बुद्ध

Submitted by राकेश भडंग on 26 May, 2011 - 17:34

बुद्ध

माझ्या मरणाचे दुःख काही लोकांनाच का होईल?
फक्त ते मला ओळखतात म्हणून?
त्या रस्त्यावरच्या माणसास काहीच वाटणार नाही?

मलातरी कुठे काय वाटेल तो मेला तर
गाडीखाली येऊन वा अतिरेक्याची गोळी खाऊन

तो मेला तर माणसे फक्त कुतूहल दाखवतील
असेल मोठा नेता तर लोक हजारोंच्या संख्येने सहभागी होतील
त्याच्या प्रेतयात्रेत

व परत जातील आपापल्या जगात
जेथे त्यांच्या सावेन्द्ना दाबून टाकण्यास सज्ज आहेत
अनेक गोष्टी

अन दुसऱ्याच्या प्रेतयात्रेस आपल्याच कुठल्यातरी
भागाची प्रेतयात्रा समजण्यास आता कुठे सापडणार आहे
आपणास तो तरुण राजपुत्र?

सैतानाची ख़ुशी कवितासंग्रह मधून

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बुद्ध शीर्षक देण्याचे कारण कवी शोधतो आहे तरुण राजपुत्र म्हणजेच बुद्ध (ज्यास प्रेत यात्रा बघून ध्यानाची जिज्ञासा झाली.)

सावेन्द्ना>>> म्हणजे काय?

कल्पना छान. पण अजुन चांगल्या पद्धतीने मांडता आली असती. पुलेशु Happy