एका मित्राची गोष्ट...!

Submitted by Girish Kulkarni on 25 May, 2011 - 11:07

********************************
********************************

तसा तो जरा विचित्रच म्हणजे ग्रेट म्हणजे वेगळाच होता..
प्रेम म्हणजे काय तर एक उगाचच ताणलेली उत्सुकता
रिफाईण्ड तेलातली भजी खाऊनही टिकते ती सभ्यता
नको तिथे अन नको तेव्हढी साहजिक होते ती आर्तता
................ अश्या स्वतःच्याच व्याख्या बाळगणारा
मला तेंव्हाही वाटायचं
जगाच्या व्याख्या सोयीस्कर वाटत नसल्या की
असले मुखवटे घालायला लागणारं बळ त्यानं मिळवलय..
काल-परवा तो असाच दिसला..
त्याच्या स्थूल चेहर्‍यावरचे कॉर्नर्स रेखीव दिसत होते..
सुखावलेला बुद्ध्यांक अन मी अस काहीसं तो बोलेल
अस वाटायच्या आत....मी त्याला विचारलं
तू बराच सहज झाल्यासारखा वाटतोयस...
जगाशी दोस्ती केल्यासारखा वागतोयस...
लांब जांभईतली जीभ आत घेत
त्यानं शांतपणे कॉफीचा कप दाखवत म्हटलं..
याला आपल्यापुर्वी किती जणांनी हाताळलय माहितीय
प्रत्येकानं वेगळ्या चवीनं याला अनुभवलं असेलय
मी आयुष्याला असाच पिऊन बसलोय...
गंधगार फुलांची वाट पाहाणं लांबलं म्हणुन
.....दारी कॅक्टस लावुन बसलोय..
आता ऋतुंच्या तक्रारी नाहीत अन काहीच नाही..
या मुखवट्यात बरच काही दडवता यायला लागलय....
मिळाल्यातली अपुर्णता लपवता यायला लागलीय
असंबध्द आनंदाची नक्षीही घडवता यायला लागलीय
सगळी मुर्खांची शाळा अन म्हणुन मी अडाणी
असली अभंगवाणीही करता यायला लागलीय...
मी बेचव हसलो...
अजुन एक धर्म आयुष्याच्या द्युतातं घसरतांना दिसत होता
माझ्या मनातला कापूर तसाच जळत होता...!!!!!

********************************
********************************

गुलमोहर: 

Sir, I am totally Impressed!

आता ऋतुंच्या तक्रारी नाहीत अन काहीच नाही..
या मुखवट्यात बरच काही दडवता यायला लागलय....
मिळाल्यातली अपुर्णता लपवता यायला लागलीय

अनुभवतेय, म्हणून जास्त पटलं!

माझ्या निवडक १० त!!

“गंधगार फुलांची वाट पाहाणं लांबलं म्हणुन
.....दारी कॅक्टस लावुन बसलोय..
आता ऋतुंच्या तक्रारी नाहीत अन काहीच नाही..”

Gr8 ….. खूपच छान

अजुन एक धर्म आयुष्याच्या द्युतातं घसरतांना दिसत होता
माझ्या मनातला कापूर तसाच जळत होता...!>>>>>>>

किती सहजपणे सांगून जाता हो ! तुमच्या मित्राला मी ओळखत नाही, पण मीही तुमचा मित्र आहे ही गोष्ट विलक्षण सुखावणारी आहे.
Thanks a ton for always being there for me!!

मी बेचव हसलो...
अजुन एक धर्म आयुष्याच्या द्युतातं घसरतांना दिसत होता
माझ्या मनातला कापूर तसाच जळत होता...!!!!!

मस्त Happy

एक गंमत... ही कविता माझ्यामाझ्या नादात "विशालची" म्हणून वाचली .... "म्हटलं गिरीशजींनी पाण्याचा रंग बदलायचं ठरवलंलेलं दिसतंय" ..... आणि एका प्रतिसादात स्वतःच्या कवितेला विशालच का उत्तर देतोय ... आणि उलगडा कवी "आपण" आहात म्हणून ... Happy असो...... "श्टाईल" भारीच आहे "गुंत्याची"............ Happy

Happy !

सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक आभार ! Happy
बागेश्री : दहाबद्दल स्पेशल धन्यवाद्..माझ्या वाटयाला हे असलं फारसं येत नाही त्यामुळे सवयही नाही Happy
मुक्ता : अरे ते ' मुजरा सरकार...' एक्स्प्रेशन विशालच आहे ... यू टू Happy !
विशाल : सेंटी कर देतो भाई....चिअर्स !!
पुजा : तुम्हाला वेगळं लिहीलय... Happy
गुरुजी : असल्या गमतीतला गुंता एकदा सोडवुया अन तेही नाशकात ! Happy

पुनःश्च सगळ्यांचे आभार !

सस्नेह

गिरीश

गिरिशजी, सलाम !
एक विनंति -
सगळेच दिसतात मुखवटेच बापडे
लावती तर कांही त्यावरही झांपडे
सांगा हो तुम्हीच आतां गिरीशजी
न घसरे कधी तो, धर्म कां न सांपडे II

साष्टांग दंडवत दादा Happy
<<<आता ऋतुंच्या तक्रारी नाहीत अन काहीच नाही..
या मुखवट्यात बरच काही दडवता यायला लागलय....
मिळाल्यातली अपुर्णता लपवता यायला लागलीय
असंबध्द आनंदाची नक्षीही घडवता यायला लागलीय>>>

काय हे? कुठून आणता तुम्ही हे सगळं? Happy लय म्हणजे लय भारी Happy

sahi.

मलाही नाही झेपली फारशी पण....
>> त्यानं शांतपणे कॉफीचा कप दाखवत म्हटलं..
याला आपल्यापुर्वी किती जणांनी हाताळलय माहितीय
प्रत्येकानं वेगळ्या चवीनं याला अनुभवलं असेलय
मी आयुष्याला असाच पिऊन बसलोय...
गंधगार फुलं>>> हे आवडलं

मला कविता संकुचीत विचार प्रदर्शीत करणारी वाटली .सो कॉल्ड सॉफीस्टीकेटेड आयुष्य सर्वांच्याच वाटयाला येतच अस नाही .ज्यांना समाजाशी ताल मेल जुळवण हाच बेसीक संघर्श असतो त्यांच्यापुढे कँक्टसच्या आयुष्याशिवाय पर्यायच नसतो आपली बेसीक स्वप्न सजवायला .आपल्या रखरखत्या आयुष्यात पाणी धरून तगून रहाण्यासाठी कँकटसच समर्थ असत . सोपा पेपर कोणीही सोडवेल हो पण कठीणात कठीण पेपर लीलया सोडवून आपल मीपण आदर्श आकर्शक संस्कारीत करत जगण केवळ कँक्टसच जाणे .कवितेत रंगवलेल्या व्यक्तीमत्वाला न्याय मिळाला नाहीच पण आपल्या कवितेकडून अशा व्यक्तीमत्वाची अवहेलना झाली आहे हे माझ स्पष्ट मत .बहुदा फुला फळाविना तरीही अती आकर्शक कँकटस आपल्यासारख्या कवीमनाला उलगडला नाही .पहिल्या आणी शेवटच्या पाच ओळी अजिबात आवडल्या नाहीत .आपल्या समंजस कवितेच्या प्रतीक्षेत .पु.ले.शु.

कविता तुम्हाला जशी कळली तश्या बॅकराउंडवर ती लिहीलेलीच नाहीय्...एका कॅक्टसवर ती कविता तोलायची तुम्हाला मुभा आहे पण तुम्हाला समजलीय तश्या सॉफेस्टीकेशनच्या कॅनव्हासवर ती बेतलीच नाहीय. त्यामुळे समंजस-असमंजसाच्या आपल्या अपेक्षा अनाठायी आहेत... अन तुम्हाला समंजस वाटेल ते मला वाटेलच अस कशावरुन्...मग तोही वादाचा मुद्दा होऊ शकतो. असो !