पावसाची गंमत

Submitted by नीधप on 10 June, 2011 - 09:01

पावसाच्या निमित्ताने माझीच एक जुनी कविता. अलेक पदमसीच्या घराच्या खिडकीतून पाउस बघताना सुचलेली.
-----------------------------------------
तिची एक छोटीशी गंमत आहे.
तिने स्वत:च गुंफलेली,
स्वप्नाळू डोळ्यांनी कायम बघितलेली.

पाउस येतो ना तेव्हा ती पावसाकडे बघते,
आजूबाजूच्या भिंती
अलगद विरघळून जातात,
सगळेच आकार धुसर होतात,
तिचा कणनकण पाऊस पिऊन घेतो,
हळू हळू पाऊसच होत जातो,
शेवटी तीही विरघळून जाते,
पावसाच्या थेंबासारखी,
अम्लान, अनावृत.

अश्या तिच्या स्वप्नात
तिची तंद्री लागून राहते,
आणि मग कधी कधी
खरंच ती पाऊस होते.

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एकदम तरल लिहिलंयस! मला पण पावसाकडे बघत बसायला खूप आवडतं. पण "आता वेळ होत नाही" च्या पडद्याआड असे क्षण क्वचितच वाट्याला येतात.

आयला! हे म्हन्जे कोनीतरी माज्या स्वतः वर कविता केली आसती ना ?????
तर आक्षी ह्येच लिव्ल आसत बगा.......लै झ्याक!