Submitted by क्रितिका on 28 May, 2011 - 06:38
चैत्राची रात्र वेगळीच वाटे मला आज का
आकाशात अजून जळत आहे सुरेख तारका
अर्ध्या चंद्राची कोर बघत आहे आज तुला
जणू काही गुपित सांगायचा आहे तिला
डोळ्यात काजळाचे हास्य नवे नवे तुझ्या
होठांवर शब्द काही आहे थांबलेले माझ्या
केसात मोगरेची तू कळी ही सजवलेली
फुलणार ती म्हणून का थोडी लाजलेली
मनात तुझ्या का येतो हा प्रश्न खुळा
शब्दांवाचून सगळं काही कळेल तुला
या क्षणात हरपून जा आता स्वतःला
गार वारा सांगतो चल स्वप्नांचा गावा...
गुलमोहर:
शेअर करा
सहा मिनिटात कविता !! पुलेशु
सहा मिनिटात कविता !!
पुलेशु
म्हणजे काय ?
म्हणजे काय ?
आयडीचा जन्म आणि कवितेचा जन्म
आयडीचा जन्म आणि कवितेचा जन्म यातलं सहा मिनिटांचं अंतर गं ..
मला आवडेल कि तुम्हि जर कळवला
मला आवडेल कि तुम्हि जर कळवला तुमचा स्पष्ट मत कविते बद्दल ..
आभार !
ओक्के सर्वात आधी. पुलेशु
ओक्के
सर्वात आधी. पुलेशु म्हणजे
पुढील लेखनास शुभेच्छा !
मला आधी वाटलं जुनाच कुणी आहे
असो.
डोळ्यात काजळाचे हास्य नवे नवे तुझ्या
ही ओळ छान आहे. पद्यात लिहायचा प्रयत्न पण आवडला.
यमक मात्र जुळवलं नाहीये कमीत कमी ओळीच्या शेवटी येणारा स्वर तरी..
ओक्के !! धन्यवाद ! प्रतिसादा
ओक्के !!
धन्यवाद ! प्रतिसादा बद्दल..
कविता आवडली !
कविता आवडली !

धन्यवाद अनिल !
धन्यवाद अनिल !