देई एक अंडे | सॅटरडे संडे |

Submitted by ह.बा. on 8 June, 2011 - 08:01

ह्याला काही विषय ना आशय ! हे मला मान्य नाही. कविता आशय घन आहे. याबद्दल मी आग्रही आहे आणि मी तसे सिध्द करू शकतो. काहिच्या काहि या विनोदी बाजाच्या सदरात हे काव्य टाकले आहे कारण आशय योग्य असला तरी विषय काहिच्या काहिच आहे. कृपया कुणीही मला दुखावणारे प्रतिसाद देऊ नयेत. आधिच मी सर्दीने परेशान आहे. Biggrin

नियमाने रोज | देई एक अंडे |
सॅटरडे संडे | नाही तिला ||

म्हशीच्या कासेला | रोज फुटे पान्हा |
शेणाचाही घाणा | नित्याचाच ||

घर जाई झोपी | ढेकूण जागतो |
चावाया लागतो | सवयीने ||

तैश्यापरी लिही | तोची एक ज्ञानी |
पाल्हाळाच्या खाणी | सदोदित ||

कादंबरी सुचे | तासामागे एक |
ऐसा तो लेखक | अशक्य गा ||

देवा तू एवढी | दिली त्याला शक्ती |
वाचकाला मुक्ती | का नाही बा?||

सारस्वतछाप | खाऊनिया गोळ्या |
लाटता का पोळ्या | खंडीभर ||

कादंबरी सुचे | तासामागे एक |
ऐसा तो लेखक | अशक्य गा ||

देवा तू एवढी | दिली त्याला शक्ती |
वाचकाला मुक्ती | का नाही बा?||
>> Happy

म्हशीच्या कासेला | रोज फुटे पान्हा |
शेणाचाही घाणा | नित्याचाच ||>>>>>>> Biggrin

घर जाई झोपी | ढेकूण जागतो |
चावाया लागतो | सवयीने ||>>>>>>>>> Rofl

कादंबरी सुचे | तासामागे एक |
ऐसा तो लेखक | अशक्य गा ||>>>>>>> सत्य आहे. Proud

देवा तू एवढी | दिली त्याला शक्ती |
वाचकाला मुक्ती | का नाही बा?||>>>>>भारी आहे. Lol

सर्वांचा आभारी आहे!

लाजो,
मी कुणावरही डोळा ठेवत नाही. या काव्यात कुणाचा अपमान नाही. ही मानवी मनाची वक्रोक्तीत लिहीलेली एक उत्स्फुर्त अभिव्यक्ती आहे. सगळी शक्ती पणाला लाऊन हे स्पष्टीकरण दिले आहे. पण तरिही, आज आपण मला असे बोलून दुखावले आहेत. हे दुखः आता मला पेलवणार नाही... आता मी.... हं.... श्श्श्शी... दुष्ट कुठली!

हबा... मला का दुष्ट म्हणता? मी तर अगदी सहजच विचारलं होतं Sad

बिचारी लाजो | म्हणतसे थांबा ||
माझ्यावर वक्र डोळा | नको हो ह्बा???? ||

माझ्यावर वक्र डोळा | नको हो ह्बा????

नको का हो? काय ते एक सांगा. असे द्विअर्थी लिहीलेले समजत नाही मला. त्यात वर पुढची प्रश्नचिन्हे का घातलीयेत?

छान! Happy

Happy
Happy

_/\_ Happy

Pages