अजून काही वर्षांनी...

Submitted by आनंदयात्री on 24 May, 2011 - 03:11

आता आपण मोठे झालो, नाही का?
आज आपल्या मैत्रीला काही कोवळी वर्षे पूर्ण झाली!
एकत्र घालवलेल्या जेमतेम दहा-वीस संध्याकाळ , तेवढ्याच चर्चा,
त्यातही कधीतरी मौनातल्या गप्पा,
मोजून पाच-पन्नास भांडणे,
हजारो विनवण्या, कोट्यवधी मिलिसेकंदांचा अबोला
आणि कायमचा पसेसिव्हनेस...
हा आत्तापर्यंतचा ढोबळ हिशेब!
आतली उलथापालथ आपली आपल्यालाच माहित!

अजून काही वर्षांनी
आपल्या मैत्रीला काही जाणती वर्षं पूर्ण होतील...
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...
चंद्र घेऊ वाटून तेव्हाही..
भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!
विनवण्या, अबोला यांची मला
आतापासूनच भीती वाटायला लागली आहे...
पसेसिव्हनेसचा अर्थ आपण लावलेल्या
झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं
तेव्हा सांगतील आपल्याला...
मैत्रीचं व्यापलेपण कदाचित तेव्हा समजेल दोघांनाही..

आपण आत्ता कुठे मोठे होऊ लागलो आहोत...

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

>> आज आपल्या मैत्रीला काही कोवळी वर्षे पूर्ण झाली!

क्या बात है!!

>> भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!

Lol

सुंदर कविता!! Happy

गुरुवर्य खुप आवडली. जिवनात मैत्रीचे हे आताचे दिवस असेच ठेवता आले तर.
मस्त कविता आहे. कशाची तरी आठवण करुन देनारी. पु.ले.शु.

सुंदर..! Happy

संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...
चंद्र घेऊ वाटून तेव्हाही..>> अप्रतिम... Happy

भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!>> भांडणाशिवाय मजा नाही.. Happy

आपण कितीही मोठे झालो तरी 'झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं' विसरुण कशी चालतील..
खरंतर त्याच्यांच आधारावरती अख्ख झाड उभं असतं..मग ते मैत्रीचं असो की जीवनाचं नाही का?

खूप खूप आवडली!

नचिकेत,
फार फारच छान!

"भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!"

असं सार्‍या "आपल्याला" प्रिय असणार्‍या नात्यांबद्दल वाटतं! भांडण करून-करून एक तर ते नातं आपल्याला दुषित करायचं नसतं किंवा प्रेम समजतच नाही तर भांडून तरी काय 'उपेग' असं वाटू लागतं...

हे अवांतर..

कवितेचा आशय फार भावला... Happy

>> पसेसिव्हनेसचा अर्थ आपण लावलेल्या
>> झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं
>> तेव्हा सांगतील आपल्याला...

मस्त! Happy

झाड, रोमा, अवि, विशाल, उल्हासकाका, क्रांति, शामली, स्वातीताई, कविता - धन्यवाद! Happy

मुक्ता, थँक्स! भांडणाशिवाय मजा नाही.. >>> बराच अनुभव दिसतोय वाट्टं!! Wink

दक्षिणा, ह्म्म्म.. Happy धन्स!

ज्योती, प्रचंड thanku! Happy

शामकाका, खरंय! Happy

दगडसम्राट यो, चेतना, कौतुकभौ - लोभ असावा! Happy

गिरीश, कधीतरी हे भाग्यही!! Happy

बागेश्री, "भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!" ही ओळ आकाश वेगळं झालेलं असेल, चंद्र वाटून घेऊ वगैरे नंतर आली आहे.. i hope भापो.. Happy

असं सार्‍या "आपल्याला" प्रिय असणार्‍या नात्यांबद्दल वाटतं! भांडण करून-करून एक तर ते नातं आपल्याला दुषित करायचं नसतं किंवा प्रेम समजतच नाही तर भांडून तरी काय 'उपेग' असं वाटू लागतं...
>>
दुषित वगैरे नाही होत काही... might be a phase...तसंही आपण आपल्याच दृष्टिकोनातून जग बघत असतो की! the best part is - अशी मैत्री असायलाही भाग्य लागतं आणि आपलं ते आहे, हे कळलं की झालं!! Happy