अ‍ॅलिस अंकलचे घर - वसई

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

वसई गावात अजुनही बर्‍याच वाड्या आणि त्यात जुन्या धाटणीची घरं आहेत. त्यातलेच आमचाय शेजार्‍यांचे घर.
Picture 082.jpg

प्रकार: 

अरे मस्तच आहे हे. अजय तुमचं गावाकडचे घर पण असच आहे का, कोकणातल्या एखाद्या गावात माझे स्वतःचे असे जुन्यापद्धतीचे कौलारु घर, मागे पुढे खूप मोठे अंगण, आजूबाजूला खूप झाडी हे एक स्वप्न आहे.

मस्तच जमलेय. घराचा रंगही खास वसईचाच.
माझ्याही आठवणीत असेच एक घर वसईलाच तामतलाव भागात होते ( तिथे झोपाळा होता ) माझी मैत्रिण, रुफिणा रहात होती तिथे.

शब्दात कौतुक करणं निव्वळ अशक्य.... Happy
आजतागायत मला चित्रकला येत नाही म्हणून कधी दु:ख वाटले नाही, पण तुमची चित्रकला पाहिली की कधी कधी राहून राहून वाटतं की आपल्याला ही जरा बरी चित्रं काढता येत असती तर बरं झालं असतं.. Happy
फारच आवडलं चित्रं..
जिप्सी आणि मार्को प्रमाणेच बहुधा तुम्ही चित्रं हे प्रत्यक्ष ठिकाणापेक्षा जास्ती सुंदर काढत असणार असं वाटतंय.. Happy

माझ्या आवडत्या लेखनात.. Happy