयंपाकचे कुठलेच बी बी माहीती नाहीत?
तरुण : म्हणजे माहीती आहेत. पण कधी प्रयोग नाही केलेत.
तरुणी : कस होणार बुवा तूमच आजच्या जमान्यात. बर सध्या कुठला आय डी चालवताय ?
तरुण : सध्या बघा (बोट मोडत) वाद विवाद साठी १, प्रतिक्रीया द्यायला २, भेंड्यासाठी १, गुलमोहरवर लिहायला १
तरुणी : (थांबवत) आय डी चालवताय का आग गाडी चालवताय हो? शी बाई किती हा फापट पसारा
तरुण : अरे वा 'फापट पसरा' हा मस्त आय डी आहे. समानतेवर वापरता येइल
तरुणी : आता बाई तुमच्या पुढे हातच टेकले. लग्ना नंतर असली थेर चालायची नाहीत. एक आय डी व्रतस्थ रहाव लागेल. चालेल?
तरुण : ठीक
तरुणी : आणखी एक लग्नानंतर तुम्ही मुलुंड बी बी वर येणार का मी पार्ला बी बी वर यायच ?
तरुण : काहीही चालेल. नायतर अस करू आपण ठाणे बी बी वर जाऊ. तिथे फारस कुणी नसत. चांगला एकांत मिळेल
तरुणी : चावट पणा नको
तरुण : 'चावट पणा' असला कुठलाच बी बी माझ्या माहीतीचा नाहीये
तरुणी : डांबरट पणा नको
तरुण : असलाही कुठलाच बी बी माझ्या माहीतीत नाहीये
तरुणी : आता जर का थांबला नाहीत ना तर. मी ऍडमीनना सांगेन. मग ते तुम्हाला चांगल्या कानपिचक्या देतील
तरुण : (घाबरून) नको नको. आधीच माझे दोन आय डी बंद झालेत
तरुणी : आत्ता कस वठणीवर आलात? सोनारानेच कान टोचावे लागतात.
तरुण : पण माझे कान तर ... (घाबरुन थांबतो )
तरुणी : आणखी एक
तरुण : काय ते ?
तरुणी : लग्न झाल्या नंतर पर स्त्री आय डी कडे वाकड्या नजरेन बघायच नाही अथवा पोष्टायच ही नाही. कबूल ?
तरुण : कबूल. सांगशील तर मी सरळ 'रोम प्रस्थाश्रमात' जाईन .
तरुणी : आणखी एक. दूसर्‍यांच्या खरडवहीत जाऊन आगाऊ पणा करायचा नाही. मान्य ?
तरुण : अरे बापरे. ही लग्नाची वचन आहेत का अणुकराराला पाठींबा देण्यासाठीच्या अमर-मूलायम अटी
तरुणी : (डोळे मोठ्ठे करुन) मान्य आहे का सांगा ?
तरुण : मान्य (न करून करतो काय बापडा. मोठ्ठे डोळे केलेत ते काय उगाच)
तरुणी : ह्म्म
तरुण मग हे देवी. मा बो वर येऊन मी काहीच करायच नाही काय?
तरुणी : नाही कस? सकाळी येऊन किनार्‍यावर सुप्रभात करायचा. दूपारी जाऊन पार्ल्यावर जेवणाचे पदार्थ टाकायचे. मग कुवेतवर जाऊन 'उद्या भेटूया मंडळी' असा सगळ्यांचा निरोप घ्यायचा.
तरुण : अरे वा. इतकी सगळी विधायक काम करायची मी ? ( दबलेला 'खोचक' स्वर )
तरुणी : आणि आठवड्यातून एकदा वाद विवाद आणि चर्चा वर जाऊन ' तूमच बरोबर आहे. तब्येतीत चालू द्या' किंवा ' ह्याला जवाबदार कोण ? ' अश्या अर्थाची प्रतिक्रीया टाकून यायची. जेणे करून ती प्रतिक्रीया नक्की आपल्या साठीच अस त्या बी बी वरील प्रत्येकाला वाटाव.
तरुण : आता माझी ही एक अट
तरुणी : अट ? (ऐकाव ते नवलच अश्या भावाची एक मुद्रा )
तरुण : नाय आपल विनंती विशेष ( रुबाबात चालणार्‍या बोक्याच्या पाठीत काठी बसल्यावर तो 'जितका' खंबीर आणि आत्म विश्वास पूर्ण दिसेल तितका खंबीर चेहेरा )
तरुणी : बोला
तरुण : काय नाय ते आपल हेच ते. आपली ही भेट कृपया तूम्ही 'कांदे पोहे अनूभव वर टाकू नका एवढच मागण. लय नाय मागण. हे एकच
तरुणी : इश्श
तरुण : (बावरुन) काय झाल ?
तरुणी : तुम्हाला कांदे पोहे द्यायचेच विसरले. हे घ्या ना. कसे झालेत सांगा ह ?
तरुण : (कांदेपोहे खात) सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ... (थांबून) माफ करा ह. हल्ली कुणी प्रतिक्रीया विचारली, की अश्याच प्रतिक्रीया निघतात हो.
तरुणी : चालयचच.
तरुण : तुम्ही केलेत ?
तरुणी : नाही हो
तरुण : मग आईने तूमच्या ?
तरुणी : चक
तरुण : अरे बापरे मग बाबांना करायला लावलेत की काय ?
तरुणी : अगदीच बुवा तुम्ही 'हे'
तरुण : 'हे' म्हणजे ?
तरुणी : म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान
तरुण : छान आहे उद्याच बी बी वर टाकतो
तरुणी : कांदे पोहे 'गृहीणी भांडार' मधून आणलेत
तरुण : हो का छान (तरुण आपल्या घराजवळ 'गृहीणी भांडार' कुठे आहे ते आठवण्याचा प्रयत्न करतो) मग मुलगा पसंत आहे का?
तरुणी : (लाजत) होय (पार्श्वसंगीताला श्री. बिसमील्ला खानांची सनई वाजते )
(तर आमच (आमच म्हणजे आमच्या मायबोलीकरांच) जमलेल आहे.लग्नाचे स्थळ काळ आपणाला कळवण्यात येइलच. तेंव्हा समस्त माय बोली करांनी लग्नास येऊन दांपत्यास सढळ हस्ताने आशिर्वाद द्यावा ही विनंती. कळावे. लोभ आहेच. तो व्रुद्धींगत व्हावा. आपलाच एक इरसाल मायबोलीकर)
***************************************************************************************
समाप्त

विषय: 
प्रकार: 

wow!!! मज्जा आली...खुपच छान आहे
लग्न झाल्या नंतर पर स्त्री आय डी कडे वाकड्या नजरेन बघायच नाही अथवा पोष्टायच ही नाही.... Lol टाळ्या....

धमाल रे बाबा केदार.
खरं तर तू पोस्ट केलं, त्याच दिवशी वाचलं, पण ह्सता हसता तुला प्रती-पोष्टायला विसरलो.
अजून (खरंच!) येऊ दे..

मजेदार लज्जतदार
नये स्वाद मे
मायबोली कांदापोहे!
Happy
_________________________
-Man has no greater enemy than himself

लगे रहो .... मस्त जमलयं ...
सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ... हा. हा. हा. :)))

केदार, स्वानुभव तर नव्हे हा? आणि तश्याही तुझ्या "धावत्या भेटी" वाढत आहेत. Proud

जाईजुई : स्वानुभव नाही बर Proud
धन्यवाद चेतना, आरती आणिक भावना Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ

केदार, हे कसं नाहि अजुन वाचनात आल?
मस्तच! Lol

'रोम प्रस्थाश्रमात' जाईन . >> एकदम बेस्ट ....
मस्त रे केदार, मजा आली.

Pages