कशीश- २रा मुंबई आंतरराष्ट्रीय Queer चित्रपट महोत्सव !

Submitted by रैना on 26 May, 2011 - 06:46

2nd Mumbai International Queer Film Festival
Cinemax Versova Alliance Francaise
May 25-29, 2011 May 26-28, 2011

मुंबईत सध्या Queer (योग्य मराठी प्रतिशब्द काय आहे?) चित्रपट महोत्सव सुरु आहे.
http://www.mumbaiqueerfest.com/
श्रीधर रंगायन आणि हमसफर ट्रस्टचे श्री विवेक आनंद हे आयोजकद्वय आहे. बरेचशे कॉर्पोरेट स्पॉन्सर्स आहेत.
या निमीत्ताने २३ देशातील १२४ चित्रपट, माहितीपट, शॉर्ट फिल्मस दाखवल्या जाणार आहेत.

काल उद्घाटनाला जाण्याचा योग आला. सई परांजपे अस्स्खलित इंग्रजीत अतिशय सुरेख बोलल्या.
आपल्या समाजातील दांभिकपणावर त्यांनी उत्तम भाष्य केले. त्यात फडमारू अभिनिवेश नव्हता, की मी किती (avantgarde) समाजप्रबोधक असाही नव्हता.. निव्वळ आंतरबाह्य साधेपणा आणि स्पष्टपणा (पण न झोंबणारा make no mistake)- 'मला हे योग्य वाटत नाही, आपण प्रयत्न करायला हवा.' मला फार आवडले त्यांचे भाषण.
त्यांनी 'सुई' या एडसवरील त्यांच्या माहितीपटाच्या वेळेस आर्थर रोड जेल मध्ये पुरुषगर्भनिरोधक वाटपाच्या एका सीनच्या शुटिंगची मजा सांगीतली. परवानगी आयत्यावेळेस नाकारली गेली, कारण त्या सीन मुळे मुळात समलैंगिक संबंध असतात यावर शिक्कामोर्तब होईल अशी शासनाला भीती वाटली. Proud
येनकेनप्रकारेण त्यांनी शुटिंग केले म्हणे शेवटी.
(पुन्हा- टोन फार महत्त्वाचा असतो या निमीत्ताने मला पुन्हा कळले. 'मी कित्ती कित्ती हालअपेष्टा सहन करुन तुमच्या जन्माच्या उद्धारासाठी चित्तरपट काढला' असे काऽहीऽहीऽ त्यात नव्हते. )
सईबाईंनी मेनस्ट्रीम सिनेमात अशी (LGBT) पात्रं फक्त 'caricatures' असल्याची खंत व्यक्त केली, आणि सहज कथेच्या ओघात हाडामांसांची वाटावी अशी अस्सल पात्रे ठेवावीत (पण वेगळे चित्रपट नको) असे मत व्यक्तं केले. ते मत मला काल पटले नव्हते, पण विचारांती 'उंबरठा' आणि 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' आठवले सहज. आणि सहज ओघात गोवलेल्या पात्रांबाबतचा मुद्दा काही अंशी पटला. Happy

पूजा भट्ट ने २४व्या वर्षी 'तमन्ना' ची निर्मीती केली होती त्याबाबतचा अनुभव सांगीतला. तीही बरी बोलली तशी.

त्या आधी विवेक आनंद यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वीचा भयानक काळ, अखिल जगतात आपण एकटेच जणुकाही एखाद्या व्याधीने पछाडले आहोत की काय असे वाटणे आणि आजची ही घडी याबाबत बरेचसे हृद्य छोटेखानी मनोगत व्यक्त केले.

आसिफ अलि बेग ( हे कोण आहेत हे मज ठावकी नव्हते) यांनी 'Monologue of an Ageing Drag Queen' अतिशय अप्रतिम सादर केला. त्यात ' I am what I am' हे गीतही.
ड्रॅग क्विन काय आहे हे मला माहित नव्हते. तुम्हालाही नसेल तर
http://en.wikipedia.org/wiki/Drag_queen

Rikki Beadle Blair (चित्रपट दिग्दर्शक आणि ब्रिटेनच्या १०० most influential gay people मध्ये झळकलेले) यांचेही एक अतिशय scintillating का काय म्हणतात तसे सादरीकरण होते. (ते सादरीकरण मला फारसे आवडले नाही. समजले नाही असेही असू शकेल. मला फक्त त्यातली अफलातून raw energy भीडली जी आपल्याकडील कलावंतात सहजासहजी दिसून येत नाही) त्यांची Fit या नावाची गाजलेली फिल्मही विद्यापीठांमध्ये दाखवण्यात येते. कुठे मिळाली तर नक्की पहा.

बाकी तिथले पब्लिक पाहून काही अंशी तरी मी बावचळले होते हे प्रामाणिकपणे मान्य करावेच लागेल. बर्‍याचदा चित्रपटातील content फार ग्राफिक असतो आणि माझा म.व. गोंधळ उडतो हेही मी मान्य करते. Proud पण तो माझा प्रॉब्लेम आहे, त्यांचा नाही, हेही नमुद करायला हवे. माझ्यासाठी त्यांनी आपली अभिव्यक्ती बदलावी अशी अपेक्षा नाही.

आशियातील पहिले LGBT Lifestyle Card अशी ज्याची जाहिरात केल्या जाते ते Q-Card भारतात लाँच करण्यात आले आहे. याचा अर्थ भारतात ग्राहक आहेत आणि वाढत आहेत.
अगदी The best things to do in Queer Pune असेही लेख येत आहेत.

तुम्हाला जर अजून LGBT issues बाबत काही माहित नसेल, शंका असतील तर त्या सर्व शंकांसकट अधिक माहित करुन घ्या !

माझ्या माहितीतील आणि आवडीचे असे मराठीतील पुस्तक म्हणजे नंदा खरे यांचे 'नांगरल्यावीण भुई'. पूर्ण पुस्तकच आणि परिशिष्टातील समलैंगिकतेवरची माहिती केवळ थोर आहे.
Nadine Gordimer यांचे 'None to accompany me' ही कादंबरीही मला आवडते. यातील वर्णद्वेव्षाच्या विरुद्ध लढणारी बाई आपल्या समलैंगिक मुलीला समजून घ्यायची बरीच असफल धडपड करते.
ही दोन्ही पुस्तके समलैंगिकतेच्या प्रसारासाठी लिहील्या गेली नाहीत, त्यातील पात्रे समलैंगिक आहेत. त्यामुळेच समजणे सोपे जाते असे वाटते.

आज मी हापिसातील एकाला (ज्याने सोयीस्कररित्या काल यातून अंग काढुन घेतले आणि माझे प्यादे परस्पर पुढे केले त्याला) महोत्सवाचा कॅटलॉग दाखवत होते.
'तू धाडसी आहेस, तुला भिती नाही वाटली ?'
'भीती कसली? '
'लोकं काय म्हणतील अगं ? ' Proud
'अरे, तू मला सरळ सांगीतले असतेस की मला भीती वाटते आहे तरी मी गेले असते. माझ्या गळ्यात काम मारायची गरज नव्हती.'
'घरच्यांना काय सांगीतलेस?'
'म्हणजे काय? तू घरी न सांगता हे काम करतोस की काय? धन्य आहे.'

काल तिथे तावातावाने बोलल्या गेलेले आणि मला न पटलेले काही मुद्दे आज सोदाहरण स्पष्ट झाले दुर्दैवाने.

जाता जाता,
अलिकडेच http://www.dayagainsthomophobia.org/-IDAHO-english,41- हा दिवस होता.

गुलमोहर: 

रैना, खूप छान माहिती दिलीत.
IDAHO म्हणजे International Day against homophobia and transfobia : 17 May
हे बर्‍याच जणांना माहीत नसेल.
योगायोग: मुंबईत तिसरा कशिश महोत्सव सध्या २३-२७ मे सुरू आहे.
यंदा filmamaker in focus : Rob Willimas तर country focus : france आहेत.
काल Rob williams च्या उपस्थितीत Make the yuletide gay पाहिला.तसेच दोन म्युझिकल्स आणि Austin unbound या मूकबधीर ट्रान्सजेंडरच्या परिवर्तनाच्या प्रवासाची कहाणी पाहिली.

रमेश लक्ष्मण मोरे कृत 'आम्ही का तिसरे?' या चित्रपटाचा उद्घाटनाचा खेळ महोत्सवात सिनेमॅक्सला झाला.

खुप समाज प्रबोधनाची गरज आहे. कारण आजही खुप वेळा अशा लोकांचा फार प्रॉब्लेम होतो. हल्लीच झालेला एक किस्सा.

ऑफीसात माझ्याच टीम मध्ये एक गे पारसी माणुस होता. तो गे आहे हे बहुतेकांना माहिती होतं, कारण त्याने आमच्या ऑफीस मधल्या एका दोघांना ट्राय केलं होत. तो बाय सेक्शुअल असावा, कारण त्याला बायका मुलं होती. त्या दोघांनी तक्रार ही केली होती. एच आर ने त्याला समज दिली. सगळे त्याच्याशी नॉर्मल वागत होतो.

नंतर एकदा-दोनदा लोकांनी त्याला गे- वेश्यांबरोबर ऑफीसच्या टॉयलेट मध्ये पकडलं. तो मुलांना बाहेरुन बोलवायचा आणि असे उद्योग ऑफीसच्या टॉयलेट मध्ये करायचा. त्याला रंगे हात पकडलं गेलं. मग मात्र त्याला सोड्चीठ्ठी दिली. त्याची बॉस म्हणुन माझी पण साक्ष काढली गेली. नंतर तो येवढा बनेल, की त्याने गे अ‍ॅक्टीव्हीस्ट ना संपर्क केला. त्या लोकांनी काही दिवस मला आणि एच आर ला पिडले. पण ऑफीसचा त्याने गैर वापर केल्याचे त्यांना कळल्यावर ते लोक त्याला मदत करेनासे झाले.

तो जेंव्हा मला रीपोर्ट करत होता, तेंव्हा एकदाही काम करताना आम्हाला काहीही वेगळे वागवले नाही. जवळ जवळ अडीच वर्ष आम्ही एकत्र काम केलं पण मी किंवा टीम ने कधीही त्याला वेगळी वागणुक दिली नाही. तो पण हे कबुल करायचा. आम्ही सगळे एकत्र सीनेमा, हॉटेल मध्ये जायचो. एकदा तर तो आणि मी एका सेमीनार साठी तीन दिवस दिल्लीला गेलो होतो. तेंव्हा माहिती असुनही माझ्या तर डोक्यातही न्हवतं की तो गे आहे.

समाज त्यांना स्वीकारत नाही, पण जेंव्हा स्वीकारतात तेंव्हा त्यांना ही त्याची जाणीव पाहिजे. येवढ समजुन घेवुन माहिती असुन आम्ही त्याला वागवलं, शेवटी त्याने गे अ‍ॅक्टीव्हीस्ट ना संपर्क केलाच. म्हणजे स्वतःच्या सेक्शुअ‍ॅलीटीचे भांडवलच केले. तेही कारण नसताना. आम्ही पोलीस कंप्लेंट केली नसताना!!

त्याने एकापरिने माझा विश्वासघात केला. आता पुढील वेळी (भविष्यात) असे कोणी भेटले तर मी ताकही फुंकुन पिणार.
प्रचंड समाज प्रबोधनाची गरज आहे.

Pages