कशीश- २रा मुंबई आंतरराष्ट्रीय Queer चित्रपट महोत्सव !

Submitted by रैना on 26 May, 2011 - 06:46

2nd Mumbai International Queer Film Festival
Cinemax Versova Alliance Francaise
May 25-29, 2011 May 26-28, 2011

मुंबईत सध्या Queer (योग्य मराठी प्रतिशब्द काय आहे?) चित्रपट महोत्सव सुरु आहे.
http://www.mumbaiqueerfest.com/
श्रीधर रंगायन आणि हमसफर ट्रस्टचे श्री विवेक आनंद हे आयोजकद्वय आहे. बरेचशे कॉर्पोरेट स्पॉन्सर्स आहेत.
या निमीत्ताने २३ देशातील १२४ चित्रपट, माहितीपट, शॉर्ट फिल्मस दाखवल्या जाणार आहेत.

काल उद्घाटनाला जाण्याचा योग आला. सई परांजपे अस्स्खलित इंग्रजीत अतिशय सुरेख बोलल्या.
आपल्या समाजातील दांभिकपणावर त्यांनी उत्तम भाष्य केले. त्यात फडमारू अभिनिवेश नव्हता, की मी किती (avantgarde) समाजप्रबोधक असाही नव्हता.. निव्वळ आंतरबाह्य साधेपणा आणि स्पष्टपणा (पण न झोंबणारा make no mistake)- 'मला हे योग्य वाटत नाही, आपण प्रयत्न करायला हवा.' मला फार आवडले त्यांचे भाषण.
त्यांनी 'सुई' या एडसवरील त्यांच्या माहितीपटाच्या वेळेस आर्थर रोड जेल मध्ये पुरुषगर्भनिरोधक वाटपाच्या एका सीनच्या शुटिंगची मजा सांगीतली. परवानगी आयत्यावेळेस नाकारली गेली, कारण त्या सीन मुळे मुळात समलैंगिक संबंध असतात यावर शिक्कामोर्तब होईल अशी शासनाला भीती वाटली. Proud
येनकेनप्रकारेण त्यांनी शुटिंग केले म्हणे शेवटी.
(पुन्हा- टोन फार महत्त्वाचा असतो या निमीत्ताने मला पुन्हा कळले. 'मी कित्ती कित्ती हालअपेष्टा सहन करुन तुमच्या जन्माच्या उद्धारासाठी चित्तरपट काढला' असे काऽहीऽहीऽ त्यात नव्हते. )
सईबाईंनी मेनस्ट्रीम सिनेमात अशी (LGBT) पात्रं फक्त 'caricatures' असल्याची खंत व्यक्त केली, आणि सहज कथेच्या ओघात हाडामांसांची वाटावी अशी अस्सल पात्रे ठेवावीत (पण वेगळे चित्रपट नको) असे मत व्यक्तं केले. ते मत मला काल पटले नव्हते, पण विचारांती 'उंबरठा' आणि 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' आठवले सहज. आणि सहज ओघात गोवलेल्या पात्रांबाबतचा मुद्दा काही अंशी पटला. Happy

पूजा भट्ट ने २४व्या वर्षी 'तमन्ना' ची निर्मीती केली होती त्याबाबतचा अनुभव सांगीतला. तीही बरी बोलली तशी.

त्या आधी विवेक आनंद यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वीचा भयानक काळ, अखिल जगतात आपण एकटेच जणुकाही एखाद्या व्याधीने पछाडले आहोत की काय असे वाटणे आणि आजची ही घडी याबाबत बरेचसे हृद्य छोटेखानी मनोगत व्यक्त केले.

आसिफ अलि बेग ( हे कोण आहेत हे मज ठावकी नव्हते) यांनी 'Monologue of an Ageing Drag Queen' अतिशय अप्रतिम सादर केला. त्यात ' I am what I am' हे गीतही.
ड्रॅग क्विन काय आहे हे मला माहित नव्हते. तुम्हालाही नसेल तर
http://en.wikipedia.org/wiki/Drag_queen

Rikki Beadle Blair (चित्रपट दिग्दर्शक आणि ब्रिटेनच्या १०० most influential gay people मध्ये झळकलेले) यांचेही एक अतिशय scintillating का काय म्हणतात तसे सादरीकरण होते. (ते सादरीकरण मला फारसे आवडले नाही. समजले नाही असेही असू शकेल. मला फक्त त्यातली अफलातून raw energy भीडली जी आपल्याकडील कलावंतात सहजासहजी दिसून येत नाही) त्यांची Fit या नावाची गाजलेली फिल्मही विद्यापीठांमध्ये दाखवण्यात येते. कुठे मिळाली तर नक्की पहा.

बाकी तिथले पब्लिक पाहून काही अंशी तरी मी बावचळले होते हे प्रामाणिकपणे मान्य करावेच लागेल. बर्‍याचदा चित्रपटातील content फार ग्राफिक असतो आणि माझा म.व. गोंधळ उडतो हेही मी मान्य करते. Proud पण तो माझा प्रॉब्लेम आहे, त्यांचा नाही, हेही नमुद करायला हवे. माझ्यासाठी त्यांनी आपली अभिव्यक्ती बदलावी अशी अपेक्षा नाही.

आशियातील पहिले LGBT Lifestyle Card अशी ज्याची जाहिरात केल्या जाते ते Q-Card भारतात लाँच करण्यात आले आहे. याचा अर्थ भारतात ग्राहक आहेत आणि वाढत आहेत.
अगदी The best things to do in Queer Pune असेही लेख येत आहेत.

तुम्हाला जर अजून LGBT issues बाबत काही माहित नसेल, शंका असतील तर त्या सर्व शंकांसकट अधिक माहित करुन घ्या !

माझ्या माहितीतील आणि आवडीचे असे मराठीतील पुस्तक म्हणजे नंदा खरे यांचे 'नांगरल्यावीण भुई'. पूर्ण पुस्तकच आणि परिशिष्टातील समलैंगिकतेवरची माहिती केवळ थोर आहे.
Nadine Gordimer यांचे 'None to accompany me' ही कादंबरीही मला आवडते. यातील वर्णद्वेव्षाच्या विरुद्ध लढणारी बाई आपल्या समलैंगिक मुलीला समजून घ्यायची बरीच असफल धडपड करते.
ही दोन्ही पुस्तके समलैंगिकतेच्या प्रसारासाठी लिहील्या गेली नाहीत, त्यातील पात्रे समलैंगिक आहेत. त्यामुळेच समजणे सोपे जाते असे वाटते.

आज मी हापिसातील एकाला (ज्याने सोयीस्कररित्या काल यातून अंग काढुन घेतले आणि माझे प्यादे परस्पर पुढे केले त्याला) महोत्सवाचा कॅटलॉग दाखवत होते.
'तू धाडसी आहेस, तुला भिती नाही वाटली ?'
'भीती कसली? '
'लोकं काय म्हणतील अगं ? ' Proud
'अरे, तू मला सरळ सांगीतले असतेस की मला भीती वाटते आहे तरी मी गेले असते. माझ्या गळ्यात काम मारायची गरज नव्हती.'
'घरच्यांना काय सांगीतलेस?'
'म्हणजे काय? तू घरी न सांगता हे काम करतोस की काय? धन्य आहे.'

काल तिथे तावातावाने बोलल्या गेलेले आणि मला न पटलेले काही मुद्दे आज सोदाहरण स्पष्ट झाले दुर्दैवाने.

जाता जाता,
अलिकडेच http://www.dayagainsthomophobia.org/-IDAHO-english,41- हा दिवस होता.

गुलमोहर: 

रैना, छान माहिती. अजून कुठले चित्रपट दाखवणार आहेत ते पण लिही जरा.
सईबाईंनी मेनस्ट्रीम सिनेमात अशी (LGBT) पात्रं फक्त 'caricatures' असल्याची खंत व्यक्त केली,>> होय, ते मात्र आहे. हल्लीच्या सिनेमामधून यावरचे विनोद पण अत्यंत हीन दर्जाचे अस्तात.

रैना,
छान लिहिलं आहेस.

<सईबाईंनी मेनस्ट्रीम सिनेमात अशी (LGBT) पात्रं फक्त 'caricatures' असल्याची खंत व्यक्त केली,>> > 'आय अ‍ॅम'सारखे काही अपवाद असतातही.
गेल्या वर्षी पुण्यातही असा महोत्सव आयोजित केला गेला होता.

रैना चांगली माहिती दिलीस. हल्लीच आलेला आणि पुरस्कार प्राप्त 'आय अ‍ॅम' अंधेरी सिनेमॅक्सला उद्या संध्या. ६.३० वाजता दाखवणार आहेत.

धन्यवाद लोकहो.
नीलू/ चिनूक्स- बरे झाले सांगीतले 'आय अ‍ॅम' बद्दल. हा चित्रपट बघायला पाहीजे एकदा.
कोणी पाहिला असेल तर लिहा येथे.

नंदिनी- खूप फिल्मस आहेत गं -१२४ एकुणात. कॅटलॉग चाळला तेव्हा भारतीय फिल्मसही खूप दिसल्या त्यात.

आणि LGBT निमीत्ताने जे काय अनेक प्रकारचे पूर्वग्रह आणि खोटेपणे यांचे पितळ उघडे पडते, ते आता लिहीता येणार नाहीत, पण 'बोलाचीच कढी, बोलाचाच भात' अशीच परिस्थिती असते कंपन्यांमध्ये. हात जोडावेसे वाटतात लोकांपुढे कधीतरी. की आवरा, एकवेळ मी homophobic आहे ते मान्य करा, पण निदान एक भूमिका घ्या. सार्वजनिक एक आणि खाजगीत एक असे निदान करु नका. असो.

>> सईबाईंनी मेनस्ट्रीम सिनेमात अशी (LGBT) पात्रं फक्त 'caricatures' असल्याची खंत व्यक्त केली
अगदी! याने अ‍ॅक्सेप्टन्स वाढायचा सोडून उलटच परिणाम होतो असं वाटतं.

क्विअरला मराठी प्रतिशब्द सुचत नाहीये मलाही.
ड्रॅग क्वीन हा शब्दप्रयोग माहीत नव्हता. म्हणजे चक्क स्त्रीपार्टी?!

फारच छान माहिती रैना. असे काही वेगळे चित्रपट महोत्सव आयोजित करावे लागतात आणि त्यांची माहिती ठराविक वर्तुळाबाहेरच्या लोकांपर्यंत पोहचत नाही यातच सगळं आलं.

चांगली माहिती रैना.

ड्रॅग क्विन्स वर एक फेमस चित्रपट पहिला होता 'प्रिसिलिया - द क्विन ऑफ द डेझर्ट'.

स्वाती, खरंच की! ड्रॅग क्वीन म्हणजे चक्क स्त्री पार्टी! पण केवळ मनोरंजनासाठी. कथानकाचा नायक/नायिका म्हणून नसावी कदाचित.

रैना, छान लिहिलंयस. (एक बावळट वाटेलसा प्रश्न विचारू का? या महोत्सवाला तू ऑफिसतर्फे कशी काय गेली होतीस? I mean, HR आणि हा महोत्सव याची सांगड मला घालता येत नाहीये Sad )

लले Happy

>>अगदी! याने अ‍ॅक्सेप्टन्स वाढायचा सोडून उलटच परिणाम होतो असं वाटतं>> स्वाती अनुमोदन.

>>या महोत्सवाला तू ऑफिसतर्फे कशी काय गेली होतीस? I >> हा प्रश्न मलाही आहे

रैना, सुरेख लिहिले आहेस. अगदी प्रामाणिक व अभिनिवेशविहीन (सईताईंच्या भाषणासारखे Happy ). धन्यवाद.
हे पहिल्यांदा जेव्हा दिसते/भेटते, तेव्हा बावचळल्यासारखे होणे अगदीच नैसर्गिक आहे असे मला वाटते. मीसुद्धा त्यातून गेलो आहे. त्याचवेळी "पण तो माझा प्रॉब्लेम आहे, त्यांचा नाही, हेही नमुद करायला हवे. माझ्यासाठी त्यांनी आपली अभिव्यक्ती बदलावी अशी अपेक्षा नाही." हेसुद्धा फार महत्त्वाचे (आणि सुंदर) वाटले.
सईताईंचा चित्रपटातील समलैंगिक व्यक्तिरेखांचा पूर्ण मुद्दा अगदी पटला. हाडामांसाची माणसे दाखवा हो! एवढेच मागणे आहे. तेवढ्यासाठी वेगळा चित्रपट काढण्याची नेहमीच गरज नाही, हे मतही विचार करायला लावणारे.
'आय अ‍ॅम'बद्दल चिनूक्साला अनुमोदन.

शेवटचा किस्सा वाचून मला 'ब्रोकबॅक माउन्टन' पाहताना निर्माण झालेली अस्वस्थता आठवली. त्यानंतर मित्रमैत्रीणींबरोबर 'अस्वस्थता का?' याविषयी झालेला संवादसुद्धा आठवतो. त्यात 'हे संबंध अशास्त्रीय आहेत' असे एक अत्यंत भंपक व मूर्खपणाचे विधान विज्ञानाच्याच एका पदव्युत्तर स्नातकाने केल्यावर आपल्याला केवढा पल्ला गाठायचा आहे याची कल्पना आली.

अरभाटाला कानामात्रावेलांटीसकट अनुमोदन.
"तिथल्या शॉपमधले माझे सगळ्यात चांगले मित्रमैत्रिण गे/लेस्बो आहेत. 'कॉश्च्युम शॉपमधे स्ट्रेट मुलगा' हा जरा दुर्मिळ नमुना आहे" हे मी सहजपणे सांगत गेले तेव्हा इथल्या काही मित्रमंडळींचे त्यावर त्यांचे झालेले चेहरे बघून आपण काहीतरी बोलू नये ते बोललो की काय असं वाटायला लागलं. जाम गमतीशीरच. Happy

रैना, खुप छान माहिती.... धन्स

कुठले चित्रपट दाखवणार आहेत ते पण लिही जरा. म्हन्जे ह्यातले चित्रपट मिलाले तर बघ्ता हि येतिल...

बाकी सईं बैंच्या वाक्याला १००% अनुमोदन

ललिता, नीलू
'Equal Opportunity Employer' आणि ' Diversity & Inclusion' या दोन तत्वांवर आधारित आजकाल कंपन्यांमध्ये 'LGBT Network' असतात (आणि असावेतही). त्या नेटवर्कच्या काही जवाबदार्‍या असतात.
त्यासाठी गेले होते.

सुनिधी, गीतू,
मला फिल्मस पहायला मिळाल्याच नाहीत. Sad पण नावे टाकेन इकडे आणि काही चांगल्या फिल्मस बाबत माहिती कळली तरी लिहीन.

त्यात 'हे संबंध अशास्त्रीय आहेत' असे एक अत्यंत भंपक व मूर्खपणाचे विधान विज्ञानाच्याच एका पदव्युत्तर स्नातकाने केल्यावर आपल्याला केवढा पल्ला गाठायचा आहे याची कल्पना आली. >>
अरे आता काय सांगू. माझ्याकडे असल्याच भंपक आणि मूर्खपणाच्या अनेक विधानांची जंत्रीच आहे.
Marginalised groups ना खरेच वाईट वागवले जाते.

स्वाती,
अगदी अगदी. त्याचा अर्थ कळल्यावर माझ्याही डोळ्यासमोर बालगंधर्वच आले. Happy

कोणाला तो 'queer' साठी चांगला शब्द सापडला तर जरुर सांगा. खरे तर 'queer' हा शब्दही तितकासा उचित वाटत नाही.

'कॉश्च्युम शॉपमधे स्ट्रेट मुलगा' - नीरजा Happy

कशिश फ़िल्म फ़ेस्टला Alliance Francaise चर्चगेट इथे २६ ला ३ ते ८ आणि २८ ला ३ ते ६ दरम्यानचे चित्रपट पाहिले. महोत्सवात लघुपट, कथाचित्रे, डॉक्युमेंटरीज अशा १२४ चित्रपटांचा समावेश होता.

लक्षात राहिलेल्या ४ चित्रपटांबद्दल लिहितो.
पिक्चर्स ऑफ़ झेन : आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर स्वत:चे पूर्वग्रह तपासून बघणारी आणि त्याच्या (गोर्‍या) प्रेमिकाशी संवाद साधणारी ब्रिटनमधली मुस्लिम माता. ’तो माझ्यासाठी केव्हाच मेला होता’ असं वडिलांच्या तोंडी तर ’तो एक गोरी (व्हाइट) मुलगी घरी घेउन येईल, असं मला वाटायचं , गोरा मुलगा नव्हे’ हे आईच्या तोंडचं वाक्य.
गेबी gayby : एक तिशीतली बाई आपल्या गे मित्राच्या मदतीने मूल `बनवायचा' ओल्ड फॅशन्ड पद्धतीने प्रयत्न करते त्याची गोष्ट. (विल अँड ग्रेस या मालिकेतही याच कल्पनेवर काही एपिसोड होते)
सेव्ह मी : व्यसनी तसंच गे तरुणांसाठीच्या मिनिस्ट्रीतील प्रेम कथा. धर्म, जीझस यांचा हवाला देत तरुणांना सुधारणार्‍या स्त्रीच्या भूमिकेत ज्युडिथ लाइट (ugly betty मधली क्लेअर मीड- बेटीच्या बॊसची आई) होती.

शनिवारी ईटिंग आउट मालिकेतला पहिला भाग दिग्दर्शक अ‍ॅलन ब्रोका यांच्या उपस्थितीत दाखवला गेला.आपल्या गे मित्रासाठी बॉयफ़्रेंड शोधणारी आणि त्यांचे सेटिंग करण्यासाठी धडपडणारी तरुणी, आपला मुलगा गे आहे असे कळाल्यावर, `बघ मी तुला सांगत नव्हतो का?' असं बायकोला आणि `आय अ‍ॅम प्राउड ऑफ़ यु'असं मुलाला, असं म्हणणारा बाप या चित्रपटात होते. त्या तरुणीनं `तुमचा मुलगा गे आहे’ असा चुकीचा गौप्यस्फ़ोट तिच्या मित्राच्या टु बी बॉयफ़्रेंडबद्दल त्याच्या आईवडिलांकडे केल्यावर हा विनोदी प्रसंग असूनही ’अरेरे’ अशा अर्थाच्या उद्गारांची लहर प्रेक्षकांमधून उठली. कमिंग आउट टु पॅरंट या दुखर्‍या नसेवर नकळत हात पडल्याचा परिणाम.
‘चित्रपटात मरणार्‍या, मार खाणार्‍या गे व्यक्तीच्या भूमिकेसाठी नट तयार असतात, पण गे-लव्ह सीन्स करायला नाखूष असतात, गे अभिनेते तर अशा भूमिकेत दिसू इच्छित नाहीत’ : इति दिग्दर्शक उवाच.
महोत्सवात ओनीर दिग्दर्शित ’आय अ‍ॅम’ सर्वोत्कृष्ट कथात्मक चित्रपट तर सोनाली गुलाटी दिग्दर्शित ’आय अ‍ॅम’ सर्वोत्तम डॉक्युमेंटरी ठरले.
महोत्सवाला प्रवेश नि:शुल्क होता. फ़क्त आधी नोंदणी करायची होती.
मला डॉक्युमेंटरीज तसेच भारतीय चित्रपट पहायला मिळाले नाहीत. महोत्सवाचा कंट्री फोकस इज्रायलवर होता. तृतीय प्रकर्ती नावाचा एक नेपाळी चित्रपटही होता.

अरे वा! धन्यवाद भरत. बरे झाले सांगीतलेत. मीही पाहीन कुठे मिळाल्या या फिल्म्स तर.

अ‍ॅलन ब्रोका च्या फिल्मस फारच ग्राफिक असतात आणि लोकांच्या पचनी पडत नाहीत असे आमचा एक
परदेशी सहकारी म्हणतो. त्यामुळे घाबरून ब्रोकाच्या कुठल्याही फिल्मस लोकं सुचवत नाही.
मला पहायच्या आहेत एकदा. न पाहताच कसे काय घाबरणार ! असो.

छान लिहिले आहेस. लोकांना अजुनही नैसर्गीक गोष्टींकरता झगडावे लागते यावरुन आपला समाज किती (अ)प्रगत आहे याची कल्पना येते.

queer हे मुळात विचित्र या अर्थीच वापरल्या जायचे. नंतर त्यांनीच तो शब्द आपलासा करुन सकारात्मक रित्या वापरणे सुरु केले. पण अजुनही एखाद्या व्यक्तीला 'you are queer' असे म्हणणे अयोग्य समजल्या जाते (म्हणजेच संबोधन म्हणुन नाही वापरायचे, community म्हणुन जास्त मान्यताप्रत होत चालला आहे तो शब्द).

रैना, चांगली माहिती सांगितलीस. आणि प्रतिसादांतूनही चांगली माहिती मिळाली.
(सगळे संदर्भ लागायला अजून एकदा तरी वाचायला लागेल.)
धन्यवाद.

रैना, ब्रोकाच्या फिल्म्स जालावर उपलब्ध आहेत असे त्याने सांगितले.
त्याच्या चित्रपटातली दृश्ये ग्राफिक नाही, तर क्रूड वाटली आणि त्यांचा उद्देश आणि परिणाम निखळ विनोदनिर्मिती हाच होता.

रच्याकने : प्रेक्षकांत १८+ ते ७०+ वयोगटातली मंडळी होती.

यावर्षीच्या IDAHO निमित्ताने.
आज एका परिसंवादास जाण्याचा योग आला. विषय -'सेंसिटीव्ह संवाद साधताना'
बर्‍याच कंपन्यातील एलजीबीटी नेटवर्क्स मधील लोक उपस्थित होते.
बुलिंग बाबत त्यांनी अनुभव मांडले. बुलिंग म्हणजे मारहाण/छळ/मुद्दाम त्रास देणे अशी काहीशी समजूत असते, पण लोकांनी सांगीतले की विनोद हे आम्हाला तितकेच क्रुर वाटतात. आणि मुख्य म्हणजे ते विनोदबुद्धीच्या नावाखाली खपवले जातात आणि त्यावर आम्ही हसावे हेही अपेक्षित असते.
काही मॅनेजर्सने सांगीतले की 'या' लोकांशी नक्की काय आणि कसे बोलावे ते कळत नाही आम्हाला.

बुलिंग चे खालील प्रकार त्यांनी सांगीतले. अजून काही होते. आठवेल तसे लिहीन
- टार्गेटेड विनोद (तथाकथित 'गे' जोक्स)
- शेरेबाजी & गॉसिपिंग
- तुम्ही 'गे' कसे झालात / तुम्हाला कधी कळले की आपण 'गे' आहोत. अशासारखे प्रश्न विचारणे. वक्त्याने सांगीतले की हाच प्रश्न तुम्ही हेटेरो असाल तर स्वतःला विचारुन पहा ना. उदा- तुम्ही 'हेटेरो' कधी झालात वगैरे. If these questions sound stupid to you, they are going to sound stupid to them as well. लोकं म्हणले पण आम्ही सहज विचारतो, मुद्दाम नाही. त्यावर वक्त्याचे म्हणणे पण हेच अजाणतेपणी कोणाला दुखवु शकते हे लक्षात घ्या. तुमचे कुतुहुल शमवायला त्या लोकांचा वापर करु नका. स्टीरीयोटायपिंग, पूर्वग्रह, बायस, डिस्क्रिमीनेशन या स्टेजेस आहेत.
एका लेस्बियन व्यक्तीने मात्र सांगीतले की एकवेळ मला असे थेट प्रश्न विचारलेले बोचत नाहीत, माझ्या मागे गॉसिप करणार्‍यांचा मात्र संताप येतो.
- छळ

काही लोकांनी ' कमिंग आउट ऑफ द क्लोजेट' चे अनुभव सांगीतले. ऐकुन माझ्या तरी पोटात गोळा आला.
एका वक्त्याने सांगीतले की 'गे' पुरुषांना त्यातल्या त्यात लेस्बियन स्त्रियांपेक्षा बरी वागणुक मिळते. ट्रान्सजेंडर ना गे पुरुष आणि स्त्रिया सुद्धा हिणवतात.

त्यांनी काही अतिशय साधी उदाहरणं घेतली. उदा- तुमच्या बाजूच्या टेबलावर केक किंवा फुलं आली. लगेच ' कोणी पाठवली, गर्लफ्रेंडने/ बायकोने/ नवर्‍याने का?' असे फाटकन म्हणू नका. 'अरे वा! तुझा वाढदिवस आहे का' असे म्हणा इ.इ.

सहा वर्षांपूर्वी या नेटवर्कमध्ये या कंपनीत ५ लोकं ६ देशातील कार्यालये धरुन, आज ५०० आहेत.

Pages