Submitted by सुशिल गणोरे on 24 May, 2011 - 01:07
रातनदिस
चादर रातीची सारून
दिस उजाडतो माणसा
पळवी रातीला तो कसा
धावून वाघासारखा जसा
रात आहे लय छान
झोपे होऊनी लोक बेभान
दिसा येतया उधान
काम कराया कसून
वाटे रातीचे आकर्षण
दिस जसा सुदर्शन
राती भेटते विसाया
दिसा कामाने कापून अंग लागत ते चामकाया
दिसा भेटलं वेतन
तर राती खातोय कसून
मग आवडती कशी
तुला रातीची रे कुशी
कवी
सुशिल गणोरे.......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा