विठूचा गजर...

Submitted by संयोजक on 15 September, 2007 - 01:53

समिती
१. अज्जुका
२. ट्युलिप
३. वाटसरु

नियमावली:
१. कवितारूपातूनच कथा पुढे न्यायची आहे.
२. कवितेचा फॉर्म ओवी, अभंग, आर्या, गझल, हायकू, छंदोबद्ध वा मुक्तछंद इत्यादीपैकी काहीही असू शकतो. याबाहेरचा फॉर्म असायलाही हरकत नाही पण ते गद्य असता कामा नये. वर्णनासाठी किंवा घटना सांगण्यासाठीही पद्याचाच वापर करणे बंधनकारक आहे.
३. स्वप्नातून जागे झालो किंवा तत्सम क्लुप्त्या वापरून कथा जागेवर आणण्याचा अतिरेक होऊ नये. याबाबतीत गद्य STY चेच नियम लागू पडतील.
४. नेहमीच्या पेक्षा थोडी वेगळी कथा आहे आणि आपल्याला ती १० दिवस पुढे नेत जायची आहे तेव्हा पोस्ट टाकताना आपण शेवटाला येत नाही आहोत ना याची खबरदारी घ्यावी.
५. साधारण ८-९ व्या दिवशी अंदाज घेऊन शेवटाकडे जाण्यास सुरूवात करता येईल.

विठूचा गजर...
आषाढी एकादशी, पंढरी देशी,
सर्व पाप नाशी, म्हणे कोणी

कोण भाग्यवान, देवाचीच शान
पुजेचा हो मान, मुख्यमंत्र्या

पुजेचा थाटमाट, सुरक्षित वाट
मंदीरात लाट, घोषणांची

ताफा बरोबरी, जय हरी हरी
माझी हौस पुरी, दर्शनाची

जय जय राम कृष्ण हरी!!
मुख्यमंत्र्यांना विजयी करी!!
बाकी सगळ्यांचे पोट भरी!!
जय जय राम कृष्ण हरी!!

टाळ माझ्या हाती, अंतरात भक्ती
डोळे वेध घेती, सावळ्याचा

पाहू जाता नवल, एक प्रतिमा पोकळ
आतमधे सकळ, विठू नाही

विठू नाही विठू नाही
विठू कुठे विठू कुठे

विठू काही दिसेना, खूण त्याची मिळेना
गजर काही थांबेना, मंदीरात

विठू नाही गाभारी, साहेब आहे बाहेरी
सपत्नीक पुजा करी, पोकळीची

सुन्न झाले मन, सुन्न झाले तन
डोळी अडकले प्राण, अश्रूंमध्ये

विठू नाही विठू नाही
विठू कुठे विठू कुठे

साहेब, बघा विठू नाही!
मॅडम, बघा विठू नाही!
गजर थांबवा, पुजा संपवा
विठू नाही विठू नाही!!

गप्प रहा बाब्या,
साहेबांची नजर बोलली
असं बोलू नये बाबासाहेब,
साहेबांची पत्नी बोलली

अहो पण...
खरंच विठू झालाय गायब
आतमधे नाही तो
आत फक्त सावळी सावली

गर्दीही सगळी आता बघे मला रोखून
झाकपाक त्यांची काढली ना ओढून
प्रतिमा पोकळ हसे गाभार्‍याच्या आतून
साहेबही हसे आतल्याआत चिडून

काय करायचा विठू, विट तर आहे
विठू गेला तरी, प्रतिमा तर आहे
मंदीर आहे, पुजारी आहे, गर्दी आहे
बोलला साहेब पुजेचा मान तर आहे

विठू कुठे विठू कुठे
विठू नाही विठू नाही

तोंड आवर बाब्या
इथून काळं कर बाब्या
साहेबाला शिकवितो
लै शेना हेस रं बाब्या

हाकला त्याला, मारा त्याला
मंदीराच्या बाहेर फेका त्याला
जा बाब्या जा, नकोस तू इथे
अजिबात येऊ देऊ नका याला

खरचटले तन, ओरखडले मन
येईवो धावून, विठूराया

बाहेर अंगणी, एकटी रूक्मिणी
तिचिया चरणी, धाव घेई

माई हरवला, विठू कुठे गेला
सोडून एकटीला, इंद्रायणी काठी

दुखली रूक्माय, म्हणे नवीन काय
कधी पळाला काय, कळलेची नाही

कोलटकरांचा अरूण, एकदा घाबरून
अशीच धांदलून, बातमी दिली

का नाही शोधला, सखा हरवला
प्रश्न विचारला, म्या उद्धटाने

रूक्माय गप्पशी, दगडच जशी
उत्तरं नकोशी, झाली तिला

सगळे समजलो, प्रवासी झालो
शोधाला निघालो, सावळयाच्या

विठू कुठे विठू कुठे
विठू नाही विठू नाही

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इये पंढरपूर नगरी
झाली भक्तांची गरदी
मनी दर्शनाची आस
जणू विठ्ठलच श्वास

मंत्र्याची सरेना आरति
रांग कशी जावी पुढति?
कसा लागतसे वेळ
साऱ्या भक्तांची तुळतुळ

तश्यात बाब्या बाहेर आला
आनि म्हणे विठू हरवला...

काऽऽऽय? आरंऽऽऽऽ देवाऽऽऽऽ

आवो असं कसं झालं? विठू हरवला..
आत्ता काय मी करू? विठू हरवला..
ऐका रं ऐका.. विठू हरवला....
विठू हरवला.. विठू हरवला.. विठूऽऽऽऽ हरवलाऽऽऽ

साऱ्या भक्तांची कलकल
करा काही हालचाल
असा कुठे हरपला
शोधा विठूरायाला

मंत्र्याचे लागले ईंडीकेटर
जमा झाले सारे पंटर
आला प्रसंग असा बाका
व्हावी कशी यातून सुटका

निवडणूक तोंडावर
ठपका नको साहेबांवर
म्हणे गृहखात्याचे हे काम
साहेब खूश झाले जाम

लावा फ़ोन हो 'आबांना'
सांगा धाडा पोलिसांना
चेंडू पल्याड कोर्टात
द्यावे निवेदन थाटात

तिकडे खणाणला फ़ोन
'हरवलाय म्हणे कोण?'
'येईना का आयकायला?
अहो विठूऽऽऽ हरवलाऽऽऽ'

देवा रं देवा... विठू हरवला
कुणाला सांगू विठू हरवला
आर आर आबा, विठू हरवला..

विठू हरवला.. विठू हरवला.. विठूऽऽऽऽ हरवलाऽऽऽ

गिरी, छान आहे रे, सुरुवात कोणी लिहिली आहे ते पण छान आहे. लिहा ना पुढे... कुठे गेले सगळे कवी, कवयित्र्या... Happy

-लालू

लालु, तू आणि कवयित्र्या??? Happy

त्या गद्य STY मधल्या बाबुराव आपटे च्या तोंडी एक शब्द दिलाय ना तसं वाटतंय ते कवयित्र्या ऐकायला ..

विठू हरवला
विठू हरवला
आक्रोश चालला
जाणिवांचा

सर्व जग जरी
राहिले अभंग
हरवले अंग
अंतरीचे

बरे झाले बाब्या
म्हणती वासना
आता मुक्त घेण्या
उपभोग

तरीही मानेना
जीव कासावीस
निघे शोधण्यास
मूलतत्व

त्या मठात बाबांच्या
चल पाहू जाऊनिया
असे त्यांची सर्व माया
अकल्पित

सदैव राबता
मठाचिये दारी
मर्सिडिज भारी
बाहेरी उभ्या

कृपा करा बाबा
विठू भेटण्याला
तो हात पसरला
बाबांनीच

आधी कृपा द्यावी
तुमची आम्हांला
सोडता लक्ष्मीला
देईन विठू

हाणोनीया सोटा
तयाचिया माथी
परतलो पाठी
आल्या वाटे

जेथे असे डोळां
तुझ्या "मनी" वरी
तेथे भोळा हरी
भेटणार नाही

सत्य नारायण पूजा
शब्द दुरून दिसले
जरा हायसे वाटले
जीवालागी

व्रत फार पुण्याईचे
जिथे उद् घोष मंत्रांचे
सखा हृषिकेश तिथे
असेलच

तिथे जाऊन पाहीले
काय स्वरूप पूजेचे
सदा उच्चार "मुंगळाचे"
चालियेले

यजमान चित्त ठेवी
दक्षिणा ती किती द्यावी
की खारीक घालावी
किडलेली

यजमानीण आनंदी
कशी बरी मिळे संधी
नव्या डायमंडची खरेदी
दाखविण्या

सोशल गॅदरींगसाठी
सत्यनारायणाचा मौका
मग साधूवाण्याची नौका
बुडेलचं

विठू कैचा येई जिथे
चित्त क्षुब्ध अपवित्र
टाका तुळशी सहस्त्र
व्यर्थ गेल्या

आकळेना माझे मति
कुठे शोधू रमापती
जन्मजन्मांचीही भ्रांती
वासनांसंगे

मग पुन्हा उमजून
स्थिर चित्तही ठेवून
बाब्या निघे मधुसूदन
शोधावया

मस्त चाललंय. लगे रहो!!

क्ष, गिरी मस्त रे

क्ष, छान जमले आहे.

>>यजमानीण आनंदी
कशी बरी मिळे संधी
नव्या डायमंडची खरेदी
दाखविण्या
LOL..

-लालू

पुढे सरकतेय की नाही कथा?

मस्तच एकदम, पुढे सरकवा कि रे

बाब्या निघे दूरदूर | ओलांडून पंढरपूर |
मनी उठते काहूर | आता कुठे शोधू तुला?
सैरभैर बाब्या झाला | वाटा फुटल्या पायाला |
दशदिशा सादावल्या | त्याने प्राणपणाने | |
आणि येई प्रतिसाद | काय धरीसी मनात? |
प्राण आणून कानात | बाब्या ऐके | |
बाब्या धन्य धन्य होई | डोळावाटे नीर वाही |
दर्शन दे विठूमाई | कसेबसे उद्गारला | |
डोळे तेजाळून गेले | मस्तक हळूच झुकले |
शब्द आतच विरले | हात जुळले आपोआप | |
काहो सोडिले मंदिर? | भक्त झाले सैरभैर |
आणि सुने पंढरपूर | कळवळून बोलतो | |
विठू हसला गालात | म्हणे काय मांदिरात |
तिथे देखावाच फक्त | भक्ती भाव लोपलासे | |
माझे काय? जिथे भाव | तिथे माझे वसे गाव |
एक जैसे रंकराव | तिथेच पंढरी | |
तसे नुरले रे आता | आता नुसत्याच बाता |
देव निघुनिया जाता | उरे कळस सोन्याचा | |
पण कुणा काय त्याचे | नाते तुटे भक्तदेवाचे |
जोतो तालावर नाचे | सत्ता आणि पैशाच्या | |
बाब्या होई चूरचूर | जाई फाटून अंतर |
आता उजाड मंदीर | तुझ्याविणा देवीवरा | |
देव म्हणे माझे ऐक | करू नको दमछाक |
एक दृष्टीक्षेप टाक | मनातल्या मंदिरात | |
नसे सोन्याचा कळस | नाही कसली आरास |
साहेबांचा नसे त्रास | तिथे फक्त तू नी मी | |
नको रांग नको हार | नको दारी भारी कार |
होई सगुण साकार | मनामधे विठू तुझा.

काय मस्त गं. आता शेवट करणं सोपंच झालं की मला..

विठू नाही मंदिरी
न दिसे शेजारी पाजारी
कुणी न पहिला बाजारी
बाब्या कंटाळला

बाबी ला चिंता भारी
म्हणे 'माझं ऐका तरी'
जाउ दोघे देशांतरी
विठला शोधायाला

बाब्या करे तयारी
दागिने, कपडे भारी
बाबीच्या साड्या भरजरी
बँगामाजी कोम्बियल्या

दोघे जाती दूर देशा
शोधिती दश दिशा
वेग वेगळे वेष वेगळ्या भाषा
पण विठू लोपलेला

अतिपूर्व झाली, पूर्व झाली
दक्षिण पूर्व, मध्यपूर्व झाली.
जवळची आणि दूरची
शोधली उत्तर दिशा

विठू कुठे दिसेनाही
मशिदी, स्तूपांन्मधेही कुणी नाही
चर्च मधे नुस्त्या चर्चा प्रवाही
विठूसाठी बाब्या व्याकूळला

अतिपश्चिम अति प्रगत
प्रेमाने करतील स्वागत
निश्चित मिळेल मदत
विठूला शोधायला

बाब्या आधी पोचे किर्ती
सी एन एन एई जे एफ के वर्ती
कितीक सुंदर्‍या अवती भवती
बाबीने हात घट्ट धरीला

नासा ने टेकले हात
सी आय ए ने नुस्तेच विचकले दात
यु एन ने काढली वरात
पण विठूचा पत्ता नाही

बाब्या थकला भागला
जीव मेटाकुटीला आला
फोन करे केळकराला
जुना मित्र तो कॉलेजातला

केळकर लगेच काढी
नवी आलिशान गाडी
बाब्या अन बाबीला बिर्‍हाडी
नेतसे आपुल्या.

केळकराचे घर मोठे आलिशान
तरी केळकरीण म्हणे लहान
रहाती दोन थोर दोन सान
पुरेनात परी दहा खोल्या

केळकराची धाकटी
मोठी गोड गोमटी
बाबीला म्हणे 'मम्मा ची मोठी
बहीण का तू मावशी?'

बाबी कौतुकाने हसे
केळकरीण लेकीस पुसे
काय काढलेस कामसे
गोड बोलणे कशाला

धाकटी म्हणे बाबीला
तुम्ही मदत करा मला
ऍलेक्स लेमोनेड स्टॅड लावला
मी अन माझ्या दादाने

प्रश्न बाबा अन बाबीला
केळकराने सोडवीला
माहिती देई मित्राला
लेमोनेड स्टँड ची

बाबी गेली हरखून
म्हणे बाब्याला ओरडून
काढा पैसे खिशातून
विठू सापडला

देश धर्म भाषा विसरती
एक मेकांना मदत करती
नसे ऍलेक्सिस या जगती
तरी चालवती तिचा वारसा

ह्याच विठूच्या पाउलखूणा
शंका नच आता मम मना
करा फोन मंत्र्यांना
विठू सापडला

तेव्हढ्यात अकस्मात
होई घंटानाद
दरवळे कस्तुरि परिमळ घरात
विठू प्रगटला

एकवटले पंचप्राण कानी
आला गळा भरूनी
बाब्याच्या नयनी
नीर वाहे घळघळा

विठू हात जोडतो
' विनंती तुम्हाते करतो
मी येथेच रहातो.
सांगू नका कुणाला'

बाब्या जाई मायदेशी
झणी भेटें मंत्र्यांशी
' विठू नाही या विश्वी
हेच सत्य जाणा तुम्ही"