थंड हवेच्या ठिकाणी सूर्य उजाडता उजाडता आजूबाजूची मैलोनमैल पसरलेली मुलायम हिरवळ दिसू लागावी..... त्यातच एका गुलाबाच्या रोपाला एकही काटा नसावा आणि त्याची पहिलीवहिली लाल रंगाची कळी अलगद उमलावी... तीवर सूर्याचा पहिला किरण पडावा आणि त्या कळीने कुमारिकेच्या लज्जेने आपल्या रंगावर शरमेची सोनेरी झळाळी चढवावी... पहिल्या वार्याच्या सुखद झुळका अंगाला स्पर्शून जाताना सांगत असाव्यात.. निसर्गाच्या आणि मानवी मनासाठी असलेल्या सुखाच्या शिखरबिंदूवर तू आत्ता आहेस... त्या कळीचा नवानवेला सुगंध आसमंतात विखुरतानाच त्या सुगंधाने मोहरलेली हिरवळ डोलू लागावी... दुधात केशर पडल्यावर येणारा रंग क्षितीजाला मिळत असतानाच अचानक श्रावणातील सरीचा एक थेंब खांद्यावर पडावा...
... आणि मंत्रमुग्ध होत माणसाने फक्त तो अनमोल क्षण जपुन ठेवावा...
अशा क्षणांनी गच्च भरलेल्या लाटाच्या लाटा येत होत्या आत्ता!
येतात बरे असे अनेक क्षण! की जे फक्त अनुभवावेत! दुसर्याला सांगताना त्यातील तीव्रता अशुद्ध होते. त्यातील जादू निरागस जादू राहात नाही. आपली तेवढी कुवत नसते की त्या क्षणातील मानवी भावभावना शब्दात प्रकट करून अगदी होत्या तशा दुसर्याला कळाव्यात!
आजवर कोणत्याच सफरीने, कोणत्याच प्रवासाने माधुर्याची ही परमोच्च अवस्था अनुभवलेली नसेल! असे युगुल बघितले नसेल जे केवळ आणि केवळ नजरेनेच एकमेकांशी परिचित असूनही सफरीत आहे.. एका अनोख्या!
"न...नकोच.. का?"
उमेशच्या या घोगर्या, त्याला स्वतःलाच अपरिचित असलेल्या आणि अस्पष्ट आवाजातील प्रश्नावर त्याच्याकडे वळून बघण्याइतकेही धाडस निवेदिताकडे नव्हते... काय म्हणायचे होते कुणास ठाऊक त्याला...
नुसत्याच आपल्या पापण्या दोन तीन वेळा फडफडवून बाहेरच बघत बसलेल्या निवेदिताने उमेशच्या या प्रश्नावर क्षणभरच आपल्या डोळ्यांच्या कोपर्यातून लक्ष दिल्यासारखे भासवले.. जे उमेशला नीटसे जाणवलेही नाही..
त्याला वाटले की ... हिला ऐकूच आला नाही प्रश्न गाडीच्या आवाजात!
"जा.. यला?"
आयुष्यात कित्येक मुलींबाबत मित्रांबरोबर चर्चा केलेली असली तरीही प्रत्यक्ष एका आवडत्या मुलीशेजारी बसमध्ये बसून प्रवास करणे आणि तोही काहीसा चोरटा, ज्याचे परिणाम काय होतील याबाबत खात्री नाही आणि तरीही अत्यंत हवाहवासा.. लोभस! उमेश अंतर्बाह्य थरारला होता. आणि याच मनस्थितीत मुलांना भीती वाटू शकते. आपण जे करत आहोत त्याबद्दल काय म्हंटले जाईल, याचे परिणाम काय होतील अशी भीती! जमेस एकच घटक होता तो म्हणजे या दोघांचे आधीपासून असेच ठरलेले होते हे खोटे आहे हे क्षमा ठामपणे म्हणणार होती आणि उमेशही घरातून निघताना पहिल्यांदा काकूच करत होता हे निदान त्याच्या आईबाबांना माहीत होते.
मात्र या प्रश्नामुळे आता निवेदिताचाच गोंधळ झालेला होता. मनातील ९९ टक्के भाग या सहलीस आतुरलेला असला तरी उरलेल्या एक टक्याने सातत्याने एक हुरहुर जाणवत ठेवलेली होती की 'हे जे तू करत आहेस ते चूक समजले जाते'! आणि त्यामुळे त्या ९९ टक्के भागाचे सामर्थ्य नष्ट होत राहिलेले होते. ज्या क्षणापासून असे ठरले की खरोखरच आता दोघे निघाले आहेत त्या क्षणापासून ही हुरहुर एखाद्या सुईसारखी बोचत होती आणि त्या वेदनेमुळे मिळत असलेल्या सुखात आणि मनात एक मोठी भिंत तयार होत होती. संध्याकाळी सूर्य मावळताना आपल्या मनात या सहलीबाबत पश्चात्ताप असेल की काय अशी भावना पोकळी निर्माण करत होती. वाड्यात पोचल्यावर एका अत्यंत मानहानीकारक स्वागतास सामोरे जावे लागेल की काय हा विचार आत्तापासूनच या गोड गुलाबी सफरीला गालबोट लावत होता.
खिडकीतून येणार्या वार्यामुळे डावा गाल थंड पडत चालला असला तरी चोरटेपणाच्या भावनेमुळे रुमाल धरलेला डावा आणि पुढच्या सीटमागे असलेला बार धरलेला उजवा तळवा घामेजून गेलेले होते. भुरभुर उडणार्या केसांना पुन्हा कानामागे बसवण्यात आता दिलचस्पी राहिलेली नव्हती कारण ती सूक्ष्म हालचालही निरखली जाईल व त्याचा सद्य स्थितीत काहीसा वेगळाच रोमांचक अर्थ काढला जाऊ शकेल हे समजू लागलेले होते. आपली ओढणीही वार्याबरोबर हालत हालत आपल्या उजव्या मांडीची मर्यादा ओलांडून पुढे सीटवर पडलेली आहे आणि तेथून उमेशच्या डाव्या हाताची बोटे केवळ चिमूटभर अंतरावर आहेत हे माहीत झालेले असूनही ती ओढणी सावरून पुन्हा मांडीवर घेण्याची हिम्मत नव्हती कारण.. चुकून जर त्याने ओढणीचे ते टोक त्याच्या बोटात खरच धरलेले असले तर?? काय होईल?? सगळे आत्ताच स्पष्ट होईल?? आणि त्याचा परिणाम? सिंहगडपर्यंत पोचू शकू आपण? की उतरावेसे वाटेल? अक्कल कशी नाही आपल्याला मुळातच बसमध्ये चढताना! लोकांना काय वाटेल?? क्षमाचा तो ग्रूप थांबेल तरी का आपल्यासाठी? कुणी माहितीतल्याने पाहिले तर??
निवेदिताला स्वतःच्या वक्षातील धडधड बसच्या आवाजापेक्षाही अधिक ऐकू येत होती. रस्त्यामुळे बसणार्या प्रत्येक धक्यानिशी आपण अधिकच उमेशच्या बाजूला सरकत आहोत असे उगाचच वाटत होते. आणि आपण सरकत नसलो तरी तो सरकत असेलही असेही वाटत होते. ओठ कोरडे पडलेले होते. कित्येकदा त्यावर जीभ फिरवली तरी ती शुष्कतेची भावना मनातून जात नव्हती. अजूनही एकही प्रवासी चढलेला नव्हता तीन स्टॉप्स गेले तरी! त्यामुळे तर आणखीनच थरथरल्यासारखे होत होते. पण निवेदिताने साहस केलेच. करायलाच हवे होते. त्याशिवाय पर्याय नव्हता. उगाच आय ए टी च्या स्टॉपइतके लांब गेल्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यातही काही अर्थच नव्हता. घ्यायचा असलाच तर आत्ता तरी घेतलेला बरा!
झटकन मान फिरवून तिने उमेशकडे पाहिले आणि तितक्याच झटकन विचारले..
"का रे??"
"अं?? .. नाहीतर... काहीतरी.. म्हणजे गैरसमज व्हायचे... "
"कुणाचे??"
"म्हणजे.. आईबाबांचे वगैरे.. "
"बाबा नाहीच्चेत घरी... ते तीन दिवस लोणावळ्याला गेलेत काल रात्रीपासून... "
क्या मौसम है... ऐ दिवाने दिल... चल कही दूर... निकल जाये...
कोई हमदम है... चाहत के काबील... तो किसलिये हम.... संभलजाये..
एक मोठ्ठाच्या मोठ्ठा अडसरच बाजूला झालेला होता... आपल्या स्वतःच्या घरात उमेशने काय वाट्टेल ते सांगीतले असते आणि मुख्य म्हणजे क्षमाची त्याला साथच मिळाली असती... प्रश्न होता नीतुच्या आईवडिलांचा... त्यातही पोलिस खात्यात असलेल्या वडिलांचा.. आणि ते तर?????
... ते तर नव्हतेच... त्यांना आपली मुलगी उद्या कोणत्यातरी ग्रूपबरोबर सिंहगडला जाणार आहे या व्यतिरिक्त काही माहीतही नव्हते... आणि काही माहीत होणारही नव्हते कारण संध्याकाळी हे दोघे पोचतील तेव्हा आई यांना एकत्र पाहणार होती इतकेच, याचा अर्थ ती असा थोडीच समजणार होती की हे फक्त दोघेच गेलेले होते?? प्रश्न उरलेला होता क्षमा नसताना हेच कसे काय गेले! तो निपटणे सहज शक्य होते.
"का? ... लोणावळ्याला का?"
अत्यंत साळसूद व भोचक प्रश्न! उमेशला अत्यानंद झालेला असल्याने या प्रश्नातून तो उगाचच 'आपण गेलो काय नाही काय ते काही इतके महत्वाचे नसून तुझे बाबा लोणावळ्याला का गेले हे जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे' असे काहीसे जाणवून देण्याच्या प्रयत्नात होता. या प्रश्नावर जर निवेदिता म्हणालि असती की ते माझ्यासाठी स्थळ पाहायला गेले आहेत तर काय झाले असते? पुढच्याच स्टॉपला उतरला असता की नाही? आपण जे आहोत तसेच दाखवण्यात अनेक फायदे असतात. मात्र हे कळायला अक्कल असावी लागते.
... जी सध्या त्याच्याकडे नव्हती.
कारण तो अत्यानंदाने आंधळा झालेला होता व आता त्याला सिंहगड, तानाजीचा कडा, देवटाके वगैरेमध्ये ते दोघेच दिसू लागलेले होते.
"कामासाठी... पण आपण काय करायचंय??"
उमेशला झालेला आनंद त्याला अजिबातच लपवता येत नसल्याने त्याच्या चेहर्याचे स्नायू 'ढिल्ले ढिल्ले' झालेले होते. मगाशी प्रश्न विचारताना आखडलेली मान आता नेहमीप्रमाणे 'दिलखुलास' या अॅन्गलमध्ये आलेली होती. डोळ्यातील भिरभिरते व संकोचलेले भाव जाऊन आता बुब्बुळे स्थिरावलेली होती आणि श्वास रोखलेला नसून व्यवस्थित वरखाली होत होता. हे सर्व सेकंदाच्या हजाराव्या भागात निवेदिताला जाणवलेले असल्याने तिने मिश्कील बनून वरील प्रश्न विचारला होता. 'पण आपण काय करायचे'!
आता आली का पंचाईत?
आता एकदम असे म्हणालो की जाऊयात तर त्या निर्णयाचा नीतूच्या वडिलांच्या वाड्यात नसण्याशी गहिरा संबंध आहे हे नुकत्याच जन्मलेल्या अर्भकालाही समजु शकले असते. आणि एकदम असे म्हणालो की नकोच जायला तर आपल्यात एका पोरीबरोबर एकटेच जायची हिम्मतही नाही आहे असा अर्थ काढला जाऊ शकत होता.
उमेशरावांनी कल्पकता नावाचा एक घटक अंमलात आणून उत्तर दिले..
"तुझ्या आईबाबांचं नाही म्हणालो मी... माझ्या आईबाबांचं म्हणालो.. "
आता हादरायची पाळी नीतुची होती. तिने स्थिर मानेने त्याच्याकडे बघत अंदाज घेत तीक्ष्ण अर्थाचा पण वरवर सौम्य वाटेल अशा स्वरात प्रश्न विचारला..
"म्हणजे काय?? "
"क्लास होता ना तिचा?? स्पेशल.. "
"तू.... कशाचं बोलतोSSSSयस??? "
'तो' या अक्षरापुढे काढलेला लाडीक हेल, त्याबरोबर साधारण एक्केचाळीस डिग्रीमध्ये लवलेली मान आणि 'तो' वगैरेसारखी 'ओ'कारान्त अक्षरे बोलताना आपोआप होणारा ओठांचा चंबू... !
हे असे सगळे इतके जवळून बघताना दोन्ही हातांची मिळून दहाही बोटे एकदम शिवशिवतात आणि ओठांचा असा चंबू बघून आपलेच दात एकमेकांवर अगतिकपणे दाबून धरावे लागतात हा नवीन अनुभव घेत उमेश म्हणाला..
"क्षमाने जायला नकोच का?? क्लास नव्हता का तिचा?? "
'काय पण बोलतोस' अशा अर्थी दोन वेळा मान वेळावून नीतु म्हणाली....
"मला वाटलं आपलंच म्हणतोयस.. "
असे म्हणून ती प्रेमाच्या विश्वात ठामपणे गुरफटण्यासाठी पुन्हा खिडकीतून बाहेर पाहायला लागताच उमेश म्हणाला.
"छे छे.. आपण चाललोच आहोत की.. "
यावर त्याला अंधुक दिसले. तिने तिच्या ओठांचे कोपरे स्वतःच्याच हनुवटीकडे ओढून ओठांचे मध्य मात्र एकमेकांवर घट्ट दाबून एक अप्रतिम अदा बहाल केली त्या विधानावर!
सुभान अल्ला हाय.. हसीं चेहरा हाय.. ये मस्ताना अदायें..
आणि ती मदहोष करणारी अदा मनाच्या मुळाशी मुरायच्या आतच... पुणेरी भामट्यांप्रमाणे असलेल्या पुणेरी रस्त्यांनी हिसका दाखवला..
धक्क...
एका पाऊण फूट खड्यातून बसचे मागचे चाक गेले आणि त्याच चाकावर असलेल्या सीटवर हे दोघे!
नियंत्रणच करता आले नाही आपटण्यावर!
आता तर एकमेकांकडे बघण्याचे साहसही होत नव्हते. इतकी जादू? एका अनवधानानेही झालेल्या स्पर्शात इतकी जादू असते? गोड शिरशिर्यांचे एकामागून एक प्रवाह मनावर आदळून मन सैरभैर करत होते. त्याच धक्याचा फायदा घेत नीतूने तिची ओढणी अगदी हक्काने पूर्णपणे स्वतःकडे ओढून अशी ठेवली की आता ती मुघलांचा हल्ला झाला तरी जागची हालणार नाही. उमेशचा खडबडीत खांदा चांगलाच रुतला होता तिच्या दंडात! खरे तर हुळहुळलाच होता दंड! पण आत्ता तेथे हात लावून वेदना शमवायचा प्रयत्न करणे शोभणारही नव्हते आणि... तिला ती वेदना शमवायचीही नव्हतीच..
'सॉरी' वगैरे म्हणावे की नाही हेच उमेशला ठरवता येत नव्हते. कारण सॉरी म्हंटले तर 'याला धक्का बस्लेलाच आवडत नाही तर काय आवडणार' असा विचार तिच्या मनात यायचा आणि सॉरी नाही म्हंटले तर 'याला हेच पाहिजे होते' असा विचार!
आता मात्र सूर्य वर आला होता. बसही खडकवासल्यापाशी भरधाव वेगात पोचून आय ए टी मागे टाकून सुसाट पुढे निघाली होती.
तानाजीचा सिंहगड, जो मगाचपर्यंत एका निळसर ग्रे कलरच्या भक्कम आधारासारखा वाटत होता, तो आता स्पष्ट झाला होता. अतीभव्य पहाड, लांबरुंद! नो वंडर, स्वराज्याला हा गड मिळणे यासारखी शुभ घटनाच नाही.
धुक्यात लपेटलेले गडाचे दर्शन मगाशीच संपले होते. आता दिसत होता एक काळाकभिन्न डोंगर! त्याच्यावरून नजर हटत नव्हती.
एका अबोल गुलाबी प्रवासाचा पहिला टप्पा संपत आला होता. मात्र आत्तपर्यंत बसमध्ये सहा प्रवासी चढलेले होते. हे दोघे मात्र एकमेकांशी एक शब्दही न बोलता नुसते बसलेले होते. नीतू खिडकीबाहेर बघत होती आणि उमेश तिच्या केशसंभारातून येणारा अवर्णनीय गंध आस्वादत तटस्थपणे खाली बघत बसला होता.
धक्का! म्हणजे शॉक! र्स्त्यामुळे बसलेला धक्का नाही. खराखुरा शॉक!
गाडी खानापूरला पोचली तेव्हा क्षमा ज्या ग्रूपबरोबर जाणार होती तो ग्रूप चक्क नाश्ता करत खालीच एका टपरीवजा हॉटेलवर थांबलेला होता. आता काय??
संपला का विषय?? ही बस पन्नास मीटर्स पुढे जाऊन थांबणार शेवटच्या स्टॉपवर! तिथे उतरलो की क्षमानाही दिसली तरी आपण दिसणारच त्या ग्रूपला! त्यातील 'आपण ज्यांना ओळखले' त्या क्षमाच्या दोन मैत्रिणी सरळ सरळ आपल्याला ओळखणार! त्या हाका मारणारच! क्षमाची चौकशी करणार! मग 'नाहीतरी तुम्ही आलाच आहात तर आमच्याबरोबरच राहा' म्हणणार! 'नाही' म्हणण्यासाठी आपल्याकडे एकही सबळ कारण नसणार! त्यात पुन्हा हे शेजारी बसलेले लावण्य पाहून त्या ग्रूपमधील पोरेही आग्रह करू लागणार! मग चढा तिच्यायला.. सिंहगड सगळ्यांबरोबर! काय करायचं काय? बरं हिला तर माहीतच नाही की तो ग्रूप तोच आहे. थांबली की साली बस??
"काय रे?? उतरायचंय ना?"
नीतूच्या या प्रश्नावर उमेश आपला ढिम्म बसूनच राहिला होता सगळे उतरले तरी! अगदी चालक वाहक जोडी उतरली तरी हा तसाच!
"अंहं.. ड्रायव्हर आणि कंडक्टर बदलतात इथे.. "
कैच्याकै! हा काय कोल्हापूर नागपूर प्रवास आहे दर सहा तासांनी जोडी बदलायला?
"बदलतात??"
"हो.. माझ्यामते हा शेवटचा स्टॉप नसावा.. "
"नक्की माहितीय का तुला?? "
"चार वेळा झालाय माझा सिंहगड"
"ओ.. उतरा की ?? माघारी जायचंय काय?? "
कंडक्टरनेच हुकूम सोडला म्हंटल्यावर आता काय करणार? उगाचच आव आणून काहीतरी 'असं कसं पण, मागच्यावेळेस तर पार तिकडे' वगैरे पुटपुटत शेवटी उमेशला उतरावेच लागले.
नीतूला काहीच उमगत नसल्यामुळे तिला त्याचा अभिनय अभिनय वाटलाच नाही.
तेवढ्यात ती घटिका जवळ आली. तो ग्रूप चक्क बस पार करून जात होता. उमेश पटकन बसच्या मागे गेला. नीता तिथेच होती. त्या ग्रूपने नीताला चक्क पाहिले वगैरे आणि निघून गेले. जातानाही एक मुलगी दुसरीला सांगतच होती.. "क्षमी नालायक कधी वेळेवर आलीय का?? आता ती येणारच नाही या बसमध्ये नाही म्हंटल्यावर"! आता त्या मुलीला काय माहीत की त्या 'क्षमी'चा दादा याच बसच्या मागे उभा आहे. आणि ही जी मुलगी दिसतीय तिला घेऊन आलेला आहे. तोवर नीतू बसच्या मागे आली.
"काय रे??"
"नाश्ता करून जायचं का?"
"हो पण इथे का उभायस?"
"कुठेतरी उभं राहायचं म्हणुन इथे उभा राहिलो ... का??"
"पण नाश्ता झाला की आत्ता तिथे?"
"ह्यॅ.. तो कसला नाश्ता... या इथे पोहे मस्त मिळतात.. चल.. "
नीतु आपली बिनदिक्कत भर वाटेवरून नाश्ता-टपरीकडे चालू लागली. हा मात्र अगदी कडेकडेने, दहा दहा वेळा मागे त्या ग्रूपकडे बघत! शेवटी एका वळणावर तो ग्रूप वळला आणि उमेश आणि नीतू पोचले टपरीवर!
"दो पोहा.. "
थाटात मागे बघत साहेबांनी ऑर्डर सोडली अन समोर बघतो तर सत्यानाश... !!!!!
एकाच मोटरसायकलवर तिघे... !!!!
आप्पा
विनीत
राहुल्या
उमेश - काय रे??
आप्पा - थंड हवेत फिरून येऊ म्हंटलं.. तुम्ही कसे आलात?? बसने??
उमेश - हो..
भयानक भडकला होता उमेश!
आप्पा - नाश्ता झाला का??
उमेश - मागवलाय..
विनीत - काय मागवलंय??
उमेश - पोहे..
राहुल - किती??
उमेश - दोन..
आप्पा - ओ पोहे पाच करा.. हां.. पाच प्लेट... काय गं?? तू गड चढू शकशील का?? नाहीतर मोटरसायकल आहे.. तू जा विन्याबरोबर... मी अन हे दोघे येतो चढून..
एकदम नीतूला हा प्रश्न विचारला जाईल याची कल्पनाच नसल्याने आधीच भडकलेल्या उम्याचा आता नीटसा उद्रेक झाला. 'भडव्या, भाडखाऊ' असे 'भ' वर्गातील शब्द 'भ'ल्या सकाळी टाळताना प्रयत्नांची शिकस्त करून तो म्हणाला...
उमेश - तुम्ही... आलात कसे पण??
'नेमके कसे टपकलात रे भडव्यांनो' या प्रश्नाचे हे सौम्य रूप निवेदिता आपटे या व्यक्तीच्या अस्तित्वामुळे झालेले आहे हे समजण्याइतके तिघेही सूज्ञ होते.
राहुल - आज रविवार आहे ना!
'जसा काही दर रविवारी गडावरच येतो आई**' हा नैसर्गीक विचार पुन्हा एकदा दडपून जणू काही आपण आणि नीतू हे एक जोडपे असून मला मध्येच काही मित्र अनेक दिवसांनी भेटले याचा आनंद मी व्यक्त करत आहे असा चेहरा करत उमेश म्हणाला..
उमेश - येस्स... काय मजा यायची नाही पुर्वी आपण यायचो तेव्हा..
विनित - मजा काय?? आजही येईल म्हणा..
राहुल - मी काय म्हणतो विन्या?? तुझं ते घरघरणारं यंत्र ठेव इथेच... सगळेच चढू गड...
विनीत - ते यंत्र होय रे?? इथपर्यंत पोचलास की व्यवस्थित??? आणि रोज मागून कुठेतरी घेऊन जातोस तेव्हा यंत्र नाही का वाटत??
नीतूवर इंप्रेशन मारण्याची संधी राहुलनी उचलल्यामुळे संताप संताप झालेल्या विन्याने त्याचे एक रहस्य उघड केले.
अप्पा - हरकत नाही म्हणा.. सगळेच जाऊ..
उमेश - अरे क्षमाचा एक ग्रूप येतोय म्हणून थांबलोयत...
अप्पा - क्षमाचा ग्रूप?? क्षमा वाड्यातच आहे की??
उमेश - तिचा क्लास होता रे... तिला शेवटच्या क्षणी आठवलं...
अप्पा - पोहे मागवायचे का अजून??
उमेश - छे छे.. कशाला??
आधीच हे आले आहेत याचा राग आणि त्यात टळत नाहीयेत याचा! उमेश आता बकाबका स्वतःचे पोहे संपवू लागला. निवेदितासाठी त्यातले कुणीच अनोळखी नव्हतेच. त्यामुळे ती कंफर्टेबल असली तरी आत्ता या क्षणी त्या तिघांचे तिथे येणे तिला सूचक वाटत होते. त्यामुळे ती लक्ष नाही असे दाखवूनही संवाद अत्यंत लक्षपुर्वक ऐकत होती.
मधेमधे तिलाही चौकशी करणे भागच होते नाहीतर तिला ते नको आहेत असे त्यांना वाटले असते आणि ते घातक ठरले असते.
निवेदिता - तुम्ही येता का नेहमी सिंहगडाला??
राहुल - दर रविवारी नाही.. पण महिन्यातून एक दोनदा तरी येतोच..
निवेदिता - पण मग चौघे असल्यावर मोटरसायकलवर कसे काय येता??
राहुल - छे छे.. मग बसनेच येतो...
निवेदिता - मग आज तुमचे चौघांचे नाही वाटतं ठरले??
हा खरा कळीचा मुद्दा होता. अत्यंत बायकी पद्धतीने विचारलेला!
जर हे येणार'च' होते तर उमेशला यांनी कसे काय नाही विचारले? कालच विचारायला हवे होते. आणि ज्या अर्थी न विचारता आले आहेत त्या अर्थी आम्ही दोघेच येथे आहोत हे कळल्यामुळे आले आहेत असा अर्थ निघतो.
अप्पा अशा परिस्थिती फार व्यवस्थित सांभाळायचा. एकदम वैतागलेला चेहरा करत तो म्हणाला..
अप्पा - चौघांचे कधी ठरणार??? हे घरात असले तर ना साहेब?? राहुल्या सकाळी म्हणाला चल जाऊ सिंहगडावर... विन्याने मोटरसायकल काढलीच नाही.. म्हणाला चौघे म्हणजे बसने जायला पाहिजे.. काकूंना विचारले तर म्हणे उमेश क्षमा बरोबर सिंहगडलाच गेलाय... आणि हे डायलॉग होईपर्यंत क्षमा वाड्याच्या दारात.. म्हंटलं चला आता मोटरसायकल घेऊनच जाऊ..
समाधानकारक उत्तरे देऊन समोरच्याला गप्प बसवण्याचे संपूर्ण कर्तव्य अप्पा एकहाती सांभाळायचा.
वैतागलेल्या उमेशने पहिल्यांदा काउंटरवर जाऊन सगळ्यांचे पैसे भरले म्हणजे आता कुणीही आणखीन काही मागून वेळ घालवत बसणार नाही किंव बसलेच तर निदान आपल्याला असे म्हणता येईल की आम्ही पुढे होतो.
तर पलीकडे, टपरीच्या बाहेर... क्षमाच्या ग्रूपमधला एक राहिलेला आणि सायकलवरून आलेला पोरगा हात करत होता..
डब्बल गोची म्हंटल्यावर उमेशने नादच सोडला आजच्या ट्रीपचा... पण आता निदान त्याच्याशी बोलायला तरी जावेच लागणार होते... सगळेच याच्याकडे बघू लागले की हा बाहेर कुठे चाललाय.. आता अप्पा, विन्या आणि राहुल्या तिघांनाही निदान हे समजणार होते की खरेच एक ग्रूप येणार होता याचेच उम्याला खूप बरे वाटले..
बाहेर आला आणि त्या मुलाला म्हणाला..
"काय रे??"
"कुठेयत सगळे??"
"कोण सगळे?? तू इथे कसा काय??"
"क्षमा कुठेय??"
"घरी??"
"ग्रूप आलाच नाही का म्हणजे??"
"म्हणजे?? तुमचाही ग्रूप येणार होता?? मला काही म्हणली नाही क्षमा??"
"मग तू कसा काय आलास??"
"माझा हा ग्रूप आहे... आत बसलेला.. का??"
ते पोरगं वैतागून पुण्यालाच निघून गेलं सायकलवरून!
राईलकर जगज्जेत्याच्या थाटात आत आले.
अप्पा - कोण रे??
उम्या - तोच.. त्या ग्रूपमधला.. पोचतायत म्हणला सगळे अर्ध्या तासात...
सुनसान शांतता पसरली.
अप्पा - मग गेला कुठे तो??
उम्या - तो येतोय... नेचर्स कॉल..
पोहे खाताना हा उल्लेख झाल्यामुळे सगळेच वैतागले. अचानक विन्या उद्गारला..
विनित - तिच्यायला..
सगळे त्याच्याकडे दचकून पाहू लागल्यावर तो म्हणाला..
विनित - वर्षाबरोबर चिंचवडला जायचं होतं आज.. नऊ वाजता..
अप्पा - का??
विनित - तिच्या एका मैत्रिणीकडे.. लांब आहे म्हणून सोबत चल म्हणाली..
अप्पा - मग??
विनित - तुम्ही थांबा... मी निघतो...
राहुल - ह्यॅ! काहीही काय.. परत बसने कोण येत बसणार.. मीही येतो तुझ्याबरोबर..
अप्पा - मग तिघेही जाऊ ना?? दर वेळेस काय गड चढलाच पाहिजे असे नाही...??
विनित - चला मग.. ते पोहेबिहे राहूदेत..
फाशीच्या कैद्याला फरफटवत वधस्तंभाकडे नेताना अचानक दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्याचे कळावे तसे झाले उम्याला! इतका चेहरा फुलला त्याचा की बास!
उम्या - अरे?? विन्याला जायचं तर जाऊदेत ना?? तुम्ही दोघं चला की??
मानभावीपणा! निवेदिताही बघायलाच लागली त्याच्यात पडलेल्या फरकाने! पण विन्याचा प्रश्नच सगळ्यांनी मोटरसायकलपाशी जाऊन ऐकलेला असल्याने ते परत येण्याची शक्यताच नव्हती.
उम्याला हात करून तिघे निघूनही गेले.. ब्याद गेल्याच्या आनंदात उम्या आणि हा काय प्रकार झाला ते कळलेच नसल्यामुळे नीतु उठले आणि दोघे गडाकडे चालू लागले..
गडावर पहिले पाऊल टाकण्याआधीही बरेच चालावे लागते... तिथपर्यंत, म्हणजे त्या कच्या सडकेवर काही अंतरापर्यंत वाहन जाऊ शकते.. मग मात्र गडाची शुद्ध चालून चढण्याचीच वाट सुरू होते....
तेथपर्यंत कंप्लीट अबोला!
काय बोलायचे हेही समजत नव्हते... आणि इतक्या सकाळी.. इतक्या थंड हवेतही घामाघुम झाल्यासारखे वाटू लागले होते.. पाण्याचि एकही बाटली जवळ नव्हती.. हा वेडेपणा आपण कसा काय केला असे वाटतही नव्हते कारण थोडे चढून गेल्यावर ताक मिळणार हे उम्याला माहीत होते..
त्यातच निवेदिताने तो प्रश्न विचारला..
निवेदिता - तो.. तो आत्ता सायकलवरून आलेला मुलगा कोण होता??
उमेश - क्षमाच्या ग्रूपमधला..
निवेदिता - पण मग.. म्हणजे.. तो ग्रूप दिसलाच नाही.. नाही??
उमेश - काय माहीत कुठे आहेत ते सगळे..
निवेदिता - मगाशी आपली बस थांबली तेव्हा जो...
निवेदिताने तोच प्रश्न विचारू नये अशी उमेशची इच्छा असतानाच... तिला तो प्रश्न अर्धवट सोडावा लागला..
कारण... गडावर पहिले पाऊल टाकणार.. तेवढ्यात..
"ए उम्याSSSSSSSSSS"
राहुल्याची खणखणीत हाक ऐकू आली. जोरात आवाज द्यायचे काम नेहमी राहुल्यावर सोपवले जायचे.
अत्यंत निराश मनाने उम्या एक एक पाऊल टाकत एकटाच उलटा येत होता..
हे तिघे परत आले याचा त्याला इतका संताप येणार होता की बास!
त्यांच्यापर्यंत पोचताच शिव्यांची बरसात करायची हे त्याने ठरवलेले होते.
चरफडत आणि दात ओठ खात त्यांच्यापर्यंत अजून पोचलाही नाही तोवरच अप्पाने स्वतःचा हात पुढे केला..
अप्पा - कॅमेरा.. माझ्या मोठ्या भावाला न सांगताच आणलाय.. नीट परत आण.. लेका.. इतक्या छान प्रसंगी... फोटोही नकोत होय रे काढायला??
तिघेही हसून त्याच्याकडे बघत होते... आणि उमेश?? उमेश अत्यंत खजील मनाने हसूही शकत नव्हता.. मैत्रीचा एक छोटासा कण त्याला आधार म्हणून मिलाला होता प्रेमात.. त्याने फक्त इतकेच विचारले..
उमेश - फक्त.. फक्त हा कॅमेरा द्यायला आला होतात?? .. मग.. मगाशीच का नाही दिलात??
खाडकन तीनही चेहरे पडले. आणि ते पाहून उमेशचाही.. !!!
उमेश - काय रे??? राहुल्या?? अरे काय झालं काय??
राहुल - उम्या.. निवेदिताच्या आईने तमाशा केला वाड्यात.. तुझ्या एकट्याबरोबर आली म्हणून.. म्हणून.. आम्ही सांगीतले की आम्ही तिघे आणि क्षमाही येतीय सिंहगडावर..
नखशिखांत हादरून उमेश तिघांकडे पाहात असतानाच अप्पा म्हणाला..
अप्पा - हे तिला ... इतक्यात सांगु नको हां???? रात्री वाड्यात यायच्या आधी सांग..
उमेश - पण.. पण तुम्ही?? तुम्ही काय करणार??
अप्पा - आम्ही तिघे रात्री नऊपर्यंत भटकणार आहोत.. नऊ वाजता प्यासाला भेटू..
उमेश - आणि.. क्षमा??
अप्पा - ती वर्षाबरोबर चिंचवडला गेलीय.. तिच्या मत्रिणीकडे.. तीही रात्रीच येईल.. तुमच्याबरोबरच वाड्यात प्रवेश करणार आहे.. कसबा गणपतीमागे थांबणार आहे.. बरोब्बर पावणे नऊपासून..
थिजलेला उमेश मैत्रीच्या त्या शब्दबाह्य आविष्काराकडे नुसता बघत असतानाच... त्याच्या तोंडातून आपोआपच तो प्रश्न बाहेर पडला...
उमेश - अरे पण.... हे सगळे.. क्षमाला .. म्हणजे ... सांगितलेत तुम्ही???
अप्पा - नाही... तिचा क्लासबिस काहीच नव्हता.. तुम्ही इथे दोघांनी यावेत हा तिचाच प्लॅन होता..
=================================
नम्र विनंती - कृपया प्रतिसाद देऊ नयेत.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
लेखकाने अस्सच लिहाव किन्वा
लेखकाने अस्सच लिहाव किन्वा तस्सच लिहाव असा "वाचकान्चा " आग्रह नसावा. पटल तर वाचा नाहितर नका वाचु. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे लिहिता येत नाहि .<<<<<<<<<<<
अनुमोदन .................आपल्याला तर आवड्ल ब्वा!!!!!
लेखकाने अस्सच लिहाव किन्वा
लेखकाने अस्सच लिहाव किन्वा तस्सच लिहाव असा "वाचकान्चा " आग्रह नसावा. पटल तर वाचा नाहितर नका वाचु. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे लिहिता येत नाहि .<<<<<<<<<<<
अनुमोदन
लिहायचे ते लिहून टाकू, इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा, न मी कुणाचा वजीर आहे
क्षणाक्षणांना विचार सार्या, गुपीत माझ्या यशस्वितेचे
जगायलाही अधीर होतो, मरायलाही अधीर आहे
मनात येते तुका बनावे, मनात येते कबीर व्हावे
दिलेत तुम्ही स्मरण मला की मुळात मी 'बेफिकीर' आहे...
-'बेफिकीर'!
बायकांच्या वक्षात, मग
बायकांच्या वक्षात, मग पुरुषांच्या कुटे धड धड होते बे , फकीर
चांगभलं रे देव चांगभलं रे. तु
चांगभलं रे देव चांगभलं रे.
तु कधी भला विचार करणार रे
बेफिकीरच नाव बेफिकीर आहे................respect him.
बेफिकीरच नाव बेफिकीर
बेफिकीरच नाव बेफिकीर आहे................respect him....
ओ तृष्णा बाई तुम्ही आहात ना त्यांना "respect" करायला, बाकीच्यांची काय गरज आहे मग?
अगदी खर आहे. आता मीच प्रतिकार
अगदी खर आहे.
आता मीच प्रतिकार करणार आहे अवमान करणार्यांचा.........
काय लिहावे, कसे लिहावे , कुणि
काय लिहावे, कसे लिहावे , कुणि लिहावे ,केव्हा लिहावे याबाबतित ढवळाढवळ शहाण्या/समजदार व्यक्तिने तरि करु नये.
प्रतिसाद जरुर द्या पण dont get personal उदा"असली लोक प्रसिद्धीला हपापलेली असतात... सरड्याप्रमाणे रंग बदलणारी असतात.... ( छे छे , चुकुन सरड्याचा अपमान केलाय, क्षमस्व)
दोन चार ओळी खरडायच्या, दोन चार डोकी जमवायची, स्वतःचा उदोउदो करवुन घ्यायचा, आणि आपल्याला अगदी ज्ञानपीठ मिळाल्याच्या अविर्भावात, वि. स. खांडेकरांच्या आवेशात वावरायचे हेच ह्यांचे ऊद्योग.
बगळ्याने राजहंसाची किती ही बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तरी बगळा तो बगळा च, त्याला मोती कुठून वेचता येणार, तो शेवटी दगडच ऊचलणार ना.")
यातून वैयक्तिक आकसच डोकावतो
(हा एकटाच माणूस मागिल बरेच महिने माबो वर कादम्बरि (सातत्याने) लिहितो आहे,फॅन फॉलोईन्ग हि ठिकठाक आहे -पोटदुखि सुरु
असे लिहुन तुम्हिच त्याना मोठे करता.
pls note I am not a befi fan. I just enjoy his writing "which I like"
I have not read इ स 10000 or whatever it is after first 7-8 lines.
खुपवेळा loose ends असतात पण it is understood for a writer who is not writer by profession.
He has to achive a lot in writing to be a great witer so let him write whatever he likes.
If all readers come to know that what he writes is not worth reading"(as some say)", eventualy they will stop reading him and he will stop writing or write differently.
अनुल्लेखाने मारणे कुणि एकले नाहि का?(हे सग्ळ्यासाठि)
चुकभूल माफ करा
सगळे भाग वाचले नाहीत, पण, हा
सगळे भाग वाचले नाहीत, पण, हा भाग तरी मस्तच घातलात तुम्ही. अभिनंदन!
He has to achive a lot in
He has to achive a lot in writing to be a great witer so let him write whatever he likes..... हेमआयु १००% अनुमोदन.
मी वैयक्तिक टीका मुळीच केलेली नाही, बे.फि. चे साहित्य मी ही नियमित वाचतो. बरेचदा मी त्यांच्या बाजुनेही लिहीले आहे.
पण आताशा लिहील्यानंतरच्या त्यांच्या ज्या दर्पोक्ती असतात, त्या मुळीच वाचनीय आणि सहनीय आताशा, ज्या वाचकांच्या जीवावर आणि पब्लिक फोरम वर तुम्ही लिहीत आहात त्यांना जर तुम्ही कस्पटाप्रमाणे लेखत असाल (आणि ते तुम्हांला आवडत असेल असे मला जाणवतेय), तर आम्ही वाचक ह्याचप्रकारे प्रतिक्रीया देऊ, भले कोणाला पटो अथवा ना पटो.
अरे सोडा यार, आवडलं तर आवडलं
अरे सोडा यार, आवडलं तर आवडलं म्हणा नाहीतर नाही म्हणा. कशाला फुकटच्या पोष्टी.
बेफिकीरच नाव बेफिकीर
बेफिकीरच नाव बेफिकीर आहे................respect him. >>
अहो बाइ, बे फकिर म्हणुन त्यांना उलटे ते respect देत आहेत. आणी बेफिकीरच नाव बेफिकीर नाहि आहे. हे टोपणनाव आहे. त्याला कसला respect देयचा!
जे नाव आयडी वर आहे मी लोकांना
जे नाव आयडी वर आहे मी लोकांना त्याच नावाने ओळखते ते वैयक्तीक कोण आहेत त्याची फिकीर नाही आम्ही त्यांच्या ह्याच नावाने आदर करतो हव तर उदो उदो करतो म्हणा.
" प्रतिसाद"या नविन साहित्य
" प्रतिसाद"या नविन साहित्य प्रकाराचा जन्म झाला आहे तरि माबो प्रशासनाने याचि दखल घेऊन नविन विभाग सुरु करण्यास हरकत नाहि खुप लेखक लेखण्या सरसावुन विन्गेत्/रान्गेत उभे आहेत(माझ्यासारखे).
बेफि सध्या तुमच्या कादम्बरि पेक्शा प्रतिसाद व वादविवादच जास्त रन्ग्तात, याचा विचार व्हावा.
pls dont waste your time and energy into all this
आप लिखते रहो हम पढ्ते रहेन्गे ,अछ्छा लगा तो अछ्छा कहेन्गे बुरा लगा तो बुरा कहेन्गे
दिल पे मत लो यार!
जे नाव आयडी वर आहे मी लोकांना
जे नाव आयडी वर आहे मी लोकांना त्याच नावाने ओळखते ते वैयक्तीक कोण आहेत त्याची फिकीर नाही >>>
फिकिर नाहि ? बे फिकिर करा
ते जे लिहीतात तेवढ्या ताकतीचं
ते जे लिहीतात तेवढ्या ताकतीचं लिहीण्याची ज्यांची पात्रता आहे त्यानी उगाच उठून त्यांच्यावर टिका करत बसू नये. तुम्ही न थांबता लिहाल याची खात्री आहेच.
आपला मित्र,
-हबा
बेफिकीर जी, वरील सगळ्या
बेफिकीर जी,
वरील सगळ्या प्रतिसादाना (विशेषतहा जाई जुईच्या ) तुम्ही एवढ्या उस्फुर्त पणे उत्तर देण्याची काही गरज नाही.
अहो वाचक च ते ..ते प्रतिसाद देनारच जरी तुम्ही "नम्र विनंती - कृपया प्रतिसाद देऊ नयेत." असे लिहीले असेल तरी.
स्वताहावर नियंत्रण ठेवावे ही नम्र विनंती. आपण लेखक आहोत हे लक्षात असु द्यावे. वाचक असतील तर लेखक राहील.
व. पु. काळे.
Pages