Submitted by योग on 7 June, 2011 - 04:24
कढ
धुक्याची शुभ्र शाल पांघरून बसली होतीस
भोवती पडणार्या बर्फाची भुरभुर पहात..
तेही क्षणात वितळत होते पण तू मात्र
निश्चल, थंड.
"गोठणे" तुला पाहून त्याला जमले असते कदाचित.
तरीही तुझ्या डोळ्यातील कढ-
पायतळी ते बर्फ चुरचुरत होते.
गुलाबी थंडीत शेकोटोभोवती मुसमुसलेले सौंदर्य तेजाळताना खूप पाहिलय
पण त्या रात्री,
त्या टपोर्या ठिणग्या,
एक गोठलेला ऊभा आसमंत पेटवताना पाहिले-
आणि सौंदर्याचे अर्थ नव्याने ऊलगडले.
मी तुझ्या नकळत तिथेच ऊभा- जळत होतो.
ती कढ मलाही लागली नाही तरच नवल होते.
आताशा ऊकळ्या आणि बुडबुडे यांची सवय झालीये
गोठलेलं वितळवणारी ती कढ त्यांच्यात नाही.
गुलमोहर:
शेअर करा
आवडली.
आवडली.
ती कढ मलाही लागली नाही तरच
ती कढ मलाही लागली नाही तरच नवल होते.
>>> कढ ऐवजी धग हा शब्द या ओळीत फिट झाला असता असे वाटते. दु:खाचा कढ दाटून आला असं बोलतात ना?