Submitted by विशाल कुलकर्णी on 24 May, 2011 - 02:53
पदर कर्णा पसर आता, दान देई सिंधुमाई
या जगाची माय झाली, माय माझी सिंधुमाई
लाजलेले क्रौर्यही.. अन् लाज वाटे वेदनेला
दु:खही नि:शब्द त्यां आव्हान देई सिंधुमाई
जन्मदाते त्याग करती जीव लावे माय भोळी
फाटलेल्या अंबराला ठिगळ होई सिंधुमाई
होतसे दुर्गा भवानी, शारदा होते कधी ती
शायरीला सांगते अन् आपबीती सिंधुमाई
जा जगाला सांग आता गरज नाही देवतांची
दु:खितांचा देव झाली आदिशक्ती सिंधुमाई
विशाल...
गुलमोहर:
शेअर करा
व्वा..!
व्वा..!
“होतसे दुर्गा भवानी, शारदा
“होतसे दुर्गा भवानी, शारदा होते कधी ती
शायरीला सांगते अन् आपबीती सिंधुमाई”
..... अगदी अगदी
<<पदर कर्णा पसर आता, दान देई
<<पदर कर्णा पसर आता, दान देई सिंधुमाई
या जगाची माय झाली, माय माझी सिंधुमाई<<
जब्बरदस्त ओळी! पहिल्या कडव्यातच जिंकलस विकु!!
धन्स मंडळी ! खुप दिवस लिहायचे
धन्स मंडळी ! खुप दिवस लिहायचे म्हणत होतो माईवर. पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल लिहीली
विशालराव छान आहे ... तुमच्या
विशालराव छान आहे ...
तुमच्या कवितेतिल सिंधुमाई म्हणजे सिंधुताई सकंपाळ का ???
विशाल, चांगली लिहिली आहेस
विशाल, चांगली लिहिली आहेस कविता.
विशाल, काय मस्त
विशाल, काय मस्त लिहिलंयस..
आवडली.
छान लिहीलय सार्थ.
छान लिहीलय
सार्थ.
विशाल, आता त्या सगळ्यातून पार
विशाल, आता त्या सगळ्यातून पार पुढे निघून गेल्या आहेत असे वाटते.
भूतकाळातली कटूता आणि अन्याय त्या नक्कीच विसरल्या असतील.
आणि हे नेमके या कवितेत उतरले आहे.
खूप खूप खास लिहिलंस विशाल!
खूप खूप खास लिहिलंस विशाल! माई आहेतच अशा कमालीच्या!
कम्मु-राजे हो माई म्हणजे
कम्मु-राजे हो माई म्हणजे सिंधुताई सपकाळच !
कविता जर जमली असेल, नव्हे जमणारच कारण सिंधुमाईंशी संबंधीत कुठलीही गोष्ट चुकूच शकत नाही. एक माईचं नशीब सोडलं तर. पण तिने तर कधी नशिबाची फिकीरच केली नाही, ती नेहमीच नशिबावर मात करत आलीये. त्यामुळे ते श्रेय फक्त माईचं आहे.
मनःपूर्वक आभार मंडळी !
खूप आहे लिहीण्यासारखं जे
खूप आहे लिहीण्यासारखं जे लिहीलय ते ही सुरेख.
विशल्या, आवडली कविता.
विशल्या, आवडली कविता.
धन्यवाद शाम कौतुकराव , चक्क
धन्यवाद शाम
कौतुकराव , चक्क आमच्या कवितेवर प्रतिसाद.......... ? सुर्य कुणीकडे उगवला होता राव काल? धन्स रे...
छान
छान
माई ग्रेट आहेत खरंच.
माई ग्रेट आहेत खरंच. त्यांच्याविषयी आणखी काय बोलावं. विशाल छान शब्दात मांडलंस रे. जियो !
वाह.. मुवी पाहिला अन तुझी
वाह.. मुवी पाहिला अन तुझी कविता वाचली.. भिडलीच !!
व्वा, विशाल!
व्वा, विशाल!
खरेय रे
खरेय रे नाद्या.........
ग्रेटच आहे माई. एवढ्या यातना भोगुनही मनात कसलीही कटूता न बाळगता आपले काम करत राहणे, कित्येक अनाथ बालकांची आई होणे हे फक्त माईच करु शकते.
मनःपूर्वक आभार मंडळी !
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्च
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्च छान विशाल... त्यांच्या टीव्ही वरच्या सर्व मुलाखती पाहते मी. खरच ग्रेट आहेत माई....
खुप आवड्ली कविता,खुपच छान !!
धन्यवाद श्वेतांबरी
धन्यवाद श्वेतांबरी
छान
छान
आदिशक्ती सिंधुमाई हेच
आदिशक्ती सिंधुमाई हेच खरं!
आमच्या सगळ्यांच्या मनातलं अगदी छान मांडलयस.
जामोप्या, अनिदा प्रतिसादासाठी
जामोप्या, अनिदा प्रतिसादासाठी मनःपूर्वक आभार !