शिवल्या (तिसऱ्या)

Submitted by मया on 10 June, 2011 - 13:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिवल्या,
आल,
लसूण,
कडीपत्ता,
कोथिंबीर,
हिंग अर्धा चमचा
कोकम ४ ते ५ ,
१ मध्यम आकाराचा बटाटा,
४ ते ५ तुकडे शेवग्याच्या शेंगा,
१ वांग,
१ टोमाटो,
२ मध्यम आकाराचे कादे,
१ कवड सुख खोबर,
मालवणी आहे तोच मसाला टाकतोय
तेल
चाविपुरात मीठ
पानि

क्रमवार पाककृती: 

थोडाशी तुमच्यासाठी माहिती शिवल्या या खाडीत खोल पाण्यात किंवा कडेला सुधा मिळतात या शिवल्या मातीत असल्यामुळे पायाने माती चाळवून किंवा मातीत खणून काढाव्या लागतात याला जाळ वैगैरे असा इतर खर्च नसतो.

प्रथम शिवल्या कर्लून घ्यायच्या म्हणजे त्याची १ शिपि टेवावी. हि १ शिपि हॉटेल मध्ये भरपूर लोक आवडीनि खातात. मी त्याची प्रती तुम्हाला दाखवण्यासाठी खाली टाकली आहे.

आदी तुम्ही सुक खोबर खर्चून घ्या आणि त्याच बरोबर कांदा या दोन्ही गोष्टी चांगल्या रीतीने भाजून घ्याव्यात. नंतर mixer किंवा आपल्या वाट्यावर वाटून घ्याव्यात.

आपण साहित्यात सांगितल्या प्रमाणे १ मध्यम आकाराचा बटाटा, ४ ते ५ तुकडे, शेवग्याच्या शेंगा, १ वांग, १ टोमाटो याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.

एका पातेल्यात तेल घ्याव त्यात कडीपत्ता, हिंग, आले - लसूण पेस्ट टाकावी. अशा प्रकारे आपली फोडणी तयार झाली सुंदर झणझणीत. आता त्यात टोमाटो त्यात टाकावा मग तो चांगला शिजला कि त्या फोडणीत तो एक जीव होतो. त्यात मग आपल्या १ शिपि शिवल्या टाकाव्यात मग त्याला १ वाफ आली कि त्यात बटाटा, शेंगा आणि वांग टाकावं. हे सर्व जिन्नस २ ते ३ मिनिटे पाणी टाकून शिजवाव पातेल्याला झाकण लावून. मग त्यात मसाला टाकावा आणि शेवटी आपल वाटप नंतर चाविपुरात मीठ आणि ३ ते कोकम आणि पुन्हा ते झाकण लावून ५ मिनिटे शिजू द्याव.आणि मग सुंदर तयार झाली आपली तिसऱ्या पाककृती....................

आपल्या मा. बो. करांसाठी काही शुभेछा----

मालवणचो वारो नि
समुद्राचा पाणी
मैत्रीचो सहवास नि
माश्याचो वास
विसृक कधी होव्चो नाय
नि आठवण तुमची इल्या शिवाय दिवस कधी जायचो नाय.

वाढणी/प्रमाण: 
वाटप वाढवाव लागेल. पण जेवढ्या शिवल्या जास्त तेवढी खायला मजा येते.
अधिक टिपा: 

आजून सोपा १ उपाय हे सर्व जिनासाला फोडणी दिली कि ते कुकरात ठेवून २ शिट्या कराव्यात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव्व!! मस्त महेश. आणि शेंगा, बटाटे घालुन म्हणजे टिपिकल गावच्या स्टाईलने. गरमागरम असेल तर आणखी मज्जा येते खायला. Happy

तो शिंपला खायचा नसतो. आमच्या कडे शिवल्या आधी पाण्यात उकडून घेतात. मग त्या ओपन होतात. आम्ही फक्त त्यातले फ्लेश कालवणासाठी वापरतो. शिंपले नाही ठेवत.

अहाहा... मालंडकर साहेब अगदी गावठी चव असावी याला...आणि 'शेशे'ची मिक्सिंग तर अगदी झक्कास्स..!

पण 'तर्री' कुठे दिसत नाहिय...अरेरे.

@ जागू तुजीही रेसिपी सुंदर आहे आवडली.

@चातक चव गावठी आहे कि नाही माहित नाही कारण शेंगा गावाच्या होत्या आणि तिसऱ्या आपल्या मुंबईच्या मार्केट मधील त्यामुळे चव mix असेल गावठी + शहरी.

@ अमी - शिवल्या आईने पहिल्या कापल्या आणि २ तुकडे केले मधून. त्यामुळे ते पहिले उकडले नाहीत.

@ स्मिता गद्रे - आजून सुमुदरात १ गुले म्हणून प्रकार असतो तो फक्त उकडून खातात.

मेधा, भ्रमर, निलू, शैलजा आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

महेश,
अरे वा.. छान रेसिपी Happy
मी शाकाहारी आहे, पण माश्यांच्या पाकृच्या बीबी वर मी हजेरी नक्की लावते. Happy

छान आहे. पण शाकाहारी माणसाने काय करायचे? Sad ( शिंपला कणकेने भरुन घ्यायचा आणि शिजवायचा .. चकोल्यासारखा नवीन पदार्थ मिळेल. Happy )