" मन "

Submitted by मनोगत on 24 May, 2011 - 05:16

मनाचिये ठाइ वृक्ष कल्पतरूचे
बेलगाम हे घोडे स्वैराचाराचे...

मनाचिये ठाइ फुलपाखरू स्वछंदी,
अज्ञात बागेत वावरतो हा आनंदी...

मनाचिये ठाइ संकल्प जिवघेणे,
विस्मरून अठवांना गुदमरुन त्याचे जगणे...

मनाचिये ठाइ वेल अबोलीची,
शब्दाविन रंगते मैफिल आशेची....

गुलमोहर: