मुल कितव्या माहिन्यात आधारा शिवाय बसु लागतात?

Submitted by तनू on 13 June, 2011 - 02:32

माझ बाळाला आता ९ महिने पुर्ण झाले, पण अजुनहि तो बसत नाहि किवा रान्गत हि नाहि. पन तो पोटावर मागे मागे सरकतो. डॉ ने सान्गितले आहे कि जर का १५-२० दिवसात त्यात प्रोग्रेस् झाला नाहि तर physiotherapy करावि लागेल. डॉ म्हणतात कि तुम्हि त्याला स्वत बसवु नका, तर आइ म्हनते कि आपन त्याला आधार देउन बसवल्याशिवाय तो कसा शिकनार?
डॉ ने सान्गितले आहे कि रोज त्याला कोवळ्या उन्हात ठेवा, पन आमच्या घरात उन येतच नाहि, तरि रोज १५-२० मि. अम्हि त्याला उन्हात घेउन जातो, आता पावसाळ्यात ते सुद्धा नाहि मिळ्नार.

तरी मुल कितव्या माहिन्यात आधारा शिवाय बसु लागतात?? याबद्दल कोनि मार्ग्दर्शन करु शकेल का?

अजुन एक रोज रात्रि झोपताना त्याला दुध - चपाति भरवलि तर चालेल का? म्हनजे ति पचायला जड नसते ना?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवंतिका, बाळाला बसवायची जबरदस्ती अजिबातच करु नका. प्रत्येक बाळाचे प्रगतीचे टप्पे वेगळे असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा.
आहाराबाबत पण त्यांचेच मार्गदर्शन घ्या. घरातले नेहमीचे अन्न बाळाला द्यावेच, पण त्याच्या प्रगतीचा टप्पा, आवड, पचनशक्ती हे सगळे बघूनच द्यावे. एखाद दिवशी, अगदी एक तूकडा दूध चपाती भरवून बघा. बाळाला काही त्रास झाला नाही तरच, हळू हळू प्रमाण वाढवा. पण तरीही एकदा डॉक्टरांना विचारून बघाच.

thanks दिनेशदा

मि त्याला घरि असताना चपाति भरवते पन ते सकाळी, साबा ना जमत नाहि चपती भरवायाला, मग इतर दिवशी (office days) रात्रि भरवलि तर चालेल का अस मला विचारायचे आहे. पचायला जड पडनार नाहि ना?

बाळासाठी योग्य आहार या बीबी वर चांगली चर्चा आहे.
बाळ आपणहून कुशीवर वळत असेल, पालथा पडत असेल, पुढे सरकत असेल, दोन हातावर मान उंचावत असेल, तर पुढचे टप्पेही गाठेलच. पण ते आपणहूनच !

बाळाची प्रगती ही ब-याच गोष्टीवर अवलंबून आहे, जस की वजन,खूराक,तब्बेत,काही वेळा अनुवांशिक
मात्र ९ महिन्यात त्याने बसलेच पाहिजे असे नाही,सर्वसाधारण ६ व्या महिन्यात बाळ बसायला हवे मात्र बसलेच पाहिजे असे नाही,कधी कधी या गोष्टीस उशीर होउ शकतो आपण किमान १०-११ महिने वाट पहावी नक्कीच सूधारणा होईल.
शूभेच्छा...

बाळ जर कुशीवर वळत असेल आणि इतर क्रिया व्यवस्थित करत असेल तर थोडा वेळ लागू शकेल. तरी सुद्धा एकदा Pediatrician ला दाखवून मग Physiotherapy सुरु करणे. तुम्ही ठाणे मध्ये असाल तर डॉक्टर साने म्हणून फार चांगले Pediatrician आहेत.

काळजी करु नका अवंतिका. डॉक्टर चांगले असतील तर त्यांनी सांगीतल्यानुसार फिझियो केल्याने उलट मदतच होईल.

दूधपोळी कुक्सरुन दुपारला दिल्यास बरे. रात्री, दुध, नाचणी असे काहीतरी बरे पडेल. दात आलेत का?

आंगणवाडी, पेडियाट्रिशियन यांच्याकडे एक ग्रोथ चार्ट मिळतो. त्यात वजन, उंची, शारीर्र्क, मानसिक विकासाचे सगळे मुद्दे असतात. तसा चार्ट आणून मेम्टेन करा..

तुमच्या सर्वांचे प्रतिसादाबद्द्ल आभार.

@किरण कुमार, डॉ ने सान्गितले त्याचे वजन वयाच्या मानाने बरोबर आहे.
@रैना, २ दात अर्धे आले आहेत. दूधपोळी द्यायला साबाना जमत नाहि, मिक्सर मधुन काढुन पन मि भरवनार नाहि अस त्या म्हनतात. आणि office मुळे मलाहि फक्त रात्रिच द्यायला जमेल.

सद्ध्य मि त्याला खिमटि (तांदुळ + डाळ), रवा पेज, नाचणी सत्व, केळे किवा चिकु, सुट्टि च्या दिवशी दूधपोळी एवढच देते. जर खिमटिमध्ये गहु मिसळायचे असतिल तर कसे मिसळायचे म्हन्जे प्रमाण किति??

अवंतिका अजीचबात काळजी नसावी. मोठा लेक ९ व्या महिन्यात सगळीकडे पळत होता तर धाकटी जवळ जवळ १० महीने पूर्ण होईपर्यंत कुशीवरही वळत नव्हती. आणि आजे सासूबाई गेल्यामुळे सासूबाई १५/२० दिवस गावी गेल्या होत्या त्या येईपर्यंत मॅडम आधाराशिवाय चालायला लागल्या होत्या दुडकं दुडकं. सो बाळांना त्यांचे प्रयत्न करु देणं सगळ्यात महत्त्वाचं. काळजीपोटी फार प्रोटेक्ट केलं तरी असं होउ शकतं. आणि हो सॉलीड फूड संध्याकाळी लवकर दिलंस तर चालू शकेल पण शक्यतो मिक्सर मधुन काढुन नको. माझ्या नणंदेच्या मुलीला तर ही सवयच लागली होती आणि मग ती ३ वर्षाची होउनही घास चावेना. सो पेडियाट्रिशियनना कन्सल्ट करच, पण काळजी करण्यासारख काहीच नाहीये.

खरचं अवंतिका प्रेशरमध्ये येऊ नका... सगळ व्यवस्थित होईल. प्रत्येक मुल वेगळच असतं त्याच्या त्याच्या कलान ते करत सगळ व्यवस्थित.

माझी लेक जेव्हा बसायला लागली त्यानंतर ती रांगेल म्हणुन वाट बघितली १-२ महिने नुसती बसुन राहायची काही दाखवले तरी नुसती हसत बसायची पण पुढे सरकणे काही जमल नाही शेवटी रांगणे हा टप्पा सोडुनच दिला, धरुन चालायलाच लागल्या बाईसाहेब एकदम.

तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचुन खरच खुप बर वाटतय, डॉ कडे जाउन आल्यापासुन खुपच टेन्शन आल होत. माझ्या ओळखीतली याच्यापेक्शा लहान मुल आता बसतात आनि रांगतात सुधा, म्हणुन जरा जास्त काळजी वाटत होती.

सर्वांचे प्रतिसादाबद्द्ल आभार.

अवन्तिका , माझी मोठी लेक १० महिन्यांचि झाली तरी रांगतही नव्हती कि पुढेही सरकत नव्हती. नंतर ११ व्या महिन्यात नंणंदेनी बसते का ते बघुया म्हणुन बसवली तर बसायलाही लागली. तर धाकटी लेक ७ व्यातच बसायला लागली. टेन्शन घेउ नका हो. मला अस वाटत काही मुलं शारीरीक कष्ट घ्यायचं टाळतात दुसरं काय?
मुख्य म्हणजे compare करु नका. बाळाला आपल्या मर्जिने करु द्या सगळं.

अवन्तिका बाकी सगळ्यांनी सांगितलं आहेच पण अजून एक म्हणजे फिजिओथेरपी घ्यावी लागेल याचं अज्जिबात टेंशन घेऊ नका. तिथे काहीही त्रासदायक नाही तर मुलांच्या कलाने घेउन छान छान खेळणी देऊन मसाज करतात. त्याने कुठे स्नायु आखडले असतील किंवा त्यात थोडा कमी जोर असेल तर ते दुरुस्त करता येतं. मुलांना अज्जिबात त्रास होत नाही उलट मदतच होते. तेव्हा डॉ. म्हणत असतील तर आरामात न्या फिजिओ साठी. तिला बसून खेळता येतील अशी खूप अ‍ॅट्रॅक्टीव्ह खेळणी आणून पहा. म्हणजे खेळण्यासाठी ती उठून बसायचा ट्राय करेल. किंवा एखादी खुर्ची आणि त्याला पुढे लावलेली खेळणी असं काही मिळालं तर पहा. मग बसायला आवडू लागेल कदाचित.

हो.. वरदाची कल्पना उत्तम आहे.. छान छान आकाराच्या मोठ्या हवा भरायच्या खुर्च्या असतात.. किंवा रोल करणारी खेळणी जी मुलांनी हात लावल्यावर पुढे जातात तशी आण म्हणजे बाळ ते पकडण्याचा प्रयत्न करेल कदाचित.

त्याचप्रमाणे बसणरी बाहुली/बाहुला पण आण.. बाळ बरेचदा अनुकरणातूनही शिकतात.

माझी मुलगी ९ महिन्यापर्यन्त अशीच उलटी रान्गायची. मग ती आजारी पडली आठवडाभर आणि बरी झाल्यावर लगेच रान्गायला लागली आणि उभी पण राहिली आता ती दहा महिन्याची आहे.
मी तीला योगा बॉल वर एक्सरसाइझ करत असे. फिजिकल थेरेपीला न्यायला अजिबात हरकत नाही,
फायदाच होइल.