औषधी- तुळ्स

Submitted by अर्चना दातार on 10 June, 2011 - 04:01

औषधी - तुळ
तुळस सहज प्राप्त होणारी परंतु उच्चकोटीचे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. तिचे पान, खोड बी, सर्वच औषधी आहे. तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वस्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते.
तुळशीच्या उत्त्पत्तीविषयी पुराणात काही कथा सांगितल्या आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस निर्माण झली . पुढे ती ब्रम्हदेवाने विष्णूस अर्पण केली तिच्यात सर्व देवतांचे वास्तव आहे.
जालंधर राक्षसाची पत्नी वृंदा हि महान पतीव्रता होती. हिच्या केसापासून तुळस निर्माण झाली असेही म्हणतात.
तुळस हि त्याग आणि समर्पण दर्शवणारी वनस्पती आहे. पुराणात श्री कृष्णाची सुवर्णतुला केल्याची कथा आहे. त्यावेळी खूप सोने एका पारड्यात ठेवले. दुसऱ्या पारड्यात भगवान श्री कृष्ण बसले. तराजू समपातळीवर येईना, तेव्हा रुक्मिणीने तुळशीपत्र मनोभावे अर्पण केले आणि श्री कृष्णाची सुवर्णतुला झली. आपण कोणाला हि दक्षिणा देताना त्यावर तुळशीपत्र ठेवून आपली त्यागाची भावनाच दर्शवतो.
तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यथ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळशी मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे. मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र तुळस, राम तुळस, बाबी तुळस आणि तुकाशामीय तुळस. उष्णतेच्या विकारात तुळशीचे बी पाण्यात भिजत घालून त्याची खीर घेतात. अर्धांगवायू आणि संधिवात यात तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ घेतात. निद्रानाशावर काळ्या तुळशीच्या पानांच्या गोळ्या घेतात. एकाग्रता वाढवण्याचा गुण हि तुळशीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पानांच्या सेवनाने विशेष उपोयोग होओ. प्रसिद्ध चिकित्सक डोक्टर उपेन्द्र रे यांनी संशोधनाने सिद्ध केले आहे कि तुळशीच्या पानात कर्करोग , हृदयरोग, किड्नीचे विकार आणि त्वचा रोग बरे करण्याची अपूर्व शक्ती आहे. बारीक ताप, खोकला, सर्दी या विकारात तुळस गुणकारी आहे तसेच तुळशीची पाने डासांना दूर पळवितात.
प्रख्यात निसर्ग उपचार तज्ञ श्री.कार्तिकेय महादेविया म्हणणतात तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी झले तरी थकवा येत नाही. तुळशीत मानसिक ताण कमी करण्याचा हि गुण आहे.
मूळव्याध, दम, कोरडी खरुज , कावीळ, केस गळणे, क्षयरोग अश्या अनेक रोगांवर तुळस गुणकारी आहे. या गुणांमुळेच आज जगभर तुळशीवर विशेष संशोधन होत असून तुळशीच्या अर्कापासून सिरप , गोळ्या आणि तेल बनवण्यात येते. तुळशीचा चहा हि निसर्गौपाचारातील एक खास निर्मिती आहे.
आपल्या अंगणात तुळशीची विपुल झाडे लावली तर त्या झाडांच्या सहवासामुळे प्रतिकार शक्ती वाढून अनेक छोट्या रोगांपासून सुरक्षित राहता येते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या झाडासमोर बसून दिघ श्वसन केल्यास आरोग्य मिळेल. तुळशीतील या अलौकिक गुणधर्मामुळे आपल्याशी तिचा रोज संपर्क यावा म्हणून आपल्या पूर्वजांनी अनेक व्रत वैक्ल्यात तुळशीचा समावेश केला आहे.
वैशाखातील शुद्ध प्रतिपदेला आणि संक्रांतीच्य दिवशी तुळशीला अभिषेक करतात. वैशाखात रोज तुळशीला पाणी घातल्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते असे म्हणतात. जो मनुष्य रोज तुळशीला दुधाने अभिषेक करतो त्याचे आरोग्य चांगले राहते आणि त्याच्याकडे लक्ष्मी नांदते. जो उन्ह्याळ्यात तुळशीला पाणि देतो त्याची सर्व पापे धुतली जातात असे शास्त्र वाचन आहे.
कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौणिमे परेंत तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. ओरिसातील कुमारिका अश्विनी पौणिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ चंद्राची पूजा करतात. त्यामुळे चांगला पती मिळतो अशी भावना आहे. आपल्याला एकादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू ईष्ट देवतेकडे पोहचते अशी समजूत आहे.
आपल्या देशाप्रमाणे ग्रीस देशात अजूनही संत बेसिल डे नावाचा उत्सव साजरा करतात. या दिवशी तेथील स्त्रिया घरात तुळस आणून तिची पूजा करतात.
कार्तिक महिन्यात तुळशीने विष्णूची पूजा केल्यास त्याला विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळी घरोघरी संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावण्याची पद्धत होती तसेच सकाळी तुळशीला पाणी घालून तिला प्रदक्षिणा घालत त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असे. वारकरी स्त्रिया तुळशीची माळ गळ्यात घालून तसेच डोक्यावर तुळस घेऊन वारीला जातात. प्रवासाला जाताना तुळशीला उजवीकडून प्रदक्षिणा घालतात त्यामुळे प्रवास निर्विघ्न पार पडतो अशी समजूत आहे.
केरळमध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तेथे प्रत्येक घरात तुळशीवृन्दावन असतेच. त्यांच्याकडे विवाह प्रसंगी वधु -वरांना तुळशीचे हार घालतात. ज्याच्या घरी तुळशीचे बन आहे ते घर तीर्थक्षेत्रासारखे समजतात.
तुळशीची महती सांगावी तेवढी थोडीच आहे. तुळशीचे मानवावर अनंत उपकार आहेत म्हणून प्रत्येकाने आपल्या दारात तुळशीचे झाड लावण्याचे व्रत घेउया.

लेखिका- अर्चना दातार
हा लेख माझी वहिनी मासिकात जुले २०१० मधे प्रकाशित झाले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे माहिती.
मी चहात रोज तुळशीची पाने चुरडुन टाकते.

कुठेतरी आयुर्वेदीक माहितीत असे वाचलेले की तुळशीला मंजी-या आल्या की तिच्या पानातले औषधी गुणधर्म कमी होतात, म्हणुन तुळशीला मंजी-या येऊ देऊ नये, खुडत राहाव्यात - हे कितपत खरे?

साधना,
हॉर्टिकल्चर गाइडलाईन्स अशा की फुले/ बिया यांचं निर्माण करताना झाडाची बरीच उर्जा त्यात जाते. त्यामुळे पानांचं निर्माण / पोषण कमी होतं.
बेझील, ओरेगानो, सेज, कोथिंबीर अशा हर्ब्ज वाढवताना सुद्धा कळ्या / मंजिर्‍या खुड्ण्याचा प्रघात आहे.
शिवाय या प्रकारच्या वनस्पतींमधे मुख्य वाढ्णारा अंकुर खुडला तर त्याच्या बाजूने दोन - चार इतर फांद्या फुटतात व झाड जास्त भरुन / बहरून येते . शेवंतीच्या रोपांची देखील कोवळे अंकुर खुडावीत म्हणजे भरपूर फांद्या उगवून झाड फुलांनी गच्च भरते असे रेकमंडेशन आहे.

तुळस ही ओषधी वनस्पती आहे,कोणत्या आजारावर आहे, हे सागितले पण,कशाप्रकारे घ्यायचे ते सागितले नाही............