देई एक अंडे | सॅटरडे संडे |

Submitted by ह.बा. on 8 June, 2011 - 08:01

ह्याला काही विषय ना आशय ! हे मला मान्य नाही. कविता आशय घन आहे. याबद्दल मी आग्रही आहे आणि मी तसे सिध्द करू शकतो. काहिच्या काहि या विनोदी बाजाच्या सदरात हे काव्य टाकले आहे कारण आशय योग्य असला तरी विषय काहिच्या काहिच आहे. कृपया कुणीही मला दुखावणारे प्रतिसाद देऊ नयेत. आधिच मी सर्दीने परेशान आहे. Biggrin

नियमाने रोज | देई एक अंडे |
सॅटरडे संडे | नाही तिला ||

म्हशीच्या कासेला | रोज फुटे पान्हा |
शेणाचाही घाणा | नित्याचाच ||

घर जाई झोपी | ढेकूण जागतो |
चावाया लागतो | सवयीने ||

तैश्यापरी लिही | तोची एक ज्ञानी |
पाल्हाळाच्या खाणी | सदोदित ||

कादंबरी सुचे | तासामागे एक |
ऐसा तो लेखक | अशक्य गा ||

देवा तू एवढी | दिली त्याला शक्ती |
वाचकाला मुक्ती | का नाही बा?||

सारस्वतछाप | खाऊनिया गोळ्या |
लाटता का पोळ्या | खंडीभर ||

कोंबडीच्या मदतीला | आली हो तलंग |
मारू लागे डंख | हबास ती ||

साधा भोळा हबा | त्याला सांगे ज्ञान |
हबाला का फॅन | नाही असा ||

सर्वांचा आभारी आहे!

तलंग म्हणजे काय? >>> अजून अंडे न घालणारी/लहान कोंबडी. तरूण कोंबडी. वजन कमी असल्याने सहसा हिला कापत नाहीत. पण पर्याय नसल्यावर कापली तरी चालते.

ताई म्हणे मला | छोटा भाऊ माझा |
नाव त्याचे ह.बा.| असतसे ||

खोडी काढे उगा | कोणा एखाद्याची |
ताईला ते त्याच्या | रुचेचना ||

म्हणून घातला | एकच धपाटा |
भाऊ विसरला | नाते तेंव्हा ||

ताईलाच लागे | कापाया तो कसा |
जमाना हा असा | आला आहे! ||

चुकले माकले | माफ कर भावा |
नकोसे ते नाते | तोडुया का ??? || Sad

म्हणून घातला | एकच धपाटा |
भाऊ विसरला | नाते तेंव्हा ||

>>>

माझी ताई नाही | तलंग कोंबडी |
धिप्पाड लांबडी | बाई असे ||

उकिरंडा त्यांचा | राखावयासाठी |
आम्हा पाठी काठी | सदा तुझी ||

शहाणपाणाचा | धपाटा कळतो |
विरोध जाणतो | बंधु दिदे ||

खुशाल सांभाळा | लाडाचा तो बंड्या |
मारू नका खंड्या | गरीब हा ||

माझी ताई नाही | तलंग कोंबडी |
धिप्पाड लांबडी | बाई असे ||>>>

सुंदर विचार हबा, खूप सुंदर! शोभतात आपल्या प्रवृत्तीला!

(अवांतर - सानी, अहो हत्ती चाललेला आहे, असे भुंकणे शोभते का आपल्याला?)

चुकले हो बेफिजी... हबाच मला ताई म्हणायचा, म्हणून त्याला आठवण करुन दिली. पण तो त्याच्या शब्दांना जागतो आहे.

तलंग म्हणजे काय? >>> अजून अंडे न घालणारी/लहान कोंबडी. तरूण कोंबडी. वजन कमी असल्याने सहसा हिला कापत नाहीत. पण पर्याय नसल्यावर कापली तरी चालते.>>> त्याला पर्याय नसल्याने कापतो आहे तो. जाऊदेत. Sad

सुंदर विचार हबा, खूप सुंदर! शोभतात आपल्या प्रवृत्तीला! >>> अरे वा! बेफिकीर आले... आता त्यांच्या सर्वज्ञात सात्विक वृत्तीचे तेज अवघ्या माबोला तेजोमयी करून टाकेल... बेफिकीर आपण आपल्या तेजस्वी विचारांची पखरण करत रहा इथे...
त्याला पर्याय नसल्याने कापतो आहे तो. >>> सानिताई, तुला भावाची बाजू नेहमीच चुकीची का वाटते? शेवटी भावालाही काही भावना आहेत... त्या बर्‍या. वाईट, निम्नवाईट, पुर्णवाईट... त्यात तुला डॉन कोंबडीची भावाशी असलेली मैत्रीही पुर्ण माहिती नाही. तरीही तू मलाच बोलतेस. मला माफ कर... पण अशा वेळी, सारासार विचार करून तुला कापावीच लागेल...
बेफिकीर, सॅटरडे संडे नियमाने आज आपण नविन भाग लिहीला असेलच. तो मी वाचून येतो. आपण येथे क्रमशः करावे.

मी " डॉन कोंबडी" ला किती वेळा आणि किती बोलले आहे, हे तुझ्या वाचनातून सुटलेले दिसते...
पण असो, मी कशी दिसते, हे नक्कीच तुला माहिती नाही, म्हणूनच तू माझ्या दिसण्यावर अशी हिडिस टिप्पणी केली आहेस! राग आला की तू किती वाईट बोलू शकतोस, हे समजले मला. पण मी तुला भाऊच मानते, त्यामुळे तुला माफ केले. तू चालूदेत तुझे! मी नाही मधे पडणार यापुढे.

राग आला की तू किती वाईट बोलू शकतोस, हे समजले मला. >>

आपण पुन्हा चुकताय सानी, ते नॉर्मलच तसे बोलतात. राग आपल्याला आला आहे. त्यांना नाही. ते तसे बोलतात हा दोष त्यांचा नाहीये ! .......... !!

हाही प्रतिसाद मूळ धाग्याइतकाच अवांतर असल्याबद्दल अ‍ॅडमीन यांच्याकडे क्षमेची याचना करत आहे.

Lol

मी कशी दिसते, हे नक्कीच तुला माहिती नाही, म्हणूनच तू माझ्या दिसण्यावर अशी हिडिस टिप्पणी केली आहेस! >>> तुझ्या दिसण्याचा आणि माझ्या टिप्पणीचा संबंध नाही. खरं तर मी कोंबडीच्या दिसण्याबद्दलही काहीच बोललेलो नाही. विस्।अय भलतिकडे नेऊ नको.

पण मी तुला भाऊच मानते, त्यामुळे तुला माफ केले.>>> चिमुरड्या भावाचा असा सहानुभुतीने विचार केल्याबद्दल अखिल रक्षाबंधन समिती रेठरे खुर्द तुझी आभारी आहे.
मी नाही मधे पडणार यापुढे. >>> किती छान निर्णय आहे हा. आधि घेतला असतास तर लोकांनी भाऊ-बहीण अध्याय पाहिला का? नवा एपिसोड बघितला का? असले आगाऊ धंदे केले नसते. असो. त्यांना मी नंतर धन्यवाद देईनच.

पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे.

बेफिकीर,
अहो किती काळजी घ्याल? ती आणि मी घेतो ना बघून. आपण का पायात येताय सारखे. चिरडाल आणि मग बसाल पंधरा दिवस माझ्या नावाने लंगडत.

Lol

अंडा ना होता तो मुर्गीया ना होती
जो मुर्गीया ना होती तो पार्टीया ना होती
पार्टीया ना होती तो आशिकीना होती
जो आशिकी ना होती तो जिन्दगी न होतीईईईईईईईईईईईईईईईईईईईई

Pages